Sunday, July 31, 2011

(७२) सत्याची कास

शरद आणी संतोष दोन भाऊ होते, त्यांचा परिवार अगदी गडगंज श्रीमंत होता,
पण स्वभावानी दोन्ही भाऊ अगदी वेग-वेगळ्या टोकावर
होते. शरद गर्विष्ठ, दुष्ट आणी गोर-गरीबांना छलणारा होता. संतोष त्याउलट अडलेल्या-नडलेल्यांना मदत करणारा होता.
त्यांच्या कडे गृह कामात मदत करायला कोमल नावाची एक स्त्री-गडी होती.
संतोष चा स्वभाव मन-मीळाउ असल्यानी कोमल चा भाऊ
मकरंद ,संतोष चा चांगला मित्र होता.
संतोष स्वामींकडे आल्या असतांना, स्वामी संतोष ला गीता देतात. स्वामी प्रसाद म्हणुन संतोष ग्रंथाला घरी आणतो,
पण स्वामींनी गीता आपल्याला का दिली, यावर तो फारसा विचार  करत नाही.
एक दिवशी शरद एकांत साधून कोमलला वाईट हेतूंनी धरतो.
कोमल जेव्हा फार प्रयत्न पण करुन स्वताला सोडवू शकत नाही,तेव्हा
ती  शरद च्या हाताला कड-कडीत चावा घेऊन आपली सुटका करते.
शरदच्या दरारा आणी घरच्या अन्य लोकांच्या प्रेमामुळे ती कुणालाही काहीही सांगत नाही.
पण कामांध शरद तर नवीन संधीच्या शोधात होता.
एक-दिवस घरी कोणी नसतांना तो पुन्हा कोमल वर दुराचार करायला जातो. पण योगा-योगानी संतोष तिथे येऊन
कोमल ला सोडवतो.
पण या वेळेला कोमल घरच्यांना सर्व सांगते. मकरंद पंचायत मध्ये तक्रार नोंदवतो. साक्षीदार म्हणून संतोष चा नाव देण्यात येतं.
पण संतोष धर्म संकटात पडतो,एका पक्षात त्याचा मोठा भाऊ आणी दुसऱ्या पक्षाला त्याचा जिवलग मित्र.
संतोष स्वामींचं मार्गदर्शन मागतो.
स्वामी म्हणता-" सत्याची कास धर, न्यायाच्या पक्षांनी साक्ष दे."
संतोष कोमल ला न्याय मिळवून द्यायला साक्षी साठी तैयार होतो.
चाणाक्ष शरद, आपल्या बायको ला संतोष समोर गया-वया करुन त्याला खरी साक्ष देण्यापासुन परावृत्त करायला पाठवतो.
संतोष पुन्हा गोंधळतो.
पंचायत भरते. शरद वर आरोप मांडला जातो. पंच संतोष ची उलट-तपासणी करतात.
पण शरद गप्प राहतो.
तितक्यात स्वामी तिथे प्रगट होतात.
स्वामी म्हणतात:-"शरदा! काय आप्त-जनासाठी सत्यापासुन पाठ फिरवली? अरे आम्ही तुला गीता कशाला दिली होती?"
"अरे फक्त अर्जुनासाठीच नाही तर जगातल्या सर्व दुविधेत असलेल्या लोकांना मार्ग दर्शनासाठी कृष्णानी गीता सांगितली होती."
"गीता नुसती पाठ करण्या साठी नसून आचरणात आणण्या साठी आहे."
"अरे आप्त-जनासाठी आपलं कर्तव्य आणी सत्याची कास सोडू नको."
"आत्ता पर्यंत अगणित-जन्मात अगणित-आप्तजन तुला प्राप्त झाले आहे,आणी त्या मायेतच वावरत राह्यला तर मोक्ष कधीही
प्राप्त होणार नाही."
स्वामींच्या बोधामुळे संतोष खरी साक्ष देतो आणी त्यावरून शरद ला शिक्षा होते.
मकरंद म्हणतो- "शरद ला शिक्षा झाली पण माझ्या निष्पाप बहिणीचं काय तिला काहीही न करता अपमानाचा ठपका
लागला, आता तीचाशी कोण लग्न करणार?"
स्वामी कोमल चा हात संतोष च्या हातात देतात.
कोमल आणी संतोष एकमेकासाठी अनुरूपच होते,म्हणुन सर्व लोकं फार खुश होतात.
पंच विचारतात:-"स्वामी आपल्याला तर सर्व माहित होतं, मग आपणच शरद ला शिक्षा का नाही केली?"
स्वामी म्हणतात:-" आम्ही जर ते केले असते तर कर्तव्याच्या कसोटी वर संतोषची परीक्षा झाली नसती?"
"आपले कर्तव्य पूर्ण केल्या शिवाय, सत्याची कास न धरता त्याला मोक्ष मिळाला नसता."
"आपलं कर्तव्य चोख पारपाडल्या मुळे संतोषची मोक्षाची वाट-चाल आता मोकळी झाली आहे."
संतोष गहिवरून स्वामींचे पाय धरतो.

Sunday, July 24, 2011

(71) दानात अहंकार नसावा

गोपाळ शेट नावाचा एक व्यक्ती दानशूर होता. तो गोर-गरीबांना फार मदत करायचा पण आपलं नाव-लोकिक व्हावे ह्या इच्छेनी .
लोकांच्या तोंडातून आपला उदो-उदो ऐकायला त्याला फार आवडायचं.
एकदा स्वामींच्या मनात त्याचा गर्व दुर करायचा विचार येतो, स्वामी चोळप्पाला घेऊन गोपाळशेट च्या गावाला निघतात.
रस्त्यात त्यांना एक व्यक्ती जीव द्यायला जाताना दिसतो.
स्वामी त्याला अडवतात तेव्हा तो आपले दुःख सांगतो.
तो व्यक्ती पत्नी-वियोगानी फार दुखी होता.
सर्वांचा सुखी संसार आहे पण आपला नाही, या भावनेनी तो सदैव व्याकुळ असायचा.
आणी त्या त्रासाला गांजून तो मृत्यु पत्करायला जात होता.
स्वामी त्याला बरोबर घेऊन पुढे प्रवास करतात.
पुढे कर्जापाई सावकाराच्या जाचणी मुळे गांजलेला व्यक्ती जीव देताना सापडतो.
स्वामी त्यालाही बरोबर घेऊन पुढे प्रवास करतात.
त्या दोघांना घेऊन ते गोपाळ शेट च्या घरी येतात.
स्वामी म्हणतात: "गोपाळ शेट तुमचं दानशूर असं नाव-लोकिक  ऐकुन आम्ही तुमच्या कडे या लोकांना घेऊन आलो आहे."
"आम्हाला आशा आहे तुम्ही यांच्या दुखाला दुर करणार."
कर्जानी वैतागलेला व्यक्तीला गोपाळ शेट धनाचीमोठी पोटली देतात.
पत्नी वियोगानी गांजलेल्या व्यक्तीला लग्नासाठी त्याच्या योग्य अशी नवरी पण गोपाळ शेट गाठून देतात,
त्याशिवाय धनाची एक छोटी पोटली पण देतात.
दोन्ही व्यक्तींच्या आनंदाचा पार राहत नाही.
मग गोपाळशेट स्वामींना विचारतात की त्यांना काय अपेक्षा आहे.
स्वामी अगदी फटकळ उत्तर देतात- "आम्हाला जे पाहिजे ते वर बसलेला आमचा बाप देतो."
"आणी जर त्याची इच्छा नसेल तर जगात कोणीही काहीही दिले तरी काहीही फायदा होणार नाही."
गोपाळशेट ला अनावर राग येतो पण तो दात-ओठ चावुन राहतो.
सर्व लोकं गोपाळ शेट कडून परततात.
रस्त्यात त्यातला एक व्यक्ती चोळप्पाला आपली धनाची पोटली सांभाळायला देतो, पण चोळप्पाच्या हाती आधीच एक पोटली
असल्यानी स्वामी खुद्द पोटली हातात घेऊन चालतात.
इकडे गोपाळ शेट आपल्या माणसाला सांगतो की ज्या व्यक्तीच्या हातात काही पोटली नाही त्याला धरुन आण.
गोपाळशेट ला स्वामींना धडा शिकवायचा होता,
म्हणे खूब देव-देव करतो जेव्हा अन्न-पाण्या शिवाय तळघरात डांबून ठेवणार तेव्हा बुद्धी ताळ्यावर येईल.
शेट चा माणूस जेव्हा येतो तेव्हा स्वामींच्या हाती धनाची पोटली असल्यानी त्यांना धरत नाही
आणी उलट ज्याची ती पोटली होती त्याच्या कडे काही नसल्यानी
त्यालाच धरुन आणतो.
गोपाळशेट ला पाहिजे तो व्यक्ती नसल्यानी राग येतो.
गोपाळ शेट त्या माणसाला डांबून ठेवतात आन्ही पुन्हा आपल्या माणसाला तीच
कामगिरी करायला पाठवतात.
योगा-योगानी पत्नी- वियोगानी दुखी झालेला माणूस लघु-शंकेला जायचं म्हणुन आपल्या हातातली पोटली स्वामींना देउन जायला निघतो.
तितक्यात गोपाळ शेट चा माणूस येऊन त्याला धरुन नेतो.
या वेळेला पण गोपाळ शेट चा बेत फसतो.
गोपाळ शेट बारकाईनी  विचार करतो की ज्या माणसांनी आपल्या कडून काहीही घेतले नाही त्यांना आपण पकडू शकलो नाही
आणी उलट ज्यांना पकाडायचे नव्हते ते पकडले गेले.
गोपाळ शेटला "हरी इच्छा बलीअसी" चा सुक्तीचा खरा अर्थ काय तो कळतो.
गोपाळ शेट स्वामींच्या शरणी येतो.
चोळप्पाला काय चालले आहे तेच कळत नाही.
स्वामी म्हणतात: "अरे व्यक्ती कितीही समर्थ असला तरी ज्याच्यावर ईश्वराची सावली असते त्याचे काहीही
वाईट करू शकत नाही. ही गोष्ठ गोपाळ शेटला आता कळली आहे."
"त्या दोन व्यक्तींच्या जीवनात आतापर्यंत जे घडले ते त्यांच्या कर्मा मुळे प्राप्त झालेल्या प्रारब्धा मुळे झाले."
गोपाळशेट प्रांजळ पणे हात जोडून उभा असतांना स्वामी म्हणतात:" अरे त्या निर्दोष लोकांना सोड!"
गोपाळ शेट मान्य करतो.
"लक्ष्यात घे, दान करणे चांगले आहे, पण दानाचा अहंकार नसावा."
"एका हातानी केलेले दान दुसऱ्या हाताला ही कळायला नको"
"दान करुन नाव-लोकिकाची अपेक्षा करणे हे दान नसुन व्यापार झाला."
गोपाळ शेटला चूक पटून तो पुढे नाव-लोकीकाची अपेक्षा न करायचं ठरवतो.

Sunday, July 17, 2011

माणसाची पारख

नरेंद्र महाराजांना एक अंगरक्षक पाहिजे होता पण पाहिजे तसा मिळत नव्हता.
त्यांच्या राज्यात एक वीर नावाचा व्यक्ती होता. नावा सारखाच तो खरा वीर होता पण दारिद्रानी गांजला होता.
या साठी तो नरेंद्र राजा कडे नौकरी मागायला जातो. रस्त्यात एक गुंड एक माणसाला लुटत होता,वीर प्राणांवर खेळून
त्या माणसाला वाचवतो.
राजाचे मुनीम हे पाहून त्याला राज्या कडे घेऊन येतात.
राज्याच्या अंगाराक्षकाचे काम करायला वीर तैयार होतो पण दिवसाला ५०० मोहोरा मागतो, एवढी जास्त रक्कम ऐकुन राजा
विचार करू असं म्हणुन त्याला परतावतो.
स्वामींशी भेट होता ते राजाला म्हणतात कि काही दिवस वीर ला ठेऊन परीक्षा पहा, उतीर्ण झालं तर नियुक्त करा, आम्ही स्वत:
परीक्षेत तुझी मदत करू.
वीरची नियुक्ती होते,तो आपलं काम योग्य पणे करतो.
एक दिवस राजाला एक स्त्री चे रुदन ऐकू येते. तो वीर ला कोण रडते आहे, हा तपास करायला सांगतो.
वीर शोध घेतो, ते त्याला एक सुंदर व कुलीन स्त्री रडतांना दिसते.
विचारल्यावर ती सांगते कि मी राज्याची राजलक्ष्मी आहे.पण आता राजाला सोडुन जाणार आहे.
आता राजा दरिद्री होणार.मागोमाग राजा येऊन गवाक्षातून हे एकत असतो.
वीर उपाय विचारतो.
राजलक्ष्मी म्हणते कि तुझ्या ३२ शुभ लक्षणानी युक्त मुलाची बळी दिली तर मी इथे थांबीन.
वीर घरी जाऊन संकल्प सोडुन विष पाजून आपल्या मुलाचा बळी देतो.
निपुत्रिक होऊन कसे जगायचे म्हणुन तो स्वत: ही विष पिऊन जीव देतो.
पती आणी पुत्र गेल्यावर त्याची पत्नी पण विष पिऊन प्राण त्यागते.
राजा पर्यंत गोष्ट येते, आपण राजा असून प्रजेचे रक्षण करू शकलो नाही याचा त्याला खंत वाटतो.
तो स्वताच्या तलवारींनी आपलीच मुंडकी छाटायला जातो पण तलवार मानेच्या एक बोटं पर्यंत येऊनच थांबते.
तितक्यात स्वामी प्रगट होतात.
स्वामी म्हणतात:" राजा तु कनवाळू आहे, आपल्या मुळे प्रजेचा जीव गेला याची तुला खंत वाटून तु प्राण द्यायला गेला.
राजा असाच असावा.आम्ही तुझ्या वर प्रसन्न आहो."
राजा स्वामींकडे वीर च्या परिवाराचे जीवन मागतो. स्वमिकृपेनी वीर परिवारा सकट जिवंत होतो.
मग स्वामी राजलक्ष्मी चे रूप दाखवून त्यांना जाणीव करुन देतात कि ही त्यांचीच रचना होती.
वीर आणी नरेंद्र राजा दोन्ही परीक्षेत उतीर्ण होतात.
स्वामी नरेंद्र राजाला म्हणतात: "उत्तम माणसांना ओळखा आणी त्यांना जपा."
"वस्तू उत्तम असली तर किम्मत ही उत्तम मोजावी लाजते."

Monday, July 11, 2011

मोहाचे पाश

बापट नावाचा एक व्यक्ती स्वामीभक्त होता.स्वामींच्या दर्शनासाठी आलेले लोकांची राहायची सोय तो करायचा,जे प्रेमानी मिळायचे ते स्वीकारायचा.
त्याची उपजीविका नाक्यावर जकात वसूल करायची होती.पण हळू-हळू त्याला लाच खाऊन लोकांना कमी कर घेऊन सोडायची वृत्ती होते.
काही दिवसांनी त्याच्या मुलाला दम्याची बाधा होते,दिवस प्रती-दिवस रोग वाढत जातो.
एक दिवस त्याच्या बोलवण्याला हुसकावून वैद्य दुसऱ्या गावी पाटीलाच्या मुलाला पाह्यला जातात.
बापट विचार करतो की आपण श्रीमंत नाही म्हणुन आपल्या कडे न येता वैद्यबुवा पाटला कडे गेले.
मग तो श्रीमंत व्हायला काहीही करायचे ठरवतो.
भयंकर लाच खायला लागतो. स्वामी दर्शनाला आलेले जे लोकं त्याच्याकडे मुक्काम करायचे त्या लोकांना अपमानित करुन भयंकर पैशे उकळतो.
काहीही करू पण श्रीमंत होऊ आणी चांगल्यात चांगला वैद्य आणून आपल्या शरदचा आजार बरा करू.
एक-दोन दा अटक व्हायची पण वेळ येते पण शिपायाला लाच देउन तो सुटतो.
आजार बरा होत नाही, म्हणुन तो स्वामींकडे सांकडं घालायला जातो.
स्वामी त्याला वाल्या-कोळ्याची गोष्ठ सांगतात.
त्या गोष्टीचा बोध असा -"आपले पापांचे आपणच जवाबदार असतो, पत्नी आणी मुलांना पाप करुन प्राप्त धनानि कितीही सुख दिले तरी ते पापाचे वाटेकरू
नसतात. म्हणुन माणसांनी नितीपूर्वक सचोटीने वागावे.घरच्यांना सुख देण्या साठी अडलेल्या-नडलेल्या लोकांचा छळ करू नये."
पण बापटवर काही परिणाम न होता तो परततो.
स्वामींनी काही आश्वासन न दिल्या बद्दल तो नाखुश असतो.
एकदा त्याचे चार मित्र येतात. ते आप-आपल्या परिवाराची सर्व व्यवस्था लाऊन, 'वैराग्य पत्करून स्वामी चरणात शेवटचे आयुष्य काढू',असा विचार करुन येतात.
त्यांचा मुक्काम बापट कडेच असतो. त्यांच्या समोर पुन्हा बापट ला अटक व्हायची वेळ येते पण त्या मित्र पैकी एकाची मोठ्या अधिकार्याशी मैत्री असल्या मुळे बापट पुन्हा सुटतो.
पण बापट आपलं वर्तन सुधारत नाही.
ते चारी जण स्वामींकडे येऊन आपला मनोगत सांगतात. स्वामी चोळप्पाला सांगून त्यांची राहण्याची व्यवस्था करवतात.
बापटला पुन्हा अटक होते पण या वेळेला तो काहीही करुन सुटत नाही.
इकडे शरदचा रोग फार वाढतो. बापटची बायको मनात स्वामींची करुणा भाकते.
स्वामी चोळप्पा च्या हाती औषध पाठवतात.ते औषध खाऊन शरद अगदी खड-खडीत बरा होतो.
एका रात्री चारी मित्र झोपले असतांना, रात्री चोर त्यांच सामान चोरी करता..
ते सर्व विलाप करतात आणी दुसऱ्या दिवशी स्वामी कडे घाराणं घालतात.
स्वामी म्हणतात: " छान झालं ! सुंठेवाचून खोकला गेला!"
"अरे तुम्ही सर्वस्व त्याग करुन वैराग्य पत्करायला आले ना? मग जरासे ऐवज गेले तर का विलाप करतात?"
"अरे वैराग्य सोपे नाही, आधी ते मनात आले पाहिजे. मनात वैराग्य नसले आणी जर घर-दार सोडून वनात जाणार तर वनात दुसरे घर तयार होईल."
"आधी मनातून मोह,चिंता,लालसा हे सर्व शत्रू काढा, तेव्हा खंर वैराग्य येईल."
बापट ची बायको शरद ला घेऊन स्वामी कडे आभार व्यक्त करायला येते.अटक झालेला बापट सुद्धा शिपायाची गया-वया करुन येतो.
स्वामी म्हणतात:" अरे बापटा ! शरद तुझ्या वाईट कर्मांच्या फळा मुळेच आजारी पडला होता.
"आणी ते वाईट कर्म गुरु-भक्ती किंवा नामस्मरण करुन नष्ट करायचे सोडुन तु आणखी वाईट कर्मांचा भर घालत होता,"
"म्हणूनच शरद चा आजार वाढत जात होता."
"अरे पानं-पाचोळ्याला लागलेला विस्तव अजून पानं घालुन कसा शांत होणार, आणी तु नामस्मरणाचे पाणी घालायच्या जागी आणखी पानं घालुन
तो विस्तव वाढवत होता."
"आम्ही तुला वाळ्याची गोष्ठ सांगितली तरीही तुला काहीही बोध झालं नाही."
"अरे वाळ्यानी अफाट पाप केले पण त्याच्या तोडीचे नामस्मरण करुन ते नष्ट केले."
"पाप करतांना सहज होत गेले पण त्यांचा विमोड करतान त्याला कठोर तपस्या करावी लागली."
"आणी तपस्या पण साधी नाही, जेवढा वेळ पाप करण्यात गेला त्याच्या अनेक-पट वेळापर्यंत त्याला तपस्या करावी लागली."
"एवढा एकनिष्ठ झाला कि शरीरावर मुंग्यांनी वारूळ केले तरी त्याला कळले नाही."
बापटला आपली चूक कळते, तो पुन्हा पहिल्या सारखा सचोटीनी आणी निष्ठेनी वागण्याचं ठरवतो."

Sunday, July 3, 2011

(६८) पेढ्यांची सांखळी

माधव आणी मंगेश  सक्खे भाऊ होते. मंगेश हा धाकटा होता. दोघेही स्वामी भक्त होते.
त्यांच्या घरी दत्ताच्या पादुका होत्या आणी दोन्ही भाऊ अगदी निष्ठेनी त्या पादुकांच पूजन करायचे.
पूजेच्या तैयारीची जवाबदारी दोघांच्या बायकांवर होती.मोठी जाऊ कामचुकार होती आपली जवाबदारी नीट पार पडायची नाही आणी
छोटी तिच्या ठरलेल्या दिवसा शिवाय पूजेची व्यवस्था करायला तैय्यार नसायची.
त्यांच्यात याच्यावरून भांडण होत राहायचे.
दोघी भावांना स्वामी सांगतात:- "अरे घराची व्यवस्था नीट ठेवणं हे पुरुषा पेक्ष्या स्त्रीच्या हाती जास्त असतं."
"पुरुषांनी स्त्रीच्या जास्त आहारी जाऊ नये. जे योग्य आहे तेच करावं."
लहान मुलांच्या भांडणावरून पुन्हा दोन्ही जावांच भांडण होतं. मोठी जाऊ छोटीच्या मुलावर हात उगारते.
मंगेश विरोध करतो आणी त्यावरून दोघा भावात भांडण होतात.
काही दिवसांनी माधवला त्याचा मित्र श्याम स्वामींचा प्रसाद म्हणुन पेढा देतो आणी सांगतो -
 "अशेच २१ जणांना पेढे वाटायचे आणी
ज्याला पेढा मिळाला त्यांनी पण २१ लोकांना पेढे वाटायचे, पेढ्याची सांखळी तुटता कामा नये.
जो असं करेल त्यावर स्वामी कृपा करतील आणी
जो नाही करणार त्याच्यावर स्वामींचा कोप होईल"
.माधव पेढे वाटतो.

मुळात दोघा भावात आपसात फार प्रेम असतं या मुळे दोघांनाही या गोष्ठीची खंत वाटतो.ते दोघे एक-मेकाची
क्षमा मागून समेट करतात. मंगेश ला एकविसावा पेढा देउन माधव त्याला साखळी कायम ठेव अस सांगतो.
पण मंगेश खऱ्या अर्थानी स्वामी भक्त होता तो अश्या अंध-विश्वासांना मानत नव्हता.
पेढे नाही वाटले तर स्वामी कोपतील, ही एक भ्रामक कल्पना आहे असं म्हणुन तो आपल्या मोठ्या भावाला सांगतो पण माधवला
पटत नाही.
पुन्हा एकदा बायकांच्या भांडणावरून दोघा भावात विवाद होतो.
पुन्हा समेट करतांना माधव मंगेश ला सांगतो कि तु पेढ्याची सांखळी मोडली म्हणून आपल्यात भांडण झालं
तरीही मंगेश चा विश्वास बसत नाही.
एकदा तर हद्दच होते. छोट्या जाऊबाईनी केलेल्या पापडा वर मोठी जाऊ घेरी आल्याच निमित्त करुन पाण्याचा घडा पाडते.
सर्व पापड खराब होतात.या वेळेला भांडण फार उग्र होउन शेवटी दोघा भावांची वेगळं व्हायची वेळ येते.
मंगेश वेगळा जायला निघतो पण दत्त-पादुका बरोबर न्यायला जातो ,माधव सांगतो कि पादुका मोठ्या भावा कडेच राहणार.
मंगेश ऐकत नाही आणी पादुका उचलायला जातो, यावरून माधव त्याला बेदम मारून हकलून देतो.
मंगेश स्वामींकडे जाऊन आपलं घाराणं सांगतो.
मग मंगेश एक क्रूर वाक्य म्हणतो कि जर माधव आणी त्याचा मुलगा मेले तर पादुका आपल्याला मिळतील.
स्वामी थोडसं रागवून त्याला साम्झावतात- "अरे काय पादुका-पादुका करत आहे? अरे देव काय फक्त पादुकात असतो का?"
"अरे जली,स्थळी,काष्ठी पाषाणी व सर्व जीवात  देव असतो."
"देव सर्वत्र व्याप्त आहे- देव नाही असं कोणचच ठिकाण नाही."
"अरे देवाची निर्गुण उपासना कर,पादुका तर उपासना करण्यात सहायता करतात पण पादुका नसल्या तर उपासनाच करता येत नाही
असं मानणं चुकीचं आहे.त्या पादुकांसाठी आपल्या भावा आणी पुतण्याची मृत्यु इच्छितो, काही वाटतं कि नाही तुला?"
मंगेश मान खाली घालुन परततो.
इकडे  चोळप्पा स्वामींनी काहीही सांगितलेलं कार्य स्वता न करता राघवच्या हाती करवून घेत होता.
एका शिष्यांनी विचारल्यावर स्वामी सांगतात कि  चोळप्पा हा पूर्व आयुष्यात गडगंज श्रीमंत  असल्यानी त्याच्यात ही वृत्ती आहे पण
त्याच्या आध्यात्मिक प्रगतीत बाधक ही गोष्ठ आम्ही दुर करू.
एकदा असच स्वामींनी दिलेलं कार्य चोळप्पा राघव ला सांगतो.
स्वामी रागावतात:- "अरे चोळ्या स्वता होऊन आमची सेवा करण्याच तु पत्करलं आहे ना? मग आम्ही दिलेले कार्य
करायला तुला पड-सेवेकरी कशाला पाहिजे?"
" 'अरे शिष्याला "दीर्घदण्डं नमस्कृत्य निर्लज्जो गुरुसन्निधौ' या वृत्तींनी गुरु कडे वावरलं पाहिजे."
(जगाची परवा न करता निर्लज्य होऊन शिष्यांनी गुरुला दंडवत नमस्कार केलं पाहिजे)
"अरे हे कार्य आमी तुमचा अहं भाव जायला करवतो,जो तुमच्या आध्यात्मिक प्रगतीत बाधक आहे."
"वरना हमे किसी से कोई काम करवाने की  जरुरत नही है."
चोळप्पा चूक मान्य करतात.
तिकडे घरी जाऊन मंगेशला कडकडून ताप येतो. काहीही केल्या ताप उतरत नाही. मंगेश ला वाटतं कि पेढ्यांची साखळी
मोडल्या मुळे हे सर्व झालं असावं.
 घरी पूजा करत असतांना माधव चा एक हात निकामी होतो.
दुसऱ्या दिवशी आप-आपल्या रोगापासून हैराण होऊन दोघे भाऊ स्वामींकडे येतात.
मंगेश म्हणतो-" स्वामी पेढ्यांची सांखळी तुटल्या मुळे माझ्यावर त्रासांचा मारा होत आहे".
माधव पण आपल्या समस्येसाठी सांखळी तुटायला कारणीभूत ठरवतो.
स्वामी जाम भडकतात:-" महा मूर्खांनो ! सांखळी तुटल्यानी काही झालं नाही. तुम्ही सर्व आपल्या कर्मामुळे दुखी झाला आहे."
"मंगेश तु पादुकांसाठी आपल्या भाउ आणी पुतण्याची मृत्यु इच्छिली."
"आणी माधव तु आपल्या पातळयंत्री आणी कामचुकार बायकोच्या सांगण्यात येऊन आपल्या भावाशी भांडण केले,
त्याला बेदम मारलं."
"अरे सांखळीचा आध्यात्मिक दशहतवाद कौन पसरवतो याचा विचार का नाही केला?
"पेढे खपल्या मुळे कुणाला फायदा होणार एवढी छोटीशी गोष्ठ तुम्ही सर्वांच्या लक्ष्यात कशी नाही आली?"
दोन्ही भाऊ आपली चूक मान्य करतात.
स्वामी म्हणतात:-"माधवा,आपल्या छोट्या भावाला प्रेमानी कुशीत घे."
माधव म्हणतो :"-स्वामी पण माझा हात निकामी झाला आहे."
स्वामींच्या कृपादृष्टीनी माधव चा हात बरा होतो, तो मंगेशला कुशीत घेतो,
आणी चटकन ओरडतो-"अरे मंगेश तुझा ताप पूर्णपणे उतरला आहे."
स्वामी कृपेनी दोघे भाऊ पूर्णपणे निरोगी होतात.
आता मागे झालेल्या चुकांना विसरून ते पुन्हा गुणा-गोविंदांनी एकत्र रहाण्याचं ठरवतात.