नरेंद्र महाराजांना एक अंगरक्षक पाहिजे होता पण पाहिजे तसा मिळत नव्हता.
त्यांच्या राज्यात एक वीर नावाचा व्यक्ती होता. नावा सारखाच तो खरा वीर होता पण दारिद्रानी गांजला होता.
या साठी तो नरेंद्र राजा कडे नौकरी मागायला जातो. रस्त्यात एक गुंड एक माणसाला लुटत होता,वीर प्राणांवर खेळून
त्या माणसाला वाचवतो.
राजाचे मुनीम हे पाहून त्याला राज्या कडे घेऊन येतात.
राज्याच्या अंगाराक्षकाचे काम करायला वीर तैयार होतो पण दिवसाला ५०० मोहोरा मागतो, एवढी जास्त रक्कम ऐकुन राजा
विचार करू असं म्हणुन त्याला परतावतो.
स्वामींशी भेट होता ते राजाला म्हणतात कि काही दिवस वीर ला ठेऊन परीक्षा पहा, उतीर्ण झालं तर नियुक्त करा, आम्ही स्वत:
परीक्षेत तुझी मदत करू.
वीरची नियुक्ती होते,तो आपलं काम योग्य पणे करतो.
एक दिवस राजाला एक स्त्री चे रुदन ऐकू येते. तो वीर ला कोण रडते आहे, हा तपास करायला सांगतो.
वीर शोध घेतो, ते त्याला एक सुंदर व कुलीन स्त्री रडतांना दिसते.
विचारल्यावर ती सांगते कि मी राज्याची राजलक्ष्मी आहे.पण आता राजाला सोडुन जाणार आहे.
आता राजा दरिद्री होणार.मागोमाग राजा येऊन गवाक्षातून हे एकत असतो.
वीर उपाय विचारतो.
राजलक्ष्मी म्हणते कि तुझ्या ३२ शुभ लक्षणानी युक्त मुलाची बळी दिली तर मी इथे थांबीन.
वीर घरी जाऊन संकल्प सोडुन विष पाजून आपल्या मुलाचा बळी देतो.
निपुत्रिक होऊन कसे जगायचे म्हणुन तो स्वत: ही विष पिऊन जीव देतो.
पती आणी पुत्र गेल्यावर त्याची पत्नी पण विष पिऊन प्राण त्यागते.
राजा पर्यंत गोष्ट येते, आपण राजा असून प्रजेचे रक्षण करू शकलो नाही याचा त्याला खंत वाटतो.
तो स्वताच्या तलवारींनी आपलीच मुंडकी छाटायला जातो पण तलवार मानेच्या एक बोटं पर्यंत येऊनच थांबते.
तितक्यात स्वामी प्रगट होतात.
स्वामी म्हणतात:" राजा तु कनवाळू आहे, आपल्या मुळे प्रजेचा जीव गेला याची तुला खंत वाटून तु प्राण द्यायला गेला.
राजा असाच असावा.आम्ही तुझ्या वर प्रसन्न आहो."
राजा स्वामींकडे वीर च्या परिवाराचे जीवन मागतो. स्वमिकृपेनी वीर परिवारा सकट जिवंत होतो.
मग स्वामी राजलक्ष्मी चे रूप दाखवून त्यांना जाणीव करुन देतात कि ही त्यांचीच रचना होती.
वीर आणी नरेंद्र राजा दोन्ही परीक्षेत उतीर्ण होतात.
स्वामी नरेंद्र राजाला म्हणतात: "उत्तम माणसांना ओळखा आणी त्यांना जपा."
"वस्तू उत्तम असली तर किम्मत ही उत्तम मोजावी लाजते."
No comments:
Post a Comment