Monday, July 11, 2011

मोहाचे पाश

बापट नावाचा एक व्यक्ती स्वामीभक्त होता.स्वामींच्या दर्शनासाठी आलेले लोकांची राहायची सोय तो करायचा,जे प्रेमानी मिळायचे ते स्वीकारायचा.
त्याची उपजीविका नाक्यावर जकात वसूल करायची होती.पण हळू-हळू त्याला लाच खाऊन लोकांना कमी कर घेऊन सोडायची वृत्ती होते.
काही दिवसांनी त्याच्या मुलाला दम्याची बाधा होते,दिवस प्रती-दिवस रोग वाढत जातो.
एक दिवस त्याच्या बोलवण्याला हुसकावून वैद्य दुसऱ्या गावी पाटीलाच्या मुलाला पाह्यला जातात.
बापट विचार करतो की आपण श्रीमंत नाही म्हणुन आपल्या कडे न येता वैद्यबुवा पाटला कडे गेले.
मग तो श्रीमंत व्हायला काहीही करायचे ठरवतो.
भयंकर लाच खायला लागतो. स्वामी दर्शनाला आलेले जे लोकं त्याच्याकडे मुक्काम करायचे त्या लोकांना अपमानित करुन भयंकर पैशे उकळतो.
काहीही करू पण श्रीमंत होऊ आणी चांगल्यात चांगला वैद्य आणून आपल्या शरदचा आजार बरा करू.
एक-दोन दा अटक व्हायची पण वेळ येते पण शिपायाला लाच देउन तो सुटतो.
आजार बरा होत नाही, म्हणुन तो स्वामींकडे सांकडं घालायला जातो.
स्वामी त्याला वाल्या-कोळ्याची गोष्ठ सांगतात.
त्या गोष्टीचा बोध असा -"आपले पापांचे आपणच जवाबदार असतो, पत्नी आणी मुलांना पाप करुन प्राप्त धनानि कितीही सुख दिले तरी ते पापाचे वाटेकरू
नसतात. म्हणुन माणसांनी नितीपूर्वक सचोटीने वागावे.घरच्यांना सुख देण्या साठी अडलेल्या-नडलेल्या लोकांचा छळ करू नये."
पण बापटवर काही परिणाम न होता तो परततो.
स्वामींनी काही आश्वासन न दिल्या बद्दल तो नाखुश असतो.
एकदा त्याचे चार मित्र येतात. ते आप-आपल्या परिवाराची सर्व व्यवस्था लाऊन, 'वैराग्य पत्करून स्वामी चरणात शेवटचे आयुष्य काढू',असा विचार करुन येतात.
त्यांचा मुक्काम बापट कडेच असतो. त्यांच्या समोर पुन्हा बापट ला अटक व्हायची वेळ येते पण त्या मित्र पैकी एकाची मोठ्या अधिकार्याशी मैत्री असल्या मुळे बापट पुन्हा सुटतो.
पण बापट आपलं वर्तन सुधारत नाही.
ते चारी जण स्वामींकडे येऊन आपला मनोगत सांगतात. स्वामी चोळप्पाला सांगून त्यांची राहण्याची व्यवस्था करवतात.
बापटला पुन्हा अटक होते पण या वेळेला तो काहीही करुन सुटत नाही.
इकडे शरदचा रोग फार वाढतो. बापटची बायको मनात स्वामींची करुणा भाकते.
स्वामी चोळप्पा च्या हाती औषध पाठवतात.ते औषध खाऊन शरद अगदी खड-खडीत बरा होतो.
एका रात्री चारी मित्र झोपले असतांना, रात्री चोर त्यांच सामान चोरी करता..
ते सर्व विलाप करतात आणी दुसऱ्या दिवशी स्वामी कडे घाराणं घालतात.
स्वामी म्हणतात: " छान झालं ! सुंठेवाचून खोकला गेला!"
"अरे तुम्ही सर्वस्व त्याग करुन वैराग्य पत्करायला आले ना? मग जरासे ऐवज गेले तर का विलाप करतात?"
"अरे वैराग्य सोपे नाही, आधी ते मनात आले पाहिजे. मनात वैराग्य नसले आणी जर घर-दार सोडून वनात जाणार तर वनात दुसरे घर तयार होईल."
"आधी मनातून मोह,चिंता,लालसा हे सर्व शत्रू काढा, तेव्हा खंर वैराग्य येईल."
बापट ची बायको शरद ला घेऊन स्वामी कडे आभार व्यक्त करायला येते.अटक झालेला बापट सुद्धा शिपायाची गया-वया करुन येतो.
स्वामी म्हणतात:" अरे बापटा ! शरद तुझ्या वाईट कर्मांच्या फळा मुळेच आजारी पडला होता.
"आणी ते वाईट कर्म गुरु-भक्ती किंवा नामस्मरण करुन नष्ट करायचे सोडुन तु आणखी वाईट कर्मांचा भर घालत होता,"
"म्हणूनच शरद चा आजार वाढत जात होता."
"अरे पानं-पाचोळ्याला लागलेला विस्तव अजून पानं घालुन कसा शांत होणार, आणी तु नामस्मरणाचे पाणी घालायच्या जागी आणखी पानं घालुन
तो विस्तव वाढवत होता."
"आम्ही तुला वाळ्याची गोष्ठ सांगितली तरीही तुला काहीही बोध झालं नाही."
"अरे वाळ्यानी अफाट पाप केले पण त्याच्या तोडीचे नामस्मरण करुन ते नष्ट केले."
"पाप करतांना सहज होत गेले पण त्यांचा विमोड करतान त्याला कठोर तपस्या करावी लागली."
"आणी तपस्या पण साधी नाही, जेवढा वेळ पाप करण्यात गेला त्याच्या अनेक-पट वेळापर्यंत त्याला तपस्या करावी लागली."
"एवढा एकनिष्ठ झाला कि शरीरावर मुंग्यांनी वारूळ केले तरी त्याला कळले नाही."
बापटला आपली चूक कळते, तो पुन्हा पहिल्या सारखा सचोटीनी आणी निष्ठेनी वागण्याचं ठरवतो."

No comments:

Post a Comment