Friday, December 31, 2010

(४३) वाममार्गा पासुन परावृत्ती

वामनराव घोलप एका चांगल्या सरकारी हुद्यावर होता.पण त्याला लाचखोरी आणी जारकर्माची वाईट सवय लागली होती.
त्याबद्दल त्याची पत्नी अंजनी स्वामींपाशी घाराणं घालते.
स्वामी लक्ष्य देऊ असं सांगतात.अंजनीनी वामनाला समझवायचा प्रयत्न केला पण वामन उलट तिच्याशीस मारहाण करतो.
वामनाचे गाडगीळ नावाच्या गृहस्थाच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते.
एकदा गाडगीळ त्या दोघांना प्रत्यक्ष रंगे हात पकडतो पण उन्मत्त वामन गाडगीळशीच मारहाण करतो.
गाडगीळ पोलिसात तक्रार नोंदवतो, त्यामुळे वामना वर खटला मांडला जातो.या बद्दल त्याच्या सुटकेसाठी अंजनी स्वामींपाशी
 घाराणं घालते.
स्वामी तिला आश्वस्त करतात.
न्याय मंदिरात पण वामन उर्मटा सारखा बोलतो पण काय, सर्व साक्ष्य वामनच्याच पक्षात बोलतात.
वामनला पण आश्चर्य होतं.
शेवटी खटल्याचा निकाल वामनच्या पक्षात होतो.
गाडगीळ त्याला येऊन सांगतो की स्वामीनी त्याला स्वप्नात दृष्टांत दिला होता म्हणुन त्यानीच साक्ष्यांना त्याच्या पक्ष्यात
साक्ष्य द्यायला सांगितलं होतं.
स्वामींच्याच आज्ञेनीच त्यांनी आपल्या पत्नीला सुद्धा माफ केले आहे.
हे ऐकुन वामनला उपरती होते. सर्व जण स्वामींकडे जातात.
स्वामी स्पष्ट सांगतात की अंजनीच्या पुण्यानीच वामनाची सुटका झाली आहे.
वामन क्षमा मागून पुन्हा वाममार्गी न जायचा प्राण करतो.

Friday, December 24, 2010

(43) सत्कार्माचा सुद्धा अहंकार नसावा

केशव देशपांडे नावाचा एक गृहस्थ धार्मिक होता.
त्याची पत्नी संगीता पती-परायण आणी कर्तव्यनिष्ठ होती,.
केशव कडे दत्त जयंतीचा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा व्हायचा.
संपूर्ण गावाला त्या दिवशी प्रसाद म्हणुन जेवण देण्यात यायचं.
एका वर्षी त्याची आर्थिक स्थिती घालवलेली असल्यामुळे  तो गाव-जेवणाचा बेत रद्द करतो,
त्या एवजी ११ ब्राह्मण आणी स्वामींना बोलवायच ठरवतो.
त्या साठी तो स्वामींना आमंत्रण  करायला जातो, रस्त्यात त्याला एक कुष्ठ रोगी भेटतो.
तो सुद्धा स्वामींकडे रोग मुक्ती ची अभिलाषा घेऊन जात असतो.
केशव स्वामींना आपलं मनोगत सांगतो. इकडे तो रोगी स्वामींच्या खूब मागे उभा राहतो.
स्वामी केशवकडून चंदनाचं खोड मागवतात, ते खोड मागे उभ्या असलेल्या रोग्याला देतात.
स्वामी म्हणतात:-" हे घे ! उगाळून लाव ,तुझा रोग बरा होईल."
मग स्वामी म्हणतात:- "तुझ्या घरी आम्ही दत्त जयंतीला येऊ, तु फक्त १० ब्राह्मणांना बोलव, अकाराव्वा आम्ही घेऊन येऊ."
तिकडे ते चंदन उगाळून लावल्या मुळे रोगी पूर्णतह रोग मुक्त होतो.
तो कृतज्ञा भावांनी स्वामी कडे येतो पण दुरूनच स्वामींना नमस्कार करतो.
कारण विचारल्यावर तो आपली कनिष्ठ जात आहे, अस सांगतो.
स्वामी म्हणतात:- "अरे तु जवळ येत नाही तर आम्हीच तुझ्या जवळ येऊ."
"अरे सर्व जीव परमेश्वरानी निर्मित केले आहे, त्यात भेद कश्या पाई धरायचा?"
मग केशवला सम्बोधन करुन म्हणतात :-" केशव हाच तुझा अकरावा ब्राह्मण."
केशव पहिले सटपटतो , मग स्वामी त्याला पटवून देतात की मनुष्य कर्मानी  ब्राह्मण असतो जन्मानी नाही."
केशव सहमत होतो.
दत्त  जयंतीच्या दिवशी स्वामी शिष्यासह केशव कडे जातात.
केशव यथासांग स्वामींचं पूजन करतो.
मग ताटं वाढायच्या वेळेला तो पाहतो की पूर्ण गाव प्रसाद ग्रहण करायला आला आहे.
सर्व गावकरी हेच गृहीत धरतात की काही निमित्या कारण आपल्याला निमंत्रण दिलं गेलं नसाव, पण दरवर्षी प्रमाणे आपल्याला जायलाच  हवं.
सर्व गाववृंद पाहून केशव भितीनी गारठून जातो.
तो स्वामींना सांगतो की अन्न फक्त आमंत्रित लोकापुर्तच आहे.
स्वामी त्याला  नारळ देतात आणी सांगतात याचं पाणी अन्नावर प्रोक्षण कर, म्हणजे अन्न सर्वांना पुरेल.
केशव तसच करतो.
केशव आणी संगीता जेवण वाढायला सुरुवात करतात. ते सर्व अन्न वाढायच्या भांड्यात घेतात, आणी स्वयंपाकाचे भांडे रिकामे होतात.
बाहेर ते सर्व अन्न वाढून  येतात तर ते पाहतात काय की सर्व भांडे पुन्हा भरलेले आहे.
अस अनेकदा होतं. सर्व गावकरी तृप्त होतात तरी अन्न शिल्लक राहतं.
केशव गहिवरून स्वामींचे आभार मागतो:-"स्वामी तुमच्या मुळे गावा समोर माझी अब्रू गेली नाही.
मी  या वर्षी जेवण   देऊ शकलो नाही तरी
तुमच्या मुळे हे सर्व शक्य झालं."
स्वामी थोड्या कठोर शब्दात समझ देतात:-" अरे! हे  मी-मी काय लावलं आहे? मी जेवण  देतो, मी  उत्सव करतो."
"अरे सर्व जेवण ईश्वर देतो, तु फक्त निमित्य मात्र आहे."
"अरे कुणालाही जे काही मिळते ते ईश्वरामुळे मिळतं, देणारा माणूस फक्त निमित्य मात्र असतो.
"म्हणुन दान,धर्म इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल गर्व बाळगू नये."
"मनुष्याला अहंकार नसावा फक्त समाधान असावं."
"अरे ह्या अहंकार मुळेच मनुष्य ८४ लक्ष्य योनीत फिरत राहतो."
"मोक्ष मार्गावर चालायचं असेल तर मनुष्याला अहंकार नसावा."

Friday, December 17, 2010

(४२) विचित्र समस्या

एका गृहस्थाच्या मुलीला एक विचित्र समस्या झाली होती. तिच्या पोटात गर्भ वाढला असून पण तिला न बाळ होत होता,न गर्भपात होत होता.
जवळ-जवळ ३ वर्ष ती अशीच वाढलेल्या पोटानी वावरायची. त्या मुळे तिच्या पतीनी तिला माहेरी आणून सोडलं होतं
आणी तो काडी-मोडीच्या तैयारीत होता.
कुणाच्या तरी सांगण्यावरून तो गृहस्थ स्वामींकडे येतो.
स्वामी तेव्हा मुलाबरोबर गोट॒या  खेळत होते. त्यांना मुलांबरोबर खेळतांना पाहून त्या गृहस्थाच्या मनात संकल्प-विकल्प येतात: -"अरे आपण आपल्या मुलीसाठी काय नाही केलं? ओषधं,पूजा-पाठ,अनुष्ठान,दान इत्यादी.
आणी आता आपण स्वामींकडे आलो आहे, पण मुलाबरोबर मातीत गोट॒या खेळणारे स्वामी आपली काय मदत करतील?"
तितक्यात स्वामी कडाडून बोलतात -"अरे आमच्या वर विश्वास नाही तर इथे कशाला उभा आहे, चल चालता हो.
तुझ्या मुलीला गर्भ जाऊन तीन वर्ष झाली तरी अपत्य नाही होत ना?
आम्ही मुलामध्ये गोट॒या खेळतो म्हणुन आम्ही काय करू शकणार?"
स्वामी अंतर्यामी आहे, असं जाणुन तो गृहस्थ स्वामी चरणी नत-मस्तक होऊन क्षमा मागतो.
करुणामयी स्वामी त्याला आपलं चरणतीर्थ मुलीला पाजायला सांगतात.

गृहस्थ तसच करतो, त्यामुळे त्याची मुलगी सुखरूप प्रसूती होऊन पुत्र प्राप्त करते.
गृहस्थ अनन्य भावांनी  स्वामी कडे येतो व त्याची इच्छा स्वामींना पंच-पक्वानाचं जेवण घालायची असते.
स्वामी समाधीत असल्यानी त्याला ते करता येत नाही.यावर चोळप्पा सुचवतात कि तुम्ही ७ दिवस ब्राह्मणांना भोजन करवा.
ते भोजन स्वामी पर्यंत पोचेल.
गृहस्थ तसच करतो. इकडे स्वामी ७ दिवस पर्यंत भोजन सुद्धा करत नाही.
शिष्य आग्रह करतात तेव्हा स्वामी आपलं पोट भरलं आहे, असं सांगतात.
ब्राह्मणजेवणाची सांगता करुन गृहस्थ स्वामींकडे परततो.
तो स्वामींना आपलं भोजन करवायाचं मनोगत सांगतो.
स्वामी म्हणतात:-"अरे किती वेळा आम्हाला जेवण घालणार? सात दिवसापासून रोज आग्रह करुन-करुन पंच-पकवान खायला घातले. आता पुन: तोच आग्रह का करतो आहे?"
गृहस्थाला काहीपण उमजत नाही, तितक्यात त्याला स्वामीच्या जागी आपण जेवण घातलेला ब्राह्मण दिसतो.
त्याला पटतं कि स्वामींनी ब्राह्मण रुपात येऊन भोजन  ग्रहण केले आहे.
तो समाधानपूर्वक आनंदानी घरी परततो.


Thursday, December 16, 2010

(४१) मोहा पासुन सावध राहा

गणेश सोहनी नावाचा एक अम्मलदार होता. तो श्रीमंत घराण्याचा  होता.गावात त्याचं नावलौकिक होतं.
त्याची पत्नी  शारदा देखणी आणी पती-परायण होती. 
त्याला श्रीपाद नावाचा एक गोंडस पुत्र पण होता.
इतकं सर्व अनुकूल प्रारब्ध असतांनाही तो एका सुगंध नावाच्या भाविणीच्या प्रेमात पडला होता.
आपल्या संसाराकडे दुर्लक्ष्य करुन तो पूर्ण पणे तिच्या प्रेमात गुंतला होता.
त्याची आई त्याला समझावते तरीही त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही.
त्याचा वरिष्ठ अधिकारी पण त्याला समझवतो पण गणेश उलट त्यांच्याशिच  उर्मटपणे वागतो.
खुद्द स्वामी साधूरुपात त्याला समझ देतात तरीही तो स्वामीआज्ञा  दुमानत नाही.
त्याच्या या  कृष्णकृत्या मुळे श्रीपाद आणी शारदाला लोकांच नाही-नाही ते ऐकाव लागत,पण काहीही झाल्या गणेशवर काहीही परिणाम होत नाही.
शेवटी गणेशची आई स्वामींकडे घाराणं घालते. स्वामी त्यांना एक उपाय योजना सांगतात.
त्या प्रमाणे स्वामी त्याचं दिवशी गणेशच्या घरी येतात. गणेश सुद्धा तातडीनी येतो आणी स्वामी चरणी नतमस्तक होतो.
स्वामी ताडकन तिथुन उठतात आणी परततात.
गणेशनी विचारल्यावर ते म्हणतात:- "तुझ्या कडे आम्हाला विटाळ होतो!".
बाळप्पा, गणेशला स्वामींचा इशारा 'भावीणीचा त्याग कर', असं आहे , सांगतात.
तरीही गणेश हे मान्य करायला तैयार नसतो.
शेवटी गणेश ची आई त्याला घरा बाहेर काढते,
गणेश सरळ सुगंधा कडे जातो.
तिथे सरकारी शिपाई येऊन सांगतो कि सरकारनी त्याचावर  अफरा-तफरीचा आळ लावून बडतर्फ केलं आहे.
इतकच नाही त्याची सर्व माल-मत्ता आणी संपत्ती पण  जब्त केली आहे.
हे सर्व ऐकल्यावर सुगंधाचं खंर रूप समोर येतं, ती गणेशला नाही-नाही ते बोलते
आणी गरीब झाल्यामुळे  त्याची विटंबणा करते.
शेवटी गणेशला तिच्या वाड्यातून हकलण्यात येतं.
गणेश घरी परततो. तिथे परतून तो घरच्यांची क्षमा मागतो.
तिथे त्याला कळतं कि शिपाई जे म्हणाला तस काहीही झालं नाही आहे.
गणेश ची आई म्हणते:-" अरे तुझ्या डोळ्यावर आलेलं झापड काढण्या साठीच ही  स्वामींनी लीला केली आहे."
तु त्या भाविणीच्या खोट्या प्रेमामुळे आप्तजनाना विसरला होता.आपलं कर्तव्य विसरला होता."
सर्व लोकं स्वामींकडे जातात.
स्वामी म्हणतात:-" अरे मोहापासुन सावध राहिलं पाहिजे, मोह हा मोक्षाच्या वाटचालीत फार मोठ्ठी बाधा आहे.
त्याच्या आहारी गेलो तर अधोपतन निश्चित असतं."

Saturday, December 4, 2010

(40)वृक्ष वल्ली आम्हा सोयरी

गणपत नावाचा एक स्वामी भक्त होता. त्याच्या बायकोच नाव वसुधा होतं.
थोडक्यात त्यांचा संसार सुखात चालला होता.
एक दिवस गणपत स्वामींना आपल्या घरात आमंत्रित करतो, स्वामी आजच तुझ्या कडे येऊ असं सांगतात.
गणपत आनंदानी घरी परततो.गणपत च्या घरात त्याचं दिवशी त्याची सासुबाई येते.
गणपत च्या घरा बाहेर एक कडू लिम्बाचं झाड असतं.त्या झाडावर त्याच्या आईचा फारच जिव्हाळा असतो.
आल्या बरोबर वसुधाची आई वसुधा ला त्या झाडा ला कापव असा आग्रह धरते.
तिच्या मते भरलेल्या आणी सुखात नांदणाऱ्या घरा समोर असं झाड नको.
तिच्या फार आग्रहानी वसुधा नवऱ्याशी ते झाड कापण्यासाठी हट्ट धरते.
स्त्री हट्टा पुढे हार पत्करून नवरा झाड कापवायला तैयार होतो.
लाकुडतोड्याचा पहिलाच वार झाडावर पडणार तेव्हाच स्वामी तीथे येतात.
आल्याबरोबर ते गणपत ला फार रागावतात:- " मुर्खा...! गाढवा !
अरे हिरव्या गार झाडाला कशाला कापवतो आहे. अरे वृक्षा मुळेच आपल्याला प्राण वायू मिळते.
अरे नीम वृक्षामुळे रोग पसरवणारे जीवांचा नाय- नाट होतो.
अरे अश्या झाडाला कापण्याचा विचार तरी कसा येतो तुमच्या मनात."
असं म्हणुन स्वामी तिथुन ताडकन निघून जातात.
सर्व जण स्वामींच्या मागे जातात.
स्वामी त्यांना एका जागेवर बसलेले दिसतात त्यांच्या काना जवळ रक्ताच्या धारा वाहत असतात.
गणपत च्या उपचार करण्याच्या गोष्टीवर स्वामी चक्क नकार देतात.
गणपत पण म्हणतो-" माझ काहीही झालं तरी मी तुमचा उपचार करणारच."
तितक्यात स्वामींचा घाव आपोआप नाहीसा होतो, वाहणारं रक्त थांबतं.
सर्व थक्क होतात.
स्वामी म्हणतात:-" आम्हाला घाव नव्हताच आम्ही फक्त संभ्रम उत्पन्न केला होता.
तुम्हा लोकांच्या मनावर जसा परिणाम झालं तसाच परिणाम तुम्ही लोकं दुसऱ्याच्या बोलण्यानी करुन घेतात.
गणपत च्या सासूनी आपल्या शब्दांनी वसुधा वर केला आणी वसुधानी तसाच परिणाम गणपत वर केला.
त्या परिणामा पाई गणपत वृक्ष्य हत्या सारखं महापाप करायला निघाला होता.
अरे दुसऱ्यांच ऐका पण आचरणात आणल्या पूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला, विवेकानी त्या सल्ल्याची पारख करा,त्या आधी
आचरणात आणू नका.
अरे निसर्गाशी पाहिजे तस वागतात मग निसर्ग जेव्हा कोपतो तेव्हा त्याला दोष देत बसतात."
गणपत आणी त्याचे परिजन  स्वामींची क्षमा मागतात.

Thursday, December 2, 2010

(39) कुणावरही आंधळा विश्वास नको

भुजंग स्वामींपाशी येऊन तक्रार करतो कि मित्राला उधार दिलेले पैशे परत नाही मिळत आहे.
स्वामी पहिले हाजिरी घेतात-:-
"अरे माहित होतं ना मित्राचा स्वभाव कसा आहे, तरी पैशे उधार  कशाला दिले?
अरे  व्यवहारात सावधगिरी बाळगायला पाहिजे."
मग स्वामी म्हणतात दोन दिवसात पैशे मिळतील.
चोळप्पाला म्हणतात-"जसा  राजा तसी प्रजा!
राजाला सुद्धा कळत नाही कुणावर विश्वास ठेवावा."
राजा खंडेराव यांचा कारभारी दाजीबा यांना इंग्रजांनी अटक केली होती,
त्यांच्या स्वभाव फार कठोर असल्यामुळे तो इंग्रजांशी सुद्धा उर्मटपण्यानी वागतात  ,त्यामुळे  इंग्रज अटक  करतात.
राजा खंडेराव आपली जामीन देउन आणी दंड भरून दाजीबाला सोडवून आणतात, आणी त्याला प्रमुख कारभारी नियुक्त करतात.
न्यायनिवाडा दाजीबाच्या हातात दिला जातो. दाजीबा अविवेकानी शुल्लक अपराधासाठी सुद्धा कठोर दंड देतात.
स्वामींच्या कानावर दाजीबाच्या कारस्तान्या येतात.
स्वामी म्हणतात:- "दाजीबा आपल्या कर्माचे फळ भोगणार आणी त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवणारा राजा पण फळ भोगणार."
चोळप्पा राजाशी जाऊन दाजीबा बद्दल बोलतात.
"प्रजा सुखी नाही, न्यायपदाधिकाऱ्या मुळे प्रजा हैराण  झाली आहे."
राजा म्हणतो- "आमचं रयतेवर पूर्ण लक्ष्य आहे.आम्ही योग्यच माणसाची  नेमणूक केली आहे."
राजा चोळप्पाच बोलणं फेटाळून काढतात.
इंग्रजांचा खलिदा येतो, संस्थान जब्त करण्या बाबद.
राजा स्वामी शरणी येतो.
स्वामी सांगतात:- "चुकीचा माणूस अटक झाल्यावर सावध होण्या ऐवजी त्याला सोडवून बढती का देण्यात आली?"
दाजीबा आधीच मर्कट त्यावर बढतीचं मद्य प्यायला घातलं गेलं, त्याचाच हा परिणाम आहे.
रयत पिडली गेली.दाजीबा क्षमा मागतो
स्वामी म्हणतात:-"तुला क्षमा नाही.
तुला इंग्रज शिपाई पकडून नेतील."
स्वामींचं वाक्य संपायचाच अवकाश असतो कि इंग्रज शिपाई दाजीबाला अटक करतात.
राजा स्वामींची करुणा भाकतात.
स्वामी म्हणतात:-"तु गुरुपदेश मानला नाही आपल्या मनाचं केलं."
राजा शरणागती  पत्करतो.
स्वामींना करुणा येऊन म्हणतात :-"जो पर्यंत आम्ही आहे तोपर्यंत या संसाथानाचं काहीच वाकडं होणार नाही."