Friday, December 24, 2010

(43) सत्कार्माचा सुद्धा अहंकार नसावा

केशव देशपांडे नावाचा एक गृहस्थ धार्मिक होता.
त्याची पत्नी संगीता पती-परायण आणी कर्तव्यनिष्ठ होती,.
केशव कडे दत्त जयंतीचा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा व्हायचा.
संपूर्ण गावाला त्या दिवशी प्रसाद म्हणुन जेवण देण्यात यायचं.
एका वर्षी त्याची आर्थिक स्थिती घालवलेली असल्यामुळे  तो गाव-जेवणाचा बेत रद्द करतो,
त्या एवजी ११ ब्राह्मण आणी स्वामींना बोलवायच ठरवतो.
त्या साठी तो स्वामींना आमंत्रण  करायला जातो, रस्त्यात त्याला एक कुष्ठ रोगी भेटतो.
तो सुद्धा स्वामींकडे रोग मुक्ती ची अभिलाषा घेऊन जात असतो.
केशव स्वामींना आपलं मनोगत सांगतो. इकडे तो रोगी स्वामींच्या खूब मागे उभा राहतो.
स्वामी केशवकडून चंदनाचं खोड मागवतात, ते खोड मागे उभ्या असलेल्या रोग्याला देतात.
स्वामी म्हणतात:-" हे घे ! उगाळून लाव ,तुझा रोग बरा होईल."
मग स्वामी म्हणतात:- "तुझ्या घरी आम्ही दत्त जयंतीला येऊ, तु फक्त १० ब्राह्मणांना बोलव, अकाराव्वा आम्ही घेऊन येऊ."
तिकडे ते चंदन उगाळून लावल्या मुळे रोगी पूर्णतह रोग मुक्त होतो.
तो कृतज्ञा भावांनी स्वामी कडे येतो पण दुरूनच स्वामींना नमस्कार करतो.
कारण विचारल्यावर तो आपली कनिष्ठ जात आहे, अस सांगतो.
स्वामी म्हणतात:- "अरे तु जवळ येत नाही तर आम्हीच तुझ्या जवळ येऊ."
"अरे सर्व जीव परमेश्वरानी निर्मित केले आहे, त्यात भेद कश्या पाई धरायचा?"
मग केशवला सम्बोधन करुन म्हणतात :-" केशव हाच तुझा अकरावा ब्राह्मण."
केशव पहिले सटपटतो , मग स्वामी त्याला पटवून देतात की मनुष्य कर्मानी  ब्राह्मण असतो जन्मानी नाही."
केशव सहमत होतो.
दत्त  जयंतीच्या दिवशी स्वामी शिष्यासह केशव कडे जातात.
केशव यथासांग स्वामींचं पूजन करतो.
मग ताटं वाढायच्या वेळेला तो पाहतो की पूर्ण गाव प्रसाद ग्रहण करायला आला आहे.
सर्व गावकरी हेच गृहीत धरतात की काही निमित्या कारण आपल्याला निमंत्रण दिलं गेलं नसाव, पण दरवर्षी प्रमाणे आपल्याला जायलाच  हवं.
सर्व गाववृंद पाहून केशव भितीनी गारठून जातो.
तो स्वामींना सांगतो की अन्न फक्त आमंत्रित लोकापुर्तच आहे.
स्वामी त्याला  नारळ देतात आणी सांगतात याचं पाणी अन्नावर प्रोक्षण कर, म्हणजे अन्न सर्वांना पुरेल.
केशव तसच करतो.
केशव आणी संगीता जेवण वाढायला सुरुवात करतात. ते सर्व अन्न वाढायच्या भांड्यात घेतात, आणी स्वयंपाकाचे भांडे रिकामे होतात.
बाहेर ते सर्व अन्न वाढून  येतात तर ते पाहतात काय की सर्व भांडे पुन्हा भरलेले आहे.
अस अनेकदा होतं. सर्व गावकरी तृप्त होतात तरी अन्न शिल्लक राहतं.
केशव गहिवरून स्वामींचे आभार मागतो:-"स्वामी तुमच्या मुळे गावा समोर माझी अब्रू गेली नाही.
मी  या वर्षी जेवण   देऊ शकलो नाही तरी
तुमच्या मुळे हे सर्व शक्य झालं."
स्वामी थोड्या कठोर शब्दात समझ देतात:-" अरे! हे  मी-मी काय लावलं आहे? मी जेवण  देतो, मी  उत्सव करतो."
"अरे सर्व जेवण ईश्वर देतो, तु फक्त निमित्य मात्र आहे."
"अरे कुणालाही जे काही मिळते ते ईश्वरामुळे मिळतं, देणारा माणूस फक्त निमित्य मात्र असतो.
"म्हणुन दान,धर्म इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल गर्व बाळगू नये."
"मनुष्याला अहंकार नसावा फक्त समाधान असावं."
"अरे ह्या अहंकार मुळेच मनुष्य ८४ लक्ष्य योनीत फिरत राहतो."
"मोक्ष मार्गावर चालायचं असेल तर मनुष्याला अहंकार नसावा."

No comments:

Post a Comment