एका गृहस्थाच्या मुलीला एक विचित्र समस्या झाली होती. तिच्या पोटात गर्भ वाढला असून पण तिला न बाळ होत होता,न गर्भपात होत होता.
जवळ-जवळ ३ वर्ष ती अशीच वाढलेल्या पोटानी वावरायची. त्या मुळे तिच्या पतीनी तिला माहेरी आणून सोडलं होतं
आणी तो काडी-मोडीच्या तैयारीत होता.
कुणाच्या तरी सांगण्यावरून तो गृहस्थ स्वामींकडे येतो.
स्वामी तेव्हा मुलाबरोबर गोट॒या खेळत होते. त्यांना मुलांबरोबर खेळतांना पाहून त्या गृहस्थाच्या मनात संकल्प-विकल्प येतात: -"अरे आपण आपल्या मुलीसाठी काय नाही केलं? ओषधं,पूजा-पाठ,अनुष्ठान,दान इत्यादी.
आणी आता आपण स्वामींकडे आलो आहे, पण मुलाबरोबर मातीत गोट॒या खेळणारे स्वामी आपली काय मदत करतील?"
तितक्यात स्वामी कडाडून बोलतात -"अरे आमच्या वर विश्वास नाही तर इथे कशाला उभा आहे, चल चालता हो.
तुझ्या मुलीला गर्भ जाऊन तीन वर्ष झाली तरी अपत्य नाही होत ना?
आम्ही मुलामध्ये गोट॒या खेळतो म्हणुन आम्ही काय करू शकणार?"
स्वामी अंतर्यामी आहे, असं जाणुन तो गृहस्थ स्वामी चरणी नत-मस्तक होऊन क्षमा मागतो.
करुणामयी स्वामी त्याला आपलं चरणतीर्थ मुलीला पाजायला सांगतात.
गृहस्थ तसच करतो, त्यामुळे त्याची मुलगी सुखरूप प्रसूती होऊन पुत्र प्राप्त करते.
गृहस्थ अनन्य भावांनी स्वामी कडे येतो व त्याची इच्छा स्वामींना पंच-पक्वानाचं जेवण घालायची असते.
स्वामी समाधीत असल्यानी त्याला ते करता येत नाही.यावर चोळप्पा सुचवतात कि तुम्ही ७ दिवस ब्राह्मणांना भोजन करवा.
ते भोजन स्वामी पर्यंत पोचेल.
गृहस्थ तसच करतो. इकडे स्वामी ७ दिवस पर्यंत भोजन सुद्धा करत नाही.
शिष्य आग्रह करतात तेव्हा स्वामी आपलं पोट भरलं आहे, असं सांगतात.
ब्राह्मणजेवणाची सांगता करुन गृहस्थ स्वामींकडे परततो.
तो स्वामींना आपलं भोजन करवायाचं मनोगत सांगतो.
स्वामी म्हणतात:-"अरे किती वेळा आम्हाला जेवण घालणार? सात दिवसापासून रोज आग्रह करुन-करुन पंच-पकवान खायला घातले. आता पुन: तोच आग्रह का करतो आहे?"
गृहस्थाला काहीपण उमजत नाही, तितक्यात त्याला स्वामीच्या जागी आपण जेवण घातलेला ब्राह्मण दिसतो.
त्याला पटतं कि स्वामींनी ब्राह्मण रुपात येऊन भोजन ग्रहण केले आहे.
तो समाधानपूर्वक आनंदानी घरी परततो.
No comments:
Post a Comment