गणेश सोहनी नावाचा एक अम्मलदार होता. तो श्रीमंत घराण्याचा होता.गावात त्याचं नावलौकिक होतं.
त्याची पत्नी शारदा देखणी आणी पती-परायण होती.
त्याला श्रीपाद नावाचा एक गोंडस पुत्र पण होता.
इतकं सर्व अनुकूल प्रारब्ध असतांनाही तो एका सुगंध नावाच्या भाविणीच्या प्रेमात पडला होता.
आपल्या संसाराकडे दुर्लक्ष्य करुन तो पूर्ण पणे तिच्या प्रेमात गुंतला होता.
त्याची आई त्याला समझावते तरीही त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही.
त्याचा वरिष्ठ अधिकारी पण त्याला समझवतो पण गणेश उलट त्यांच्याशिच उर्मटपणे वागतो.
खुद्द स्वामी साधूरुपात त्याला समझ देतात तरीही तो स्वामीआज्ञा दुमानत नाही.
त्याच्या या कृष्णकृत्या मुळे श्रीपाद आणी शारदाला लोकांच नाही-नाही ते ऐकाव लागत,पण काहीही झाल्या गणेशवर काहीही परिणाम होत नाही.
शेवटी गणेशची आई स्वामींकडे घाराणं घालते. स्वामी त्यांना एक उपाय योजना सांगतात.
त्या प्रमाणे स्वामी त्याचं दिवशी गणेशच्या घरी येतात. गणेश सुद्धा तातडीनी येतो आणी स्वामी चरणी नतमस्तक होतो.
स्वामी ताडकन तिथुन उठतात आणी परततात.
गणेशनी विचारल्यावर ते म्हणतात:- "तुझ्या कडे आम्हाला विटाळ होतो!".
बाळप्पा, गणेशला स्वामींचा इशारा 'भावीणीचा त्याग कर', असं आहे , सांगतात.
तरीही गणेश हे मान्य करायला तैयार नसतो.
शेवटी गणेश ची आई त्याला घरा बाहेर काढते,
गणेश सरळ सुगंधा कडे जातो.
तिथे सरकारी शिपाई येऊन सांगतो कि सरकारनी त्याचावर अफरा-तफरीचा आळ लावून बडतर्फ केलं आहे.
इतकच नाही त्याची सर्व माल-मत्ता आणी संपत्ती पण जब्त केली आहे.
हे सर्व ऐकल्यावर सुगंधाचं खंर रूप समोर येतं, ती गणेशला नाही-नाही ते बोलते
आणी गरीब झाल्यामुळे त्याची विटंबणा करते.
शेवटी गणेशला तिच्या वाड्यातून हकलण्यात येतं.
गणेश घरी परततो. तिथे परतून तो घरच्यांची क्षमा मागतो.
तिथे त्याला कळतं कि शिपाई जे म्हणाला तस काहीही झालं नाही आहे.
गणेश ची आई म्हणते:-" अरे तुझ्या डोळ्यावर आलेलं झापड काढण्या साठीच ही स्वामींनी लीला केली आहे."
तु त्या भाविणीच्या खोट्या प्रेमामुळे आप्तजनाना विसरला होता.आपलं कर्तव्य विसरला होता."
सर्व लोकं स्वामींकडे जातात.
स्वामी म्हणतात:-" अरे मोहापासुन सावध राहिलं पाहिजे, मोह हा मोक्षाच्या वाटचालीत फार मोठ्ठी बाधा आहे.
त्याच्या आहारी गेलो तर अधोपतन निश्चित असतं."
No comments:
Post a Comment