Tuesday, June 12, 2012

स्वामींच्या गोष्टींपासून शिकवण-3


(११) सुरदासाची इच्छापूर्ती: ईश्वर प्राप्तीची दांडगी तळमळ असुन जो सतत ईश्वर दर्शनासाठी खटत असतो त्याला देव स्वताहुन दर्शन देतो.
(१२)धनाचे झाले कोळसे: ईश्वराशी किंवा सद्गुरुशी ठकपणे  वागणारा व्यक्ती दुखाला प्राप्त होतो.
(१३) गोष्ट दुसऱ्या लग्नाची: प्रारब्द्ध सहसा चुकत नाही.
(१४) चोरापासून सावध राहा: चांगुलपणा करावा पण माणसाची पारख करूनच.
(१५) आवाळू पासून सुटका: देह-भोग भोगून किंवा ईश्वरीय कृपेनीच सुटतात.

स्वामींच्या गोष्टींपासून शिकवण-2


(६) गोसाव्याची मनोकामना: एखाद्या सत्कार्य साठी जर मनपासून तळमळ असली तर ईश्वरीय शक्ती खुद्द येऊन ते साध्य करण्या साठी मदत करते
(७)रोगापासून भक्ती: पूर्व-पुण्याई  असलेल्या साशंक भक्ताचेही सद्गुरू कल्याण करतात.
(८)स्वामींचा हनुमान: जग जाळून सद्गुरूची अनन्य भक्ती करणारा शिष्य गुरूस पुत्रा-समान असतो.
(९) भूत-बाधेपासूनसुटका: वाम-शक्त्यांपासून पासून सद्गुरू रक्षण करतात.
(१०)राघव कीर्तनकार होतो, सुरदासाची इच्छापूर्ती : सद्गुरू-कृपा काही विशेष परिस्थितीत नैसर्गिक नियमांवर पण मात करून मनुष्याचे कल्याण करते.

स्वामींच्या गोष्टींपासून शिकवण-1



स्वामींचा साक्षात्कार एखाद्यालाच होतो पण स्वामींची शिकवण सर्वासाठी असते. 
स्वामींच्या शिकवणी, मनुष्याचे दोन्ही लोकं सुधारवयास साह्य करतात आणी मनुष्याचे जीवन सोपे करतात.


कहाणी: शिकवण


(१) स्वामींचा हिरा: अनेक रूप असले तरी ईश्वर एक आहे.
(२)वामन बुवांची गोष्ट: सद्गुरूच्या ठाई ईश्वर असतोच.
(३) मला ब्रह्म दाखवा: पात्रता नसताना ईश्वराचे सगुण दर्शन होत नाही त्या साठी आराधना करून पात्रता वाढवायचाच प्रयत्नच मनुष्याच्या हाती असतो.
(४) स्वामी नखांचे ताईत करून विकणारा न्हावी: परमार्थाचा विक्रय करू नये.
(५)परमार्थात स्त्री-पुरुष भेद नसतो : रूप,लावण्य किंवा धन हे काही चिरकाल पर्यंत टिकत नाही, जे टिकते ते आध्यात्मिक धन

Saturday, March 3, 2012

(११७) सर्वथा तूची त्राता




संताजी नावाचा एक भक्त स्वामींना २०० मोहरा द्यायला येतो. 
स्वामी म्हणतात: -" ठेव आपल्या कडे, आम्ही म्हणू तेव्हा देशील."
गणेश नावाचा एक कर्तव्यनिष्ठ आणी स्वामीभक्त गृहस्थ होता. तो एका सावकाराच्या  खाजगी सेवेत होता.
एकदा सावकार त्याला २०० मोहरा देऊन त्याला शेजारच्या गावात आपल्या भावाला देऊन व्यापार आणायला सांगतो.
गावाला जाताना गणेश एका मंदिरात विसाव्याला बसतो. तिथे त्याचा डोळा लागतो. डोळे उघडून पाहतो तर काय मोहरांची पोटली नव्हती.
तो कावरा-बावरा होऊन इकडे तिकडे पाहत फिरतो. रक्कम फार मोठी होती. जन्म भर राबून पण ती फेडणे त्याला शक्य नव्हते.
त्याला वाटले की आता सावकार आपल्याला चाबकांनी फोडणार.
तितक्यात पुजारी बुवा येऊन त्याला म्हणतात: " अरे शुंभा सारखा काय उभा आहे! मंदिराच्या पायथ्याशी जा आणी तिथे रस्ताभर पाहत जा .
कुठे तरी पडली असेल."
माणूस संकटात  असतो तेव्हा तो पटकन कोणीही काही सांगितले तर  ऐकतो. 
गणेश आपली राहिली-सुरलेली शक्ती एकत्र करून मंदिराच्या पायथ्याशी पहात-पहात जातो.तितक्यात त्याच्या समोर एक पोटली येऊन पडते.
त्या पोटळीत नेमक्या २०० मोहरा असतात. गणेशचे संकट टळते.
सावकाराचे काम करून तो परततो.
तिकडे संताजी स्वामींकडे येऊन म्हणतो:-"तुमच्या दृष्टांता प्रमाणे मी निर्दिष्ट जागे वर मोहरांची पोटली भिरकावली. "
"मी फक्त या गोष्टीची खात्री करायला आलो आहे की माझी सेवा तुमच्या पर्यंत पोहचली की नाही?"
स्वामी म्हणतात: " हो तुझी सेवा आमच्या पर्यंत पोहचली." 
तितक्यात गणेश येऊन आपल्या बरोबर घडलेली विलक्षण घटना सांगतो.
सर्वंना स्वामींनी गणेशची कशी मदत केली हे लक्ष्यात येते. गणेश ला पण खुण पटते की स्वामीनीच पुजाऱ्याचे रूप घेऊन आपले मार्गदर्शन केले.
नंतर स्वामींची आज्ञा  घेऊन गणेश, बायको आणी मुलाला घेऊन ज्योतिबा आणी महालक्ष्मीच्या दर्शनाला जातो.
स्वामी त्याला म्हणतात  कि रस्त्यात जो जे सांगेल तशे कर.
ज्योतिबाच्या मंदिराच्या खाली एक माणूस गणेशला हळद लाऊन सांगतो:-"ज्योतीबा आणो महालक्ष्मी च्या समोर एक-एक कवड ठेव."
"आणी ज्योतिबा समोर एक नारळ फोड."
गणेश ज्योतिबा समोर कवड ठेऊन नारळ फोडायला जातो. तिथला पुजारी त्याला काळभैरवाच्या समोर नारळ फोड अशे सांगतो.
गणेश तसच करतो.
आता महालक्ष्मी कडे जायची तैयारी असते. तिथे जायच्या आधी ते विसावा घेतात.
बाळ रडतो म्हणून गणेश त्याला हवेत भिरकावतो आणी हवेतच अलगद झेलून घेतो. अस तो परत-परत करतो.
पण दुर्लक्ष्य होऊन बाळ जमिनीवर पडतो. पण आश्रयच म्हणा बाळाच्या केसाला पण धक्का लागत नाही.
इतक्या उंचावरून पडून सुद्धा बाळाला काहीपण इजा होत नाही. बाळ रडत सुद्धा नाही.
ही सर्व स्वामींचीच कृपा असं समझुन ते महालक्ष्मी चे दर्शन करून स्वामींकडे येतात.
गणेश म्हणतो: "स्वामी, इतक्या वरून बाळ पडून पण काही इजा झाली नाही."
स्वामी म्हणतत: " अरे तू काळ भैरवा समोर नारळ फोडला ना ! म्हणून तुझ्या बाळाला पडून पण इजा झाली नाही."
चाणाक्ष्य बाळप्पांना लगेचच समझत की आपण डोक्याला नारळ म्हणतो.
स्वामींनी विविध रूप धरून रस्त्यात गणेशचे मार्गदर्शन केले आणी काळभैरवा समोर नारळ फोडायला लाऊन त्या लहान मुलाच्या जीवावर आलेले
गंडांतर टाळले.
स्वामीकृपेची प्रचीती येऊन गणेश स्वामी चरणी मस्तक ठेवतो.

Monday, February 27, 2012

(११६) स्वर्ण विद्येच्या शिल्पकाराचा उद्धार




बीडकर नावचे एक गृहस्थ अत्तराचे व्यापारी होते. त्यांचा व्यापार तर 
चांगलाच चालायचा पण त्यात त्यांना जडीबुटीनी धातूचे स्वर्णकरण्याची विद्या पण हस्तगत झाली होती.
त्यांचे एका नर्तकी वर प्रेम होते आणी तिला लग्नाचे वचन पण दिले होते.
नर्ताकिनी पण दुसऱ्या लोकासाठी नाचणे बंद केले होते.
ती बीडकरांच्या मागे लग्ना साठी लागली होती.
पण बीडकर यांचे आधीच लग्न झालेले होते म्हणून त्यांना प्रश्न पडला होता.
आपल्या मित्राला आपली चिंता सांगताना त्यंना खबर येते की त्या नर्तकीचा सर्प दंशानी मृत्यू झाला.
मित्र त्यांना म्हणतो की ईश्वरानीच तुमची या प्रश्ना पासून सुटका केली.
पण त्या नर्तकी वर जीव असल्यानी त्यांना जगा-प्रती थोडा वीतराग आला होता.
संसार दु:ख प्राप्त  झाल्यावरच मनुष्याला अध्यात्माची आठवण येते.
मनाच्या शांतीसाठी बीडकर आध्यात्मात उपाय शोधात्तात.
तितक्यात एक रामदासी उयुन त्यांना  म्हणतो की आध्यात्म-मार्ग इतका सोपा नसतो आणी त्यात तुझ्या सारखा ऐश्वर्यात लोळणारा माणूस 
काय आध्यात्मा कडे वळणार?
त्या रामदासाचा टोमणा बीडकर च्या हृदयात लागतो.
ते आपल्या आराध्य देव मारुतीचा मंदिरात जातात.
तिथे ते मारुतीचा धावा करतात. तितक्यात त्यांना देववाणी ऐकू येते की अक्कलकोटला स्वामी समर्था कडे जा.
बीडकर अक्कलकोटला येतात.
तिथे ते स्वामी सेवेत राहतात.
एकदा स्वामींचे पाय चेपताना त्यांचा डोळा लागतो. डोळे उघडतात तेव्हा पाहतात तर काय स्वामी जवळ एक मोठ्ठ्या फणेचा नाग बसला आहे.
बीडकर स्वामींवर विश्वास ठेऊन मुखांनी नामस्मरण करत पाय चेपत राहत्तात.
स्वामी लगेच उठतात. आणी उठल्या बरोबर बीडकरांच्या श्रीमुखात एक जोरदार ठेवतात.
बीडकरचा चेहरा आनंदानी खिळून उठतो. ते आनंदात डोलू लागतात.
स्वामी मग त्या नागाला हातात धरून तिथून निघतात.
गुरु आपल्या निवडक शिष्यावर शक्तिपात करतो तेव्हा त्याचे प्रकार वेग-वेगळे  असतात.
चापटी मारणे हा ही एक शक्तीपाताचा प्रकार होता.
या मुळे बीडकर यांच्या मनातला द्वंद संपून त्यांना होणाऱ्या उद्वेगाचे निरसन होते. खर ज्ञान मिळाल्यानी त्यांचा चेहरा प्रफुल्लित होतो.
ते स्वामी शरणी येतात. स्वामी त्यांना सहस्त्र भोजन घाल असे सांगतात.
बीडकर आपल्याकडे असलेल्या अत्तराच्या बाटल्या विकायला निघात्ता पण त्यांना ठेच लागून बाटल्या चकनाचूर होतात.
हुशार बाळप्पा त्यांना मार्ग सांगतात. त्या राहिली-सुध्लेल्या अत्तराचं अष्टगंध करून ते राजाला विकून येतात.
आणी त्या पैशानी बीडकर सहस्त्र भोजनपार पाडतात.
स्वामी भोजन ग्रहण करून म्हणतात: " भोजन तो दिया अब दक्षिणा देणने का वक्त आ गया है."
पण बिद्कारांकडे पैशे नसतात. सर्व पैशे तर सहस्त्र भोजनात खर्च झालेले असतात.
मग स्वामी म्हणतत अरे दक्षिणा नसेल तर एक वचन दे- " जडी बुटी चे  कार्य सोडून दे"
जडी-बुटी चे   कार्य म्हणजे धातू  चे सोने बनवण्याचे कार्य.
बीडकरांना प्रश्न पडतो पण ते सद्गुरू आज्ञेला  सर्वोपरी मानून सोनं बनवणार नाही अशे वचन देतात.
स्वामी मग त्यांना नर्मदा प्रदिक्षणा घालायला सांगतात.
माया ही ब्रह्मा आणी मोक्ष प्राप्तीत सर्वात मोठी बाधा असते.
बीडकर यांची आध्यात्म मार्गावर उन्नती व्हावी म्हणू स्वामींनी केलेली ही उपाय योजना होती.
नुसते धातूचे स्वर्ण करत बसल्या पेक्ष्या आता बीडकर स्वताच्या जीवनाचे सुवर्ण करण्याच्या मार्गावर चालायला लागले होते.

(११५) उपेक्षु नको भगवंता




शेषाचार्य एक आध्यात्मिक उंची गाठलेले व्यक्ती होते. स्वामी म्हणायचे आमची आणी शेषाची युगा-युगाची गाठ आहे.
त्रेतायुगात तो लक्ष्मण तर द्वापारात बलराम म्हणून आमची साथ देत आहे.
स्वामींना कितीही राग आला तरी तो शेषाचार्यांच्या उपस्थितिनी त्यांचा राग शमायचा.
शेषाचार्यांकडे कुलदेवता बालाजीचे पारणे असते. ते विचार करतात की स्वामी म्हणजे साक्षात बालाजी ते असतांना मंदिरात कशाला जायचे.
ते स्वामींना बोलवणे करायला येतात. तिथे असलेली मिठाई स्वामी सर्व उपस्थित लोकांमध्ये वाटायला सांगतात 
पण शेषाचार्यांना काही मिठाई मिळत नाही.
मिठाई म्हटले की शेषाचार्यांचे जीव की प्राण.
मिठाई पाहून त्यांच्या मनात 'मिठाई जिभेला किती सुखद लागते' अशे विचार येतात.
संध्याकाळी त्याच्याकडे स्वामी पारण्याला काही जात नाही. शेषाचार्य येतात तर स्वामी झोपलेले भेटतात आणी शेषाचार्य गेल्या बरोबर 
स्वामी उठून बसत्तात.
दुसऱ्या दिवशी शेषाचार्य स्वामींकडे जातात तर स्वामी त्यांना हाकलुन देतात.
शेषाचार्य मनात विचार करतात की आपल्या हातून काय चूक झाली की स्वामी आपली उपेक्षा करून राहिले आहे.
विचार करता-करता त्यांच्या लक्ष्यात येते की आपली जी मिष्टान्नावर जी वासना जडली त्यामुळे स्वामींना राग आला असावा.
त्या चुकेचे प्रायश्चित म्हणून शेषाचार्य शेण खातात..
गाईचे शेण फार पवित्र असल्यांनी स्वामींचा त्यांच्यावर असलेला रोष कमी होतो.
या वेळेला स्वामी शेषाचार्याची उपेक्षा करत नाही.
स्वामी म्हणतात: " अरे कोणाच्याही भौतिक वस्तू वर वासना जडणे म्हणजे मोक्षाच्या मार्गातली फार मोठ्ठी अडचण. अरे षड-रसाचा
मोह त्याग केल्या शिवाय अध्यात्मिक उन्नती कशी होणार ?"
शेषाचार्य पुढे वासने पासून सावध राहण्याचा निश्चय करतात.

Tuesday, February 21, 2012

(११३) एका बरोबर पाच रूप, घेतले आपण हे देव अरूप

अक्कलकोटला आषाढी एकादशीचा उत्सव असतो. पण  चोळ प्पाची इच्छा होती की स्वामींनी दर वेळे प्रमाणे त्याच्या घरी यावे.
त्याचीच नाही तर इतर ३ भक्तांची पण अशीच इच्छा होती.
बाळप्पा यांची  स्वामींनी अक्कलकोट-गावाच्या उत्सवाला हजर राहावे अशी होती.
या प्रकरणा मुळे त्या सर्वांचा आपसात थोड वाद होतो.
स्वामी त्यांना म्हणतात की तुम्हा सर्वांना एक परीक्षा द्यावी लागेल जो उतीर्ण होईल त्याच्या घरी आम्ही येऊ.
पण ठेवण्यात येतो. हातात तेलानी गच्च भरलेली पंती घेऊन मनात स्वामींचे नामस्मरण करत एका निश्चित स्थाना वरून सर्वानी स्वामींकडे यायचं.
जो पहिले येईल तो जिंकेल आणी स्वामी त्याच्याच घरी येईल.
पण तेलाचा एक थेंबपण सांडायला नको.
चोळप्पा सर्वांना पछाडून स्वामींकडे पहिले पोचतो.
पण स्वामी म्हणतात: " अरे पहिले तो आये पर मन में हमारा नाम कहा था ?"
मग काय सर्वच अनुतीर्ण झाले होते. आता स्वामी फक्त गावाच्या उत्सवात हजर राहणार होते.
सर्वांना खंत होतो. आणी होणार पण का नाही ? कारण एवढी सोपी गोष्ट न करता आल्यानी स्वामींचे चरण त्यांच्या
घरी आता पडणार नव्हते.
सर्व निराश होऊन परततात . पण रस्त्यात सर्वांना स्वामी गाठून सांगतात की मी तुझ्या कडे येणार पण मात्र तू कुणालाही सांगू नको.
आषाढी एकादशी च्या दुसऱ्या दिवशी पुन्हा सर्व मध्ये वाद होतो.
चोळप्पा म्हणतात की स्वामी त्याचा कडे आले होते, इतर ३ भक्त पण असंच म्हणतात.
बाळप्पा म्हणतात की उगाच थापा मारू नका स्वामी गावाच्या उउत्सावातून कुठेही गेले नाही.
त्यांचा वाद सुरु असतानाच स्वामी म्हणतात : " अरे तुम्ही लोकं का विसरतात की आम्ही चैतन्य-स्वरूप आहो."
"चैतन्याला स्थूल-देहाच्या मर्यादा नसतात. अरे आम्ही कणा-कणात वावरतो. पाच जागी एका बरोबर प्रगट होणे कोणची मोठी गोष्ट आहे?"
"अरे आम्ही तुमच्या मध्ये सुद्धा आहे, फक्त गरज आहे आम्हाला हुडकून काढायची."
"आणी जेव्हा तुम्ही आम्हाला स्वतातून हुडकून काढणार तेव्हा तुम्ही तुमच्या खऱ्या आत्म चित्ताला प्राप्त होणार."
"अरे 'अहं ब्रह्मास्मि' उगीच थोडी म्हटले आहे. तुमच्यातच नाही आम्ही सर्व जीवात वास करतो. म्हणून उगाच कुणाला त्रास किंवा मनस्ताप देऊ नका."
सर्व लोकं स्वामींची क्षमा मागतात.
सर्व लोकं स्वामीचे रूप आहे या सिद्धांतावर बसप्पा चालायचे. गरिबाला मदत करतांना सुद्धा ते त्याला स्वामी अशी हाक मारून मदत करायचे.

(११४) अंध श्रद्धा ठेऊ नका


गणपतीबुवा स्वामींच्या दर्शनाला येतात पण स्वामी त्यांना हकलुन देतात.
गणपती बुवांना फार वाईट वाटतं. योगा-योगानी त्याच गावात एक भोंदू साधू कृष्णास्वामी आलेले असतात.
कृष्णा स्वामी लोकांना भासवायचे की ते साक्षात कृष्णाचा अवतार आहे. गणपतीबुवा तर त्यांच्या आहारीच गेले होते. 
आणी याच कारणामुळे स्वामींनी त्यांना हाकलले होते.
स्वामी सदैव सावधगिरी बाळगा अशे म्हणायचे. श्रद्धा ठेवा पण अंध श्रद्धा ठेऊ नका अशी शिकवण नेहमी भक्तांना द्यायचे. पण इथेच तर गणपती बुवा चुकले होते.
गणपती बुवांचा मुलगा अकस्मात आजारी पडतो.
पण कृष्णास्वामी वर अगाढ श्रद्धा असल्यानी गणपती बुवा त्याला वैद्या कडे सुद्धा नेत नाही.
इकडे कृष्णास्वामी यांचे प्रबोधन सुरु असतांना स्वामी समर्थ  तिथे येतात.
कृष्णास्वामी त्यांचा अपमान करतात. आपल्या समोर स्वामी काहीच नाही, अशे मत मांडतात. 
मग स्वामींना आपल्याशी शास्त्रार्थ करावे, अशे आवाहन  पण करतात.
पण स्वामी मुकाट्याने काही न बोलता तिथून निघून येतात.
गावाचे लोकं कृष्णा स्वामींचा जय जयकार करतात.
हा सर्व प्रकार ऐकून गणपती बुवाची कृष्णा स्वामीवरची श्रद्धा वाढते.
त्याशिवाय कृष्णस्वामी त्यांचाशी फार अगत्यानी बोलायचे.
कृष्णास्वामी गावकऱ्यांना भूल घालायला लागले होते कि तुम्ही मला धन-संपदा दान करा त्या बद्दल तुम्हाला अनेकपट धन प्राप्त होणार.
गावकरी सुद्धा  त्यांच्या आहारी जायला लागले होते.
पण इकडे गणपतीबुवाच्या मुलाचा आजार  हाता बाहेर जात होता.
चोळप्पा  कळ-कळीनी त्यांना आपल्या  मुलाला स्वामींकडे न्या अशे सांगतो.
पण गणपतीबुवा चोळप्पाला ढकलून देतात.चोळप्पा पडणार तितक्यात मागून स्वामीसमर्थ त्याला सांभाळतात.
मग स्वामी गणपती बुवाला जाम रागवतात: " मुर्खा अजून तुला अक्कल आली नाही. चांगक्या-वाईटाची पारख तुला कशी येत नाही. डोळे बंद करून असा कुणावर कसा विश्वास ठेवतो."
गणपती बुवा तरीही काही ऐकायला तैयार नसतात.
मग स्वामी म्हणतात: " बघ तुझा कृष्णास्वामी काय करतो आहे ?"
सर्व लोकांना समोरच्या भिंतीवर कृष्णास्वामींचे  कृष्ण-कृत्य दिसतात.
कृष्णा स्वामींच्या स्त्री-शिष्या नृत्य करत होत्या आणी कृष्णास्वामी  मद्य-पान करत नयन-सुखं घेत होते.
मग काय गणपती बुवा सकट सर्व गावकऱ्यांचे डोळे उघडतात.
गणपतीबुवा स्वामींची करुणा भाकतात. कृपासिंधु स्वामी आपल्या कृपा-दृष्टीनी त्यांच्या मुलाला खडखडीत बरा करतात.
इकडे सर्व गावकरी कृष्णास्वामींना चोप देतात. कृष्णास्वामी पळत स्वामी शरणी येतो.
पण स्वामींना खोटे काम करणारे आणी दुसऱ्यांना लुबाडणारे लोकं आवडत नसल्या मुळे ते कृष्णास्वामीला गाव सोडून जा अशी आज्ञा करतात.
कृष्णास्वामी लज्जित होऊन आपल्या शिष्यासह गाव सोडून निघून जातो.

(११२) हरी इच्छा बलीयसी


चोळपा स्वामी आज्ञा घेऊन आपली मुलगी राजुबाई ला  भेटायला जातो. तिच्या घरी गेल्यावर त्याला कळते की राजुबाई ला क्षय झाला आहे.
काहीही इलाज केला तरी गुण येत नाही. इकडे स्वामी शेणाच्या गवऱ्या बनवतात.
चोल्प्पा अक्कलकोटला परतून स्वामींकडे  साकडे घालतो. स्वामी काही न म्हणता त्याला केलेली गवरी देतात.
स्वामींचा इशारा समझुन चोळप्पा थबकतो.
काही दिवसांनी राजु बाईला देवाज्ञा होते. 
 महिन्या नंतर चोळपाच्या मुलगा- कृष्णप्पा आजारी पडतो.
त्याल वैद्या कडे नेता-नेताच त्याला देवाज्ञा होते.
चोल्प्पा वर तर जणू दुखाचा पर्वतच कोसळतो.कृष्णप्पाच्या ओर्ध्देहिकाची तैयारी चालू असताना स्वामी तिथे येतात.
स्वामी म्हणता: " रडायला काय झाले आहे?"
चोळप्पाची सासू फणफणून महानते:- 'अहो स्वामी कृष्णप्पा गेला हो .."
चोलप्पाची पत्नी स्वामींना दूषण लावते.
स्वामी म्हणता: " कौन म्हणतो कृष्णप्पा मेला आहे ? तो झोपला आहे."
मग स्वामी कृष्णप्पाला आवाज देतात- "कृष्णप्पा उठ......."
मग स्वामी हाक मारतात:- "अरे नीलकंठा उठ...".
स्वामींची ही हाक ऐकून कृष्णप्पा उठून बसतो.
स्वामी मग खुलासा करतात: " राजु बाई चा वेळ आला होता आणी त्यानंतर तिला नवीन जन्म पण घ्यायचा पण होता पण 
कृष्ण्प्पाचा हा शेवटचा जन्म होता.
या जन्मा नंतर त्याला मोक्ष मिळणार होता. तुमच्या साठी आम्ही त्याला जीवन दिले. आम्ही विधीलीखीतात अत्यंत विशेष परिस्थितीतच बदल करतो.
चोळप्पाचा परिवार स्वामींची क्षमा मागतो.

Friday, January 6, 2012

(१११) भक्ता हाती विप्रमद जिरवले


श्रीपाद नावाचा एक ब्राह्मण अनन्य स्वामी भक्त होता. एक दिवशी स्वामिनी त्याला काशीला जा अशी आज्ञा करतात.
काशी मध्ये विद्वान ब्राह्मणाचा घोळका आढळतो. ते ब्राह्मण श्रीपादच्या अज्ञाना पाई त्याचा पदोपदी अपमान करतात.
परिस्थितीमुळे श्रीपादचे शिक्षण फारसे झाले नव्हते. 
या सर्व अपमाना मुळे तो विप्र-सभेत जायचे टाळतो.
काशीत एक दिवस फिरत असताना स्वामी एकदम त्याच्या समोर प्रगट होतात.
स्वामी श्रीपाद ला घेऊन विप्रसभेत जातात. विप्र सभा एका देऊळात भरली होती.
श्रीपाद तिथे स्वामींना चोरंगावर बसवून त्यांची पाद्य पूजा करतो.
स्वामी म्हणतात -"पाद्य पूजा झाली पण नैवैद्य कुठे आहे."
त्या ज्ञानांनी उन्मत्त झालेल्या ब्राह्मणा मधून एक स्वामींच्या समोर मांसाहारी पदार्थ नैवैद्य म्हणून ठेवतो.
स्वामी हे पाहून संतप्त  होतात. तितक्यात देऊळात एक देवी प्रगट होते. देवी फार क्रोधित असते.
ती म्हणते-" चांडाळा तू स्वामींना मांसाहाराचा नैवैद्य दाखवला ! " मी  तुला आता भस्म करणार."
पाहता-पाहता तो ब्राह्मण भस्म होतो.
श्रीपाद स्वामींच्या चरणी मस्तक ठेवतो.
स्वामी त्याच्या मस्तकावर हात ठेवतात.
स्वामींच्या हस्त-स्पर्शांनी श्रीपाद च्या डोक्यात चारी वेद, सहा पुराण व त्या शिवाय अनेक शास्त्रांचे ज्ञान जागृत होतं.
विश्वाचे सर्व ज्ञान मनुष्याच्या डोक्यात असते पण फक्त कुणात ते जागृत होतं आणी कुणात  नाही. मनन,पठण,अवलोकन,अनुभव आणी गुरूची 
शिकवण, हे सामान्य रुपानी मनुष्याच्या डोक्यात असलेल्या सुप्त ज्ञानाला जागृत करतात.
स्वामी कृपेनी एका क्षणात श्रीपाद मध्ये ते ज्ञान जागृत होतं.ज्ञानेश्वर महाराजांनी पण आपल्या स्पर्शांनी रेड्याकडून वेद म्हणवले होते.
श्रीपाद स्वामी आज्ञेनी त्या ब्राह्मणांशी वाद-विवाद करायला बसतो.
काही क्षणातच तो त्या सर्व ब्राह्मणांचा चोफेर पराभव करतो.
ब्राह्मणांना स्वामींचे सामर्थ्य कळतं आणी ते स्वामींचा शरणी येतात.