Monday, October 24, 2011

(१००) गुरु त्रिकालज्ञानी

वामन नावाचा एक माणूस पुराण सांगून आपले व परिवाराचे चरितार्थ चालवत होता. पण गावात दुष्काळ पसरतो आणी कोणी
पुराण ऐकण्यासाठी दक्षिणा द्यायला तैयार नसतो.
संसाराला कंटाळुन वामन बायको आणी आई सह स्वामी शरणी वाचलेले आयुष्य काढायचे ठरवतात.
पण स्वामी वामनला झिडकारतात " अरे प्रपंचात हरून परमार्था कडे वळण्यात काय अर्थ आहे ? अरे अनुकूल प्रपंच असताना
जो ईश्वरा कडे वळतो त्याची खरी किम्मत असते."
"इथे राहुन आम्हाला काय पुराण ऐकवणार ? अरे आम्ही संसाराची उत्पत्ती केली आणी आम्हालाच तु पुराण सांगणार?"
अशे अनेक दिवस स्वामी वामन ला अशेच हिणवतात.
एक रात्री वामन  वैतागून वनात पळून जातो. तिथे मनातला उद्वेग जावा म्हणुन तो ईश्वराचे ध्यान करत बसतो.
सकाळी वामनची आई आणी बायको पाहतात तर वामन नसतो, ते कावरे-बावरे होऊन स्वामींकडे जातात.
वामनाची आई स्वामींना  म्हणते:" तुम्ही वामनला आपल्या पदरात घेतले नाही म्हणुन तो वैतागून पळून गेला."
स्वामी म्हणतात: " अरे पळपुटा आहे वामन . प्रपंच जमला नाही म्हणुन परमार्थाकडे वळला."
मग स्वामी जोर-जोऱ्यात वामन ला हाक मारतात.
वनात ध्यानस्थ बसलेल्या वामनच्या कानात आवाज गुंजतो.
स्वामींची आज्ञा समझुन तो स्वामी कडे परत येतो.
स्वामी म्हणतात: "अरे मागच्या जन्मात तुझ्या हातून खूप जीव-ह्त्या झाली होती. "
"आमच्या नकारानी तुला जो मानसिक त्रास झाला त्यांनी तुझ्या पापांची भरपाई झाली."
"आम्ही आधीच जर तुला होकार दिला असता तर ते पापं नष्ट झाले नसते."
"तुझ्या साठी आमचा नकार जास्त फायदेमंद होता."
वामन स्वामींना अनन्य भावांनी शरण जातो.
 

(९९) गुरु तारणहार

राज्यात पाण्याची टंचाई होते, म्हणुन राजे विहीरी आणी पाणपोई बनवा अशी आज्ञा देतात.
नथोबाला ही जवाबदारी देण्यात येते. नथोबा अनन्य स्वामीभक्त होता.
राज्याच्या दरबारात दाजीबा नावाचा एक  अगदी अप्रामाणिक व्यक्ती होता.
तो नथोबाला खर्च जास्त दाखवून उरलेली रकम आपसात वाटू, असा सल्ला देतो.
प्रामाणिक नथोबा ठाम पणे नकार देतो.
रघुनाथ शास्त्री दाजीबाला कुटील सल्ला देतो. त्याप्रमाणे दाजीबा राजाला चाहाडी करतो की नाथोबा सरकारी खजिन्यात
गफलत करत आहे.
राजा हिशोब मागवतात तर खरच फार मोठी रकम कमी निघते.
राजा नथोबाला बडतर्फ करतात आणी १०० फटक्याची शिक्षा पण ठोठावतात.
रात्री राजा स्वामींच्या दर्शनाला येतात, नमस्कार करतांना स्वामी राजाला हातानी ढकलून पाडून देतात.
स्वामी रागावतात: "अरे राजा असून डोळ्यावर झापड  लाऊन काय बसला आहे. राजानी डोळस असले पाहिजे."
"अरे पूर्ण शाहनिशा न करता तु प्रामाणिक आणी निष्पाप लोकांना काय शिक्षा करतो."
"अरे हे सर्व दाजीबानी रचलेला कट आहे.तितक्यात खजिन्याचे अधिकारी येउन सांगतात की हिशोब अगदी चोख आहे आणी
काही गल्लत झाल्यामुळे हिशोब चुकला होता."
राजा नथोबाची शिक्षा माफ करुन पुन्हा कामावर पण रुजू करतो.
पण नथोबाचा तर मोह्भंग झाला होता, तो संसाराला राम-राम करून स्वामी-सेवेत आयुष्य काढायचे ठरवतो.

(९८) प्रपंच आणी परमार्थ

रामू आणी अनुसुया, हे एक जोडपं होते. वयाची साठी ओलांडली तरी वागणे एका नूतन लग्न झालेल्या जोडप्या सारखे-
सदैव बरोबर हिंडणे, बरोबर जेवणे, त्यांना जणुएकमेकाशिवाय करमत नव्हते.
एकदा स्वामी रामू ला म्हणतात -" अरे साठी ओलांडली तरी फक्त प्रपंचात काय गुरफटला आहे.
काही देवाचे कर तीर्थाटन कर."
मग काय रामू बुवा निघाले तीर्थाटन करायला पण जोडीनी.
काही दुर गेल्यावर अनुसूया बाई दमतात आणी रामू बुवा तिच्या साठी पाणी आणायला जातात.
पाणी घेऊन येतात तर पहातात त रकाय अनुसूया बाई जागेवर नाही. कितीही शोधले तरी सापडत नाही.
रामू बुवा स्वामी कडे परतून आपले घाराणे सांगतात.
स्वामी रामूची हाजिरीघेतात: " काय रे जन्म घेताना बरोबर घेऊन आला होता का ? अरे जाताना तिला बरोबर घेऊन जाणार
होता का? अरे योग होतो पण कधी न कधी तर वियोग तर होणारच."
"अरे आप्तजनांचा वियोग तर होणारच कारण जग असच नश्वर आहे.".
"अरे म्हणुन तर नश्वर चा त्याग करुन ईश्वरा कडे जायला पाहिजे."
रामू स्वीकारार्थी चर्या करतो पण खिन्नपणा नी तिथुन निघतो.
स्वामी हाक मारतात: " अरे एकटा काय जात आहे, या अनुसुयेला कोण नेणार ?"
रामू मागे पाहतो तर काय अनुसूया उभी होती.
अनुसूया सांगते की मी जिथे बसली होती तिथे डोळे लागले आणी डोळे उघडले तेव्हा इथे आलेली होती.
रामुला कळते की आपली प्रपंचाची आसक्ती कमी होऊन आध्यात्मिक उन्नती व्हावी म्हणुन स्वामींनी ही लीला केली होती.

Sunday, October 16, 2011

(९७) गोष्ट सखुची

सखु नावाच्या एका विवाहित स्त्रीला पांढरे दाग उभरतात. नवरा आणी सासू तिचा तिरस्कार करुन तिला माहेरी पाठवतात.
कितीही वैद्य हकीम केले तरी गुण येत नाही.
एकदिवस सखु देवाला दोष देत बसली होती. तितक्यात तिथे एक साधू येउन तिला अक्कलकोटला जा अस सांगतो.
सखु आपल्या बाबांना घेऊन अक्कलकोटला निघते.
प्रवासात होणाऱ्या त्रासांनी तिचे बाबा कंटाळतात त्यांना हेच वाटायचे की जिथे वैद्य-हकीम काही करू शकले नाही
तिथे एक गोसावी काय करेल.
पण सखुचा विश्वास दृढ होता.
अखेरचे ते अक्कलकोट गाठतात.
स्वामींना सखु आपले घाराणे सांगते ,स्वामी तिला एक पांढरा दगड देउन तोंड धुताना डागावर घास असे सांगतात.
सखु तसेच करते. तिचे बाबा डागाच्या जागेवर घाव होईल असं सांगून तिला परावृत्त करतात.
पण सखु स्वामी आज्ञेचे पालन करते.
पाहत-पाहता काही दिवसांनी सखुचा दाग पूर्णपणे बरा होतो.
ती स्वामींचे आभार मानते.
स्वामी बोध करतात: "कर्माचे फळ भोगावे लागतात, ते सुटत नाही पण गुरु त्या भोगाची तीव्रता कमी करतो.
"मनुष्याला सन्मार्गाचा रस्ता दाखवतो."
"झालेल्या  वाईट कर्माचे प्रारब्धात परिवर्तन  होण्याआधी त्यांना उपसनेनी नष्ट करा."
सखुचे वडील स्वामींवर अविश्वास दाखवल्या बद्दल क्षमा मागतात.


 

(९६) गोष्ट चीमाच्या गडूची

रामचंद्र नावाच्या एका भक्ता कडे स्वामी येतात. तिथे जाऊन ते चक्क विहिरीच्या पाळीवर जाऊन बसतात.
रामचंद्राची मुलगी चीमा स्वामींना एका गडूत पाणी आणुन देते, स्वामी पाणी पिऊन गडू विहिरीत टाकतात.
तो गडू चीमाचा आवडता होता. ती स्वामींना विचारते: " गडू का विहिरीत टाकला?"
स्वामी म्हणतात:" गडू पाहिझे तर जा विहिरीत आणी काढ."
चीमा काही विचार न करता विहिरीत उडी मारते.
विहीर १०० हात खोल होती. तिच्या आईवडिलांचा जीव कासावीस होतो.
ते मदतीला लोकांना बोलावतात.
स्वामी म्हणतात: " ती आपल्या मर्जीनी गेली आणी आपल्या मर्जीनी परत येईल. "
काही वेळानी चीमा आपोआप विहिरीतून बाहेर येते.
स्वामी बोध करतात: " गुरुवर विश्वास ढळ असावा काहीही झाले तरी गुरु आपल्यासाठी जे करणार ते हिताचेच असणार
अशी भावना असावी."
रामचंद्र आपली चुक मान्य करुन स्वामी चरणी मस्तक ठेवतो.

(९५) मृत्युपासून सुटका

शास्त्रीबुवा काशीचे प्रकांड ज्योतिषी होते. लग्नाचे अनेक वर्षे झाले तरी त्यांना अपत्य झाले नव्हते.
काही काळ लोटल्यावर त्यांना अपत्य प्राप्ती होते- तीही दत्त जयंतीच्या दिवशी.
पण शास्त्री बुवांच्या चर्येवर विशाद पसरला होता. कारण त्यांनी त्याची कुंडली मांडुन तो अल्पायुषी आहे असे जाणले होते.
कुंडली प्रमाणे वयाच्या आठव्या जन्मदिवसा वर मुलाला देवाज्ञा होणार होती.
जशे-जशे मुलाचे वय वाढत होते, शास्त्रीबुवांची बैचेनी वाढत होती.ते श्रीधर च्या आयुष्यासाठी कठोर अनुष्ठान करतात.
त्यांना देववाणी होते की अक्कलकोटला स्वामी समर्थ यांच्या कडे जायची..
शास्त्रीबुवा आपल्या परिवारासह अक्कलकोटला जातात. स्वामी त्यांची राहण्याची व्यवस्था करवतात.
दत्त जयंती येणार होती. सर्व जन आनंदात होते पण शास्त्रीबुवा अत्यंत चिंतीत होते,
कारण दत्त जयंतीच्या दिवशीच त्यांचा मुलगा श्रीधरला याला देवाज्ञा होणार होती.
दत्त जयंतीच्या दिवशी स्वामींची पाद्य पूजा झाल्यावर श्रीधर धरतीवर कोसळतो, त्यचे हात-पाय गार पडायला लागतात.
शास्त्री बुवा स्वामींची करुणा भाकतात. स्वामी शिष्याकडून काळे उडीद मागवतात.
शास्त्रीबुवांचा  तर थरकम्पच सुटतो कारण काळे तीळ अंतिम संस्कारात लागतात.
स्वामी तिळात साखर घालुन श्रीधरच्या तोंडात घालतात.
श्रीधर खाडकन उभा राहतो.
 मग स्वामी त्याला घ्यायला आलेल्या यमदूताना एक सुकलेले झाडाला घेऊन जा अशी आज्ञा करतात.
झाड जमिनीवर कोसळते.श्रीधरचे गंडांतर टळतो.

(९४) स्वामी तारणहार

सावित्री नावाची एक स्वामीभक्त स्त्री होती. तिला पोट दुखीची बाधा होती, केव्हाही तिचे पोट दुखायचे आणी ती बेजार व्हायची.
एक दिवस तिच्या घरी स्वामी यायचे असतात,त्या दिवशी पण तिला पोट दुखीचा त्रास होतो.
पण ती सहन करते तोंडानी स्वामींशी काहीही बोलत नाही.
भोजन झाल्यावर खुद्द स्वामी विचारतात की काही म्हणायचे किंवा अपेक्षा आहे का, पण सावित्री बाई काहीही म्हणत नाही.
त्या दिवशी रात्री सावित्रीबाईना पुन्हा वेदनेची लहर येते, या वेळेला वेदना इतकी तीव्र होती की सावित्रीबाई वैतागून उठते.
आणी त्याचं अवस्थेत विहिरीवर जीव द्यायला जाते. स्वामींना अंतर ज्ञानांनी ते कळते आणी ते शिष्यांना तिला अडवायला पाठवतात.
शिष्य सावित्री बाईंना स्वामी समोर आणतात.
स्वामी म्हणतात: " कोणताही दुखद भोग मनुष्याला आपल्या मागच्या कर्मा मुळे प्राप्त होतो, आत्महत्या हा त्यावर तोडगा नाही,
मागचे कर्म तर नष्ट होत नाही उलट आत्मघात करण्याचे पातकाची सुद्धा त्यात भर पडते."
"भोगला भोगून किंवा उपसानेनी जाळून नष्ट करायचा असतो."
मग स्वामी पुजारी बुवा कडून वाटलेली सुंठेची पूड सावित्रीला देतात.
ती पूड खाल्या बरोबर सावित्री बाईची पोटदुखी कायमची दुर होते.

Saturday, October 8, 2011

(९३) गोष्ट अब्दुल्लाची

अब्दुला नावाचा एक मुस्लीम व्यक्ती पोलीस खात्यात जमादार होता.तो अनन्य स्वामीभक्त होता.
त्याचे नौकरीचे अगदी शेवटचे काही वर्ष उरले होते.
एकदा काही दुर्दांत कैद्यांना पलीकडच्या गावात तहसीलदाराच्या कचेरीत न्यायचे होते.
त्या कैद्यातला एक कैदी अब्दुलच्या हातावर तुरा देउन पळतो.
अब्दुल त्याचा पाठलाग करतो. खूब शोधले तरी तो कैदी सापडत नाही.
अब्दुल मनोमन स्वामींची प्रार्थना करतो: "पूर्ण नौकरी अगदी बेदाग झाली आता शेवटच्या टप्प्यावर दाग नको ,
जर हा कैदी मिळाला तर
नौकरीतून राजीनामा देउन स्वामी सेवेत आयुष्य घालीन."
काही वेळानी एक तेजस्वी व्यक्ती येउन तो कैदी त्याच्या स्वाधीन करतो.
कैदी सांगतो: " हा कोणी तरी विलक्षण व्यक्ती होता आम्हाला साधा प्रतिकार सुद्धा करता नाही आला ,
जसे त्यांनी आम्हाला आणले तसेच आम्हाला यावे लागले."
अब्दुलला कळते की खुद्द स्वामीनी येउन कैदी आपल्या स्वाधीन केला आहे.
अब्दुल आपल्या वचनाचा पक्का होता.
तो नौकरीचा राजीनामा देउन स्वामी सेवेत येतो.
तो स्वामींच्या चरणी सेवा करीत राहिला. पुढे तो सिद्ध पुरुष झाला.
स्वामींनी त्याला पूजेसाठी आपल्या पायातील एक जोडा दिला होता. त्याच पादुका समझून तो पूजा करी.
रोगी व व्याधीग्रस्ताना तो चर्म पादुका खालची माती देई व त्या प्रसादाने त्यांचे रोग बरे होत होते.
अनेक ब्राह्मण ही त्या सिद्ध पुरुषाला वंदन करीत.
हा औलिया आला की स्वामी म्हणायचे ,"आवो पीर साहेब !"
त्यांनी मैन्दर्गीस स्वामींचे मंदिर बांधून तेथे पुजेची व्यवस्था ब्राह्मणा करवी केली. त्याला वाचा सिद्धी पण मिळाली होती.

(९२) नागु अण्णांना दिली दृष्टी

नागू अण्णा मोरगाव चे एक गृहस्थ होते. त्यांची एकाएक नेत्र ज्योती मंद होऊन ते अंधत्वाला प्राप्त होतात.
नोकरी जाते, साठवलेले अन्न किती दिवस पुरणार, ते गरीबिनी गांजले जातात.
ते तुळजापूरच्या भवांनी माते कडे जाऊन तिला साकडे घालतात आणी कठोर उपासना करतात.
देवी त्यांना साक्षात्कार देउन अक्कलकोटला स्वामींच्या शरणी जा अस सांगते.
स्वामी नागू अण्णाला पंढरपूर ला जा अशे सांगतात.
अंध नागू अण्णा कशे-बशे प्रवास करत पंढरपूरला पोह्चतात.
त्यांना तिथे एक व्यक्ती भेटतो, तो आपले परिचय नेत्र वैद्य म्हणू देतो.
तो नागू अण्णाला एका झोपडीत नेऊन त्यांच्या डोळ्यावर शस्त्र क्रिया करुनपट्टी बांधतो.
मग तो म्हणतो: " नागू अण्णा आता तुम्ही विश्रांती घ्या, सकाळी  स्वताच आपल्या डोळ्यावरील पट्टी उघडा. मीआता निघतो"
दुसऱ्या दिवशी नागू अण्णा आपली पट्टी उघडतात तर त्यांना सर्व पूर्वी प्रमाणे दिसते.
ते विचार करतात की आता त्या नेत्र वैद्याच्या पायावर एकदा डोक ठेऊ आणी मगच परत जाऊ.
पूर्ण गाव शोधले तरी त्यांना कोणी नेत्र वैद्य सापडत नाही.
संपणार तरी कसा, त्या वेळेला डोळ्याचे डॉक्टर सुद्धा नसायचे वैद्य आणी तोही शस्त्र-क्रिया करणारा कुठून भेटणार?
त्यांना कळते की स्वामीनी खुद्द येउन त्यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया केली असावी.
ते लगबगीनी अक्कलकोटला येतात.पहिले आभार मानतात मग म्हणतात अहो स्वामी तुम्ही इथेच का नाही माझे डोळे बरे केले हो?
स्वामी म्हणतात: " प्रत्येकाची भोग संपण्याची वेळ आणी ठिकाण ठरलेले असतं, त्या शिवाय कुणाचे ही भोग संपत नाही."
नागू अण्णा स्वामींच्या चरणी मस्तक ठेवतात.

विशेष: या गोष्टीत विशेष म्हणजे स्वामींनी नागू अण्णाच्या डोळ्याचे operation केले. आपले खगेश नावाचे सभासद आहे,
 त्यांचे गुरुजी यांचे पण स्वामींनी operation केले होते, ते पण स्वामीनी भौतिक देह त्याग केल्या नंतर.
खगेश चे गुरुजी कान्हेरे गुरुजी आहे, मागच्या बातमी पर्यंत तरी ते पुण्यात राहत होते.
ही गोष्ट पण ' स्वामीनी  केले operation" या topic मध्ये लिहिलेली आहे.
रामदास स्वामींच्या मातोश्रींना पण अंधत्व आले होते आणी समर्थांनी त्यांच्या डोळ्यावर हात फिरवून दृष्टी दिली होती.
(त्यांच्या आईला वाटले की मुलगा काही चेटकी विद्या शिकून आला आहे.
यावर रामदास स्वामीनी काव्यात दिलेले उत्तर जग प्रसिद्ध आहे. त्याप्रमाणे भुताचे नादी लागलो खरे
पण राम नावाच्या भुताच्या नादी लागलो.)
पण समर्थ स्वामींची तर कमाल आहे चक्क operation करतात.

Sunday, October 2, 2011

(९१) स्वामीनी केली कर्जापासून सुटका

सोलापूर मध्ये राहणाऱ्या एका गृहस्थाची ही कथा आहे. विशेष म्हणजे काही वर्षा पूर्वी झालेली ही घटना
आहे.
एक गृहस्थ होता. घराच्या कर्जाचे हप्ते फेडता न आल्यानी बँक त्याचे घर जब्त करणार होती.
तो कंपनीत कर्जा साठी अर्ज करतो पण लोन पास होत नाही
आणी उलट जागतिक मंदीमुळे त्याला नारळ मिळतो.
नोकरी गेली आता घर जाऊन आपण सडकेवर येणार या भितीनी तो आपल्या मुली आणी बायकोला घरी सोडुन
वाटेल त्या वाटेला पळून जातो.
एका बागेच्या बाकावर तो हात-पाय गळुन बसला होता, तितक्यात एक रुबाबदार सुट घातलेला माणूस मोटारीतून उतरतो आणी
स्वामींच्या मंदिराचा रस्ता विचारतो.
नंतर तो श्रीमंत माणूस आपुलकीनी त्याच्या चिंतेचे कारण विचारतो. तो गृहस्थ आपले सर्व वृतांत सांगतो.
श्रीमंत व्यक्ती त्याचे सांत्वन करुन त्याला बोध करतो:
"मार्ग कधीही संपत नाही मनुष्याचा शोध संपतो "
"अरे आपले दुख किती मोठे आहे हे जगाला न सांगता, दुखाला सांग की माझा देव किती मोठा आहे"
दुखत असलेल्या माणसाला कितीही कोणी सम्झावले तर फारसे पटत नाही. श्रीमंत माणूस जातो पण त्याची ब्रीफ केस राहुन जाते.
तो गृहस्थ ओरडून श्रीमंत व्यक्तीला थांबवतो पण तो श्रीमंत माणूस कार मध्ये बसून निघून जातो.
गृहस्थ मागे परततो तेव्हा त्याच्या हातातून ब्रीफकॅस पडते आणी उघडते, गृहस्थ पाहतो तर काय त्यात पैशे होते.
तो एका निर्जन  स्थानी पैशे मोजतो तर काय नेमके तेवढेच पैशे जेवढे त्याचे कर्ज होते.
तो त्या श्रीमंत व्यक्तीला आठवतो तर त्याचा चेहरा-मोरा फार काही स्वामी सारखंा होता. त्याला कळतं की स्वामीच
श्रीमंत व्यक्तीच्या रुपात येउन त्याची मदत करुन गेले आहे.
तो घरी परततो. तेव्हा बँक त्याच्या बायको-लेकीला घराबाहेर काढून घर सील करत होतं,
तो बँकेच्या माणसाला पैशे देउन घराचा ताबा मिळवतो.
जेव्हा बायको-लेकीला सर्व वृतांत सांगतो, तेव्हा दोघींनाही गहिवरून येत.
ते अनन्य भावांनी स्वामींच्या फोटोला नमस्कार करतात.

(९०) गोष्ट इच्छा भोजनाची

दामाजी आणी तुळसा एक जोडपे होते. ते अत्यंत दरिद्री असले तरी त्यांना स्वामींना भोजन करावायचे होते.
ते शिधा घेऊन स्वामींकडे येतात.
स्वामी त्यांना आम्ही चर-चरात आहे असं सांगुन धर्मशाळेत जेवण तैयार करुन चार ब्राह्मण वाढ, असे सांगतात.
दामाजी चार ब्राह्मणांना जेवण घालतो.
आता त्यांच्या कडे तीन पत्रावळी इतकेच अन्न शिल्लक उरते. एक पत्रावळ स्वामींना देउन
नंतर आपण भोजन करू असे ते ठरवतात.
तितक्यात एक हिंदी भाषी बिहारी ब्राह्मण येउन जेवणाची इच्छा प्रगट करतो.
दामाजी त्याला एक पत्रावळभर अन्न देतो.
पण तो पूर्वी ब्राह्मण जेवणाचा पक्का होता. तो अजून जेवण मागतो.
दामाजी दुसरी पत्रावळ पण देतो.
ब्राह्मण तरीही अन्न मागतो.
शेवटी दामाजी त्याला शेवटची उरलेली पत्रावळ पण देतो.
ब्राह्मण तृप्त होतो आणी जाता-जाता त्यांना  पत्रावळीतली काही भजी प्रसाद म्हणून देतो.
दामाजी आणी तुळसा स्वामींचे दर्शन करुन प्रसाद ग्रहण करू अशे ठरवतात.
स्वामी त्यांना पहिल्या बरोबर म्हणतात: " अरे पेट भर भोजन कराया पर भजीये में नमक कम था."
दामाजी आणी तुळसा भजी खातात तर खरच मीठ कमी होते.
त्यांची खात्री पटते की स्वामी बिहारी ब्राह्मणाच्या रुपात येउन अन्न ग्रहण करुन गेले होते.
तितक्यात नारायण शास्त्रीनी पाठवलेली दोन इंग्रज अधिकारी स्वामींची उगीच्ची शहा-निशा करुन चमत्कार दाखवा असा हट्ट करतात.
स्वामी फाडकन म्हणतात: "पहिले एकमेकांच्या बायका बरोबर झोपणे बंद करा मग या आमची चोकशी करायला या."
आपले गुपित स्वामी जाणुन आहे हे कळल्यावर इंग्रज अधिकारी मान खाली घालुन चालते होतात.

(८९) गच्छत: स्खलनं क्वापी, असे मानुनी नच हो कोपी

पांडुरंग एक उत्तम दर्ज्याचा सोनार होता पण तो जमीनदाराच्या कर्जामुळे गांजला होता. कर्ज न फेडता आल्यानी त्याचे घर जब्त
होणार होते. पण कितीही संकट आले तरी तो स्वामींचे नामस्मरण सोडत नव्हता.त्याचा ठाम विश्वास होता की नाम स्मरणानी
त्याचे भोग संपतील.
अश्या परिस्थितीत त्याला सावकारा कडून दागिने करण्यासाठी आगाऊ रक्कम मिळते.
पांडुरंगला कुबुद्धी होऊन तो चांदीचे दागिने करतो आणी सोन्याचे पाणी चढवून देतो.
आणी वाचलेल्या पैश्यांनी जमीनदाराचे कर्ज फेडतो.
पण खोटे काम किती दिवस लपणार, सावकार त्याला अटक करवतो.
न्यायाधीश त्याला १०० फटक्याची शिक्षा ऐकवतो.
शिपाई फटका घेऊन पांडुरंग सोनारावर  मारतो पण काय त्याच्या पाठीवर लागायच्या आधी फटका फुलाच्या माळेत
बदलतो.
तितक्यात तिथे स्वामी प्रगट होतात.
स्वामी पहिले तर पांडुरंगाची चांगलीच हाजेरी घेतात मग म्हणतात :
"पांडुरंग तु अपराध जरी केला तरी अपराधाच्या तीव्रते पेक्ष्या तुझी भक्ती  जास्त होती, म्हणुन आम्हाला यावे लागले."
मग स्वामींच्या दृष्टीनी चांदीचे दागिने पूर्णपणे सोन्याचे होतात.
स्वामी पुन्हा बोध करतात:" भोग संपवण्या करता वाईट मार्गाचा वापर करू नका तात्पुरते भोग संपले तरी जास्त तीव्रतेनी
ते परतणार."
पांडुरंग आपली चुक मान्य करुन अनन्य भावांनी स्वामी चरणीलीन होतो.