Sunday, October 2, 2011

(८९) गच्छत: स्खलनं क्वापी, असे मानुनी नच हो कोपी

पांडुरंग एक उत्तम दर्ज्याचा सोनार होता पण तो जमीनदाराच्या कर्जामुळे गांजला होता. कर्ज न फेडता आल्यानी त्याचे घर जब्त
होणार होते. पण कितीही संकट आले तरी तो स्वामींचे नामस्मरण सोडत नव्हता.त्याचा ठाम विश्वास होता की नाम स्मरणानी
त्याचे भोग संपतील.
अश्या परिस्थितीत त्याला सावकारा कडून दागिने करण्यासाठी आगाऊ रक्कम मिळते.
पांडुरंगला कुबुद्धी होऊन तो चांदीचे दागिने करतो आणी सोन्याचे पाणी चढवून देतो.
आणी वाचलेल्या पैश्यांनी जमीनदाराचे कर्ज फेडतो.
पण खोटे काम किती दिवस लपणार, सावकार त्याला अटक करवतो.
न्यायाधीश त्याला १०० फटक्याची शिक्षा ऐकवतो.
शिपाई फटका घेऊन पांडुरंग सोनारावर  मारतो पण काय त्याच्या पाठीवर लागायच्या आधी फटका फुलाच्या माळेत
बदलतो.
तितक्यात तिथे स्वामी प्रगट होतात.
स्वामी पहिले तर पांडुरंगाची चांगलीच हाजेरी घेतात मग म्हणतात :
"पांडुरंग तु अपराध जरी केला तरी अपराधाच्या तीव्रते पेक्ष्या तुझी भक्ती  जास्त होती, म्हणुन आम्हाला यावे लागले."
मग स्वामींच्या दृष्टीनी चांदीचे दागिने पूर्णपणे सोन्याचे होतात.
स्वामी पुन्हा बोध करतात:" भोग संपवण्या करता वाईट मार्गाचा वापर करू नका तात्पुरते भोग संपले तरी जास्त तीव्रतेनी
ते परतणार."
पांडुरंग आपली चुक मान्य करुन अनन्य भावांनी स्वामी चरणीलीन होतो.

No comments:

Post a Comment