Sunday, October 16, 2011

(९४) स्वामी तारणहार

सावित्री नावाची एक स्वामीभक्त स्त्री होती. तिला पोट दुखीची बाधा होती, केव्हाही तिचे पोट दुखायचे आणी ती बेजार व्हायची.
एक दिवस तिच्या घरी स्वामी यायचे असतात,त्या दिवशी पण तिला पोट दुखीचा त्रास होतो.
पण ती सहन करते तोंडानी स्वामींशी काहीही बोलत नाही.
भोजन झाल्यावर खुद्द स्वामी विचारतात की काही म्हणायचे किंवा अपेक्षा आहे का, पण सावित्री बाई काहीही म्हणत नाही.
त्या दिवशी रात्री सावित्रीबाईना पुन्हा वेदनेची लहर येते, या वेळेला वेदना इतकी तीव्र होती की सावित्रीबाई वैतागून उठते.
आणी त्याचं अवस्थेत विहिरीवर जीव द्यायला जाते. स्वामींना अंतर ज्ञानांनी ते कळते आणी ते शिष्यांना तिला अडवायला पाठवतात.
शिष्य सावित्री बाईंना स्वामी समोर आणतात.
स्वामी म्हणतात: " कोणताही दुखद भोग मनुष्याला आपल्या मागच्या कर्मा मुळे प्राप्त होतो, आत्महत्या हा त्यावर तोडगा नाही,
मागचे कर्म तर नष्ट होत नाही उलट आत्मघात करण्याचे पातकाची सुद्धा त्यात भर पडते."
"भोगला भोगून किंवा उपसानेनी जाळून नष्ट करायचा असतो."
मग स्वामी पुजारी बुवा कडून वाटलेली सुंठेची पूड सावित्रीला देतात.
ती पूड खाल्या बरोबर सावित्री बाईची पोटदुखी कायमची दुर होते.

No comments:

Post a Comment