Saturday, October 8, 2011

(९३) गोष्ट अब्दुल्लाची

अब्दुला नावाचा एक मुस्लीम व्यक्ती पोलीस खात्यात जमादार होता.तो अनन्य स्वामीभक्त होता.
त्याचे नौकरीचे अगदी शेवटचे काही वर्ष उरले होते.
एकदा काही दुर्दांत कैद्यांना पलीकडच्या गावात तहसीलदाराच्या कचेरीत न्यायचे होते.
त्या कैद्यातला एक कैदी अब्दुलच्या हातावर तुरा देउन पळतो.
अब्दुल त्याचा पाठलाग करतो. खूब शोधले तरी तो कैदी सापडत नाही.
अब्दुल मनोमन स्वामींची प्रार्थना करतो: "पूर्ण नौकरी अगदी बेदाग झाली आता शेवटच्या टप्प्यावर दाग नको ,
जर हा कैदी मिळाला तर
नौकरीतून राजीनामा देउन स्वामी सेवेत आयुष्य घालीन."
काही वेळानी एक तेजस्वी व्यक्ती येउन तो कैदी त्याच्या स्वाधीन करतो.
कैदी सांगतो: " हा कोणी तरी विलक्षण व्यक्ती होता आम्हाला साधा प्रतिकार सुद्धा करता नाही आला ,
जसे त्यांनी आम्हाला आणले तसेच आम्हाला यावे लागले."
अब्दुलला कळते की खुद्द स्वामीनी येउन कैदी आपल्या स्वाधीन केला आहे.
अब्दुल आपल्या वचनाचा पक्का होता.
तो नौकरीचा राजीनामा देउन स्वामी सेवेत येतो.
तो स्वामींच्या चरणी सेवा करीत राहिला. पुढे तो सिद्ध पुरुष झाला.
स्वामींनी त्याला पूजेसाठी आपल्या पायातील एक जोडा दिला होता. त्याच पादुका समझून तो पूजा करी.
रोगी व व्याधीग्रस्ताना तो चर्म पादुका खालची माती देई व त्या प्रसादाने त्यांचे रोग बरे होत होते.
अनेक ब्राह्मण ही त्या सिद्ध पुरुषाला वंदन करीत.
हा औलिया आला की स्वामी म्हणायचे ,"आवो पीर साहेब !"
त्यांनी मैन्दर्गीस स्वामींचे मंदिर बांधून तेथे पुजेची व्यवस्था ब्राह्मणा करवी केली. त्याला वाचा सिद्धी पण मिळाली होती.

No comments:

Post a Comment