Sunday, September 25, 2011

(88) चोळप्पाच का?

अखेर नारायणशास्त्री  स्वामींच्या सामोरे येतात.
ते स्वामींना फटकळ पणे विचारतात की फार दंत कथा ऐकल्या आहे तुमच्या बद्दल, काही चमत्कार करुन दाखवा.
स्वामींच्या प्रत्येक चमत्कारा माघे काही विशिष्ठ हेतू असायचा त्या अतिरिक्त स्वामींनी कधीही चमत्कार दाखवले नव्हते.
नारायणशास्त्रीला ही चमत्कार दाखवणे त्यावेळी स्वामीनी गरजेचे समजले नाही. आणी प्रांजळपणे 
मी सामान्य माणूस आहे असे म्हणुन टाळतात.
नारायण शास्त्री स्वामींना बोल बोलत गर्वाने तिथुन निघतात.
अहमद एका गावकऱ्या बरोबर जाऊन नारायण शास्त्रींना जाब विचारतो. कुटील नारायण शास्त्री त्यांना भ्रमित करतात.
नारायण शास्त्री:- "अरे गुरूंना सर्व शिष्य समान असायला हवी मग स्वामी चोळप्पा- चोळप्पा कशाला करतात?"
"चोळप्पा त्यांना पोसतो म्हणुन स्वामींनी त्याला विशेष दर्जा दिला आहे."
शिष्य या तर्काच्या आहारी जातात.
ते स्वामींना जाब विचारण्यासाठी येतात.
स्वामी त्यांना आपल्या बरोबर या असे सांगतात.
चोळप्पा बरोबर सर्व लोकं स्वामींच्या मागे जातात.
स्वामी काटेरी रस्त्यात शिरतात चोळप्पाला वगळून सर्व शिष्य थांबतात.
काही दुर जाऊन स्वामी परततात आणी म्हणतात :-" ह्या साठी आम्हाला चोळप्पा प्रिय आहे."
"खरा शिष्य कितीही अडचणी आल्या तरी गुरुची साथ सोडत नाही,सर्व शिष्य मान खाली घालतात. त्यांना आपली चुक कळते."
स्वामी म्हणतात: "अरे चोळप्पाचे आणी आमचे नाते जन्मा-जन्मा पासुन आहे."
" शिष्याला गुरु प्रती श्रद्धा, निष्ठा आणी भक्ती पाहिजे."
"आणी चोळप्पा मध्ये हे सर्व गुण असल्यामुळे चोळप्पा  आम्हाला प्रिय आहे."


(८७) मीपणाचा त्याग

स्वामी नृसिंह सरस्वती चे अवतार आहे, हे नारायण शास्त्रींना फारसे पटत नाही.
मार्तंड मंदिराचा पुजारी त्यांना अक्कलकोटला जाणाऱ्या रामदासी बुवांची ओळख करुन देतो.
शास्त्रीबुवा महंता बरोबर अक्कलकोटला निघतात.
रामदासी बुवा एका मठाचे महंत होते.
 फार विद्वान चतुर्वेदी ब्राह्मण पण फार गर्विष्ठ.
वेद शास्त्रार्थात  चांगल्या-चांगल्यांचा पराभव  करायचे मग त्यांना शिक्षा म्हणुन आपले पायताण डोक्यावर घेऊन उभे ठेवायचे.
एक दिवस स्वामी तिथे येउन मुक्कामाची परवानगी मागतात. मठात जागा नसते म्हणुन ध्यान-कक्षात
फक्त एका तासा साठी त्यांना परवानगी देतात.
स्वामी तिथे गाढ झोपतात.
एका तासानी महंत येतात आणी स्वामींना उठवतात पण स्वामी काही उठत नाही.
स्वामींची अद्दल घडवायला, महंत बुवा खोलीला बाहेरून ताळा लावून जातात.
स्वामी मठात आहे म्हणुन दर्शनाला स्वामीभक्त गोरे शास्त्री येतात.
महंत त्यांना सांगतात की त्यांनी स्वामींना खोलीत डांबून ठेवले आहे.
गोरेशास्त्री समाझवतात की स्वामी चैतन्य आहे व कोणीही त्यांना अशे डांबून ठेऊ शकत नाही.
पण महंत काही ऐकत नाही.
गोरे शास्त्री स्वामींच्या खोलीच्या दाराबाहेर खिन्न मनानी बसून राहतात.
तितक्यात दारातून एक ज्योती बाहेर पडते. गोरेशास्त्री त्या जोतीच्या मागे जातात.
पुढे एक सरोवर येतं. ज्योती सरोवरात लुप्त होते आणी त्याजागी स्वामी सरोवरात सुर्याला अर्घ्य देत असतात.
महंत तिथुनच जात असतात.स्वामींना बघून महंत अगदी थबकतात.
 स्वामी बाहेर येतात. महंत आणी गोरे बरोबर स्वामी पुन्हा मठात येतात.
महंत खोलीचे दार उघडतात तर तिथे स्वामी गाढ झोपलेले दिसतात. आणी त्यांचा बरोबर स्वामी उभे पण असतात.
एका बरोबर स्वामींचे दोन रूप पाहुन महंत शरण येतात.

स्वामी शिकवण देतात-" शास्त्री  बुवा, तुम्ही ज्ञानी आहा पण अहंकार तुमच्या प्रगतीत बाधक आहे. "
"अहंकारणी राग येतो आणी राग राखेत मिळवतो."
"प्रकाशाला कोणी कोंडू शकत नाही."
"ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ असते कारण ज्ञानात अपेक्षा असते पण भक्ती निरपेक्ष असते."
महंत बुवा चूक मान्य करुन स्वामी भक्त बनतात.

(८६) स्वामी प्रगट झाले

मार्तंड मंदिराचा पुजारी स्वामीच नृसिंह सरस्वती महाराज आहे अशे नारायण शास्त्रींना सांगतात.
श्री नृसिंहसरस्वती महाराज भक्तांकडून शेवटचा निरोप घेतात. भक्तांना फार दुख होतं.
त्यांचे सांत्वन करायला ते म्हणतात: " अरे दत्त परंपरा ही निर्गुण परंपरा आहे, वडाच्या पारंब्या जमिनीत जाऊन नवीन वृक्ष तैयार
होतो तशेच आम्ही विभिन रुपात अवतरत राहतो.
पुढे कलीयुगाचा अमल फार वाढणार आहे पण तो भक्तिमार्गाची कास धरणाऱ्या लोकांना नडणार नाही.
भक्तांना अभय द्यायला आणी अभक्तांना भक्तिमार्गाला लावायला आम्ही पुन्हा येऊ.
अस म्हणुन नृसिंह सरस्वती महाराज नावेनी नदीच्या दुसऱ्या तीरावर जाऊन कर्दळीवनात दृष्टीआड होतात.
३०० वर्षानंतर उद्धव नावाचा एक लाकुडतोड्या कर्दळी वनात लाकूड तोडायला जातो.
झाड कापता कापता त्याच्या हातातून कुऱ्हाड सुटून एका भल्या मोठ्या वारुळावर आढळते.
कुऱ्हाड घ्यायला तो वारूळा जवळ जातो तर तो पाहतो तरी काय- वारुळातून रक्त येत होते.
उद्धव जाम दचकतो. तितक्यात एक भव्य व्यक्ती वारुळाला भेदून बाहेर येते.तिच्या मांडीतून रक्त वाहत होते.
उद्धव गया-वया करुन चुकून झाले असे म्हणतो.
भव्य व्यक्ती उद्धवला अभय देते आणी म्हणते:-" उद्धव हे तुझ्या हातून घडणारच होते, तु काही खंत मानु नको."
"तुझ्या हातून जग-कल्याणाची मोहिमेचा श्रीगणेश झाला आहे."
ती व्यक्ती आणखी दुसरी कोणी नसून स्वामी समर्थ असते.
स्वामी कर्दळीवनातुन कलकत्याला कालिका मातेचे दर्शन करुन गंगा तटावरून हरिद्वार करत गोदावरी नदी,
हैदराबाद,मंगळवेढा,पंढरपूर होत सोलापूर ला येतात.
सोलापूरला काही दिवस चिंतोपंत टोळ कडे मुक्काम करुन स्वामी अक्कलकोटला येतात

Sunday, September 18, 2011

(८५) रिकाम्या चिलीमीच दम

नारायण शास्त्री अक्कलकोट मध्ये मार्तंडाच्या मंदिर समोर येतात.
मंदिराचा  पुजारी त्यांना सांगतो अक्कलकोटची यात्रा या मंदिरापासूनच सुरु होते.
पुजारी या मागचे कारण सांगायला पूर्व-वृतांत सांगतो.
सोलापूर मधले चिंतोपंत टोळ यांचा  कडून स्वामी कुणालाही काही  न सांगता निघून जातात.
अक्कलकोटला ते मार्तंड मंदिरा समोर बसून राहतात. कुणी त्यांना काहीही आगत्याचे तर विचारात नाही उलट शंका-कुशंका करतात.
स्वामी ३ दिवस एकाच जागेवर बसून राहतात.
एक गावकरी गावाच्या  राखणदार अधिकारी अहमदला स्वामींना गावातून हकल अशे सांगतो.
अहमद येतो, स्वामी फक्त एका लंगोटीत होते, काही तरी असंबद्ध हातवारे करत होते.
अहमदला थट्टा-मस्करी करायची सुचते.
अहमद: " बाबाजी चिलीम पियोगे?"
स्वामी: "क्यो नही?"
अहमद स्वामींना अगदी खाली चिलीम देतो.
स्वामी त्या चिलीमीतुन  आर-पार पाहतात आणी मग हातावर आपटून त्यात असलेले काही तंबाखूचे कण सुद्धा काढून टाकतात.
मग दोनी हातांच्या पकड मध्ये चिलीम धरुन स्वामी चिलीमिचा दम मारतात, पाहता पाहता त्या रिकाम्या चिलीमी तुन धूर निघतो.
अहमद तर गारठून जातो.तो स्वामींची करुणा भाकतो.
अहमद: " आप तो औलिया हो !"
स्वामी विचारतात की चोळ्या कुठे राहतो.
अहमद त्यांना चोळप्पाच्या घरी नेतो.
स्वामी चोळप्पाच्या घरीच मुक्काम करतात.

(८४) ईश्वरीय देणगीचा बाजार मांडू नये

नारायण शास्त्रींना रस्त्यात एक महंत भेटतात. महंत त्यांना आपली कहाणी सांगतात.
त्रिविक्रम क्षेत्री नारायण सरोवराची फार प्रचीती होती.
त्यात आंघोळ केली तर मागच्या सात जन्माचे पापं फिटतात अशी मान्यता होती.
पण एका महंतांनी त्यावर आपला ताबा घेतला होता. सरोवरात आंघोळ करणाऱ्यांकडून तो कर घ्यायचा.
ज्यांना  कर देता येत नव्हता त्यांना तो सरोवराजवळ  फटकू सुद्धा देत नव्हता.
एकदा अशाच वृद्ध गरीब माणसाला तो गड्यानमार्फत हकलतो. तितक्यात स्वामी तिथे येउन त्याला जाब विचारतात.
महंत त्यांचाशी पण दुरुत्तर करतो.
स्वामी म्हणतात: " हम कोई कर नही देंगे और स्नान करेंगे."
स्वामी सरोवरा कडे जातात. महंताचे गडी त्यांना अडवणार त्याआधीच स्वामी अदृश्य होतात.
काही वेळानी महंत पाहतो तर काय , स्वामी चक्क सरोवराच्या  मधो-मध पाण्यावर बसले होते.
स्वामींच्या अधिकाराची प्रचीती महंताला येते. तो शरणागती पत्करतो.
स्वामी म्हणतात: " अरे ईश्वरानी बनवलेल्या सर्व काही, सर्वांचे  असते त्याच्यावर अधिकार गाजवू नये.
तीर्थस्थळी असा बाजार मांडुनलोकांचा छळ करू नये "
महंत आपली गादी बंद करतो. त्यानंतर नारायण तीर्थात कोणचेही कर आकारणे बंद झाले.
महंत पुढे स्वामी-संदेसचा प्रचार करायला लागला.

(८३) ईश्वर चरा-चरात आहे

नारायण शास्त्रींना रस्त्यात जनी नावाची एक बाई भेटते.
जनी भोळी-भाबडी पांडुरंगाची भक्त असते.
एकदा स्वामींच्या मुखातून पांडुरंग नाव ऐकुन ती स्वामींच्या जवळ येते.
स्वामी म्हणतात: "दत्त नगर मुल पुरुष वडाचं झाड यजुर्वेदी ब्राह्मण नाव नृसिंह भान कश्यप गोत्र रास मीन "
जनीला काही बोध होत नाही पण कोणी तरी सिद्ध पुरुष म्हणुन ती स्वामी-सेवा प्रारंभ करते.
जनी दर आषाढी एकादशीला पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जायची.
ती स्वामींची आज्ञा घेऊन या वर्षी पण पंढरपूर ला जाते.
जाताना स्वामी म्हणतात: " आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहो, आम्हाला हाक मार आम्ही येऊ"
पंढरपूरच्या सीमेवर जनी येते. तेव्हा हत्तीच्या सोन्डीचा पाऊस सुरु होतो.
जनीला मंदिरा पर्यंत जाता येत नाही. संध्याकाळ झाली तरी पाऊस थांबला नव्हता.
आपला ३५ वर्षाचा नियम तुटेल म्हणुन जनीला रडू येतं.
ती मनोमन स्वामींची  प्रार्थना करते, स्वामी तिच्या समोर प्रगट होतात.
आश्चर्याचा धक्का बसलेली जनी कशीतरी आपली व्यथा सांगते.
स्वामी म्हणतात की देव काही मंदिरातच नाही, देव चरा-चरात आहे.
तु त्याला हाक मार तो तुझ्या समोर प्रगट होईल.
जनी तसच करते, डोळे उघडते तर काय स्वामींच्या जागेवर साक्षात पांडुरंग उभा आहे.
जनी मनसोक्त आपल्या डोळ्याचे पारणे फिटवते.
थोड्यावेळानी पांडुरंगाच्या जागेवर स्वामी दिसतात.
जनीला कळतं की स्वामीच तिचा पांडुरंग आहे आणी तो जवळ असतांना ती उगीच इतके कष्ट करुन इथे आली.
ती स्वामींच्या चरणात अनन्य भावांनी  लीन होते. 

Monday, September 12, 2011

(८३) उंदीरास जीवनदान

शास्त्री पुढे निघतात, रस्त्यात त्यांना मोरोपंत नावाचा एक राजपुरोहित एक वृतांत सांगतो.
गणेश चतुर्थीचा दिवस होता.राजमहालात गणपती बसवायची पूर्ण तैयारी झाली होती.
मोरोपंत राजाची  वाट पाहत असतात. तितक्यात तिथे एक  उंदीर येऊन थैमान घालतो.
काहीही केल्या तो पकड मध्ये येत नाही.
राजा देवघरा कडे येतात तर पहातात की स्वामी आलेले आहे.
आता स्वामींशी बोलावे की गणपती स्थापना करायची, स्वामी त्याला गणपती स्थापना कर अशेसांगतात.
स्वामी बाहेर झोपाळ्यावर बसतात.
राजा पुजेला बसतो, उंदीर पुन्हा येऊन मोरोपंतांना नडतो.
मोरोपंत हातातले चंदनाचे खोड नेम धरुन उदिंराला मारतात. उंदीर प्राण सोडतो. शिपाई उन्दिराला बाहेर फेकायला जातात.
स्वामी त्याच्या कडून मृत उंदीर घेतात आणी त्याच्या पाठीवर प्रेमानी हात फिरवतात.पाहता-पाहता उंदीर जिवंत होतो.
सर्व जण थक्क होतात.
स्वामी मोरोपंताला बोध करतात: " अरे सर्व जीवात देव असतो, अरे जीवाचा वध करुन मूर्तीपुजेनी काय देव प्रसन्न होणार का?"
"अरे जर उंदीर त्रास देतो तर त्याला पकडून दुर सोडा पण जीव घेणे योग्य नाही."
"आणी मोरोपंता, रागाला आवरत जा, योग्य वेळेला राग येणे गरजेचे असले तरी शुल्लक गोष्टीवर राग करू नये."
मोरोपंत कधीही राग न करण्याचे प्राण करतात.
स्वामी म्हणतात: " अरे ह्या उंदीराला मनुष्य जन्म घेऊन आमची सेवा करायची आहे,
तो मनुष्य जन्म घेऊन आमची सेवा करेल तेव्हा त्याला मोक्ष मिळेल."
ही कहाणी ऐकुन पण नारायण शास्त्री स्वामी बद्दल अनादारानी बोलतात.
स्वामींच्या बद्दल अनादर दाखवल्या मुळे मोरोपंतांना जाम राग येतो पण ते कशे-बशे रागावर आवर घालतात.
नारायण शास्त्री  आपला पुढचा प्रवास करायला निघतात.

(८२) भाकड गाय दुध देते

रस्त्यात एका धर्म शाळेत नारायण शास्त्रींचा मुक्काम असतो. तिथे त्यांना एक ब्राह्मण प्यायला निशुल्क दुध देतो.
कारण विचारल्यावर तो सांगतो की पौर्णिमेच्या दिवशी तो वाटसरूंना निशुल्क दुध देतो.
नंतर तो आपली कथा सांगतो-
त्याचे नाव कृष्णंभट असतं. त्याच्या  गाय दुध देणे बंद करते. तरी तो तीचं नीट संगोपन करत असतो.
तो, दुसरे काही उत्पन्न नसल्यानी दारिद्रानी गांजलेला असतो.
एकदा स्वामींना तो घरी बोलावतो. त्यांचं पूजन करतो स्वामी नैवेद्य म्हणुन दुध मागतात.
कृष्णंभटला दुध देता येत नाही तो घरी दुध नसल्याचे सांगतो.
स्वामी म्हणतत: " काय रे खोटं कशाला बोलतो ,घरात गाय आहे पण आम्हाला दुध नाही अशे सांगतो."
कृष्णंभट म्हणतो : "अहो स्वामी ती गाय भाकड आहे दुध देत नाही."
स्वामी म्हणतात: " अरे ती गाय दुध देते ,आमच्याशी खोटं बोलतो."
कृष्णंभट स्वामींच्या समाधानासाठी बायकोला गाईचे दुध काढ अशे सांगतो.
दुध येणार नाही तेव्हा स्वामींचे समाधान होईल.
बायको थोडीशी चिडून दुध काढायला जाते, पण काय गाईच्या थनातून दुध येते.
तिला आधी भास वाटतो पण पाहता-पाहता हातातला पेला गच्च भरून जातो.
मोठेभांडे आणले जातात तेही भरतात.
कृष्णंभट आणी त्याची बायको स्वामींच्या चरणात पडतात.
नारायण शास्त्री ना तर आता स्वामी पक्के मांत्रिक वाटतात ते आपला पुढच्या प्रवासाला निघतात.

(८१) निपुत्रिक स्त्रीला पुत्र प्राप्ती

नारायण शास्त्री  पुढे जातात तर रस्त्यात एक लहान मुलगा स्वामी भक्ती करतांना दिसतो. शास्त्री त्याच्या आईला जाब विचारतात
की एवढ्या लहान मुलाला हे काय स्वामी भक्ती शिकवली.
ती बाई सांगते की हा अवधूत स्वामींच्या कृपेमुळेच झाला आहे.
ती आपली कहाणी सांगते.
तीच नाव रुख्मीणी असतं, लग्नानंतर फार वर्षे होऊन ही तिला संतती होत नसते, आणी त्यावर तिला क्षय रोग ही जडतो.
तिच्या नवऱ्याचा मित्र तिला स्वामींकडे आणतो. स्वामी तिला बोरीच्या झाडाची सेवा करायला सांगतात.
मागच्या जन्माच्या कर्मा मुळे हे झालं आहे पण बोरीच्या झाडाची सेवा केल्यानी हे दोष फिटणार.
बोरीचे झाड काही देवीय झाड नाही म्हणुन जोडपं वडाच्या झाडाची  प्रदक्षिणा करतात.
हे पाहून त्यांना स्वामी कडे नेणाऱ्या भक्ताला दुःख होतं आणी तो स्वामींकडे जातो.
स्वामी तिथे बोरीचे रोप लावत असतात. भक्त म्हणतो स्वामी हे रोप मोठे होईल तो पर्यंत रुख्मिणी काही राहणार नाही.
स्वामी म्हणतात की तिच्या साठी मुंबईच्या कामाठीपुऱ्यात कधीचे झाड लागले आहे.
भक्ताला स्वामींच्या वाक्यातली खोच कळते, तो लगबगीने रुख्मीणी कडे येउन स्वामी वचनाचे मर्म सांगतो.
भक्त म्हणतो: "रामाला बोर खाऊ घालणारी शबरी राम मय झाली होती तसेच स्वामी सुत राममय झाले आहे.
बोरीच्या झाडाशी तात्पर्य त्यांच्या मठात सेवा करण्याशी आहे."
रुख्मिणीचा क्षय रोग फार वाढला होता तरी ती कशी-बशी हिम्मत करुन मुंबईच्या मठात जाते आणी सेवा सुरु करते.
तिला तिथे दिवस जातात आणी त्या मध्ये तिला कळत सुद्धा नाही तिचा क्षय रोग केव्हा बरा झाला.
गोपाळ अष्टमीच्या दिवशी जसाच गोपाळ कृष्णाला पाळण्यात ठेवण्यात येतो तेव्हाच तिला पण पुत्र प्राप्ती होते.
त्या मुलाचे नाव अवधूत ठेवण्यात येत.
नारायण शास्त्रीना आता स्वामी कोणीतरी मांत्रिक वाटतो ते स्वामींना भेटायला पुढचा प्रवास करतात.

Sunday, September 4, 2011

(७९) गौतमीचा गौतम झाला

बसप्पा आणी मणब्याचा वृतांत ऐकल्यानंतर शास्त्री बुवा पुढे निघतात.
स्वामी कोणी तरी मांत्रिक असावा असं त्यांना वाटतं. रस्त्यात त्यांना एक व्यक्ती भेटतो, शास्त्रीबुवा थोड्याश्या
तिरस्कारानी त्याला म्हणतात इथे स्वामी समर्थ कुठे भेटतील,फार भाकड गोष्टी ऐकल्या आहे त्यांच्या बद्दल.
तो युवक त्यांना स्वामी महिमा सांगतो तरीही शास्त्रीबुवा म्हणतात:- "अस केले तरी काय आहे, स्वामी समर्थांनी?"
युवक म्हणतो :- " मी कोण आहे?"
शास्त्री बुवा म्हणतात:- "हा काय प्रश्न झाला ? पुरुष आहे तु."
युवक म्हणतो: " हो मी पुरुष आहे माझं नाव गौतम, पण काही दिवसा पूर्वी पर्यंत मी एक स्त्री होतो."
शास्त्रीबुवांना घेरी येत नाही तेवढंच, ते म्हणतात: " काय रे ! डोकं-वोकं तर फिरले नाही ना तुझं?"
गौतम आपला वृतांत सांगतो.
एक सावकार होता, तरुणपणात त्याची बायको वारते.
वार्धक्यपणात त्याला एकांत खायला येतो. संतती नसल्याचे त्याला खंत वाटते.
घर सांभाळणारी एक वृद्ध स्त्री-गडी त्याला दत्तक पुत्र घे असं सुचवते.
सावकाराला पटतं, पण त्याला पाहिजे तसा मुलगा मिळत नाही.
हरी नावाचा गुराखी त्याचा गडी होता.
त्याला ३ मुली होत्या. गरीबिनी मुक्ती व्हावी म्हणुन तो आपल्या लहान मुलीला मुलगा बनवून
सावकाराला दत्तक द्यायचे ठरवतो.
गौतमी त्याची कनिष्ठ कन्या, तिला तर आपल्या स्वामी आजोबाचं वेड.
कुठून-कुठून फुलं वेचून आणायची आणी त्यांची माळ करुन स्वामींना घालायची.
एकदा स्वामी खुश होऊन म्हणतात:-" बाळ काय करू तुझ्या साठी ?"
लहानगी गौतमी म्हणते: " काही नाही फक्त मी जेव्हा हाक मारीन तेव्हा या. "
तिचा उद्देश एवढाच होता की करमत नाही तेव्हा आपल्या लाडक्या आजोबांनी यावे आणी आपल्या बरोबर खेळावे.
स्वामी मान्य करतात.
इकडे हरी, गौतमीला मुला सारखे वागणे शिकवतो, तिला मुला सारखं पोशाख करवतो.
सावकारा कडे काम करणाऱ्या आजी बाईला मिळणाऱ्या पैश्यातून वाटा देईन अशी लालूच  देउन, बिंग न फुटावे याची हमी घेतो.
आजीबाई पण तयार होतात.
मग काय गौतमीला गौतम बनवुन सावकारा कडे पाठवले जाते.
गौतमी चुणचुणीत तर होतीच सावकारांनी विचारलेल्या प्रश्नांचे अचूक उत्तर देउन सावकाराचे मन जिंकते.
सावकार तिला मुलगा समझुन दत्तक घेतो.
आजीबाई डोळ्यात तेल घालुन सावधगिरी बाळगतात, म्हणुन गौतमी मुलगी आहे हे बिंग फुटत नाही.
काही वर्षांनी सावकाराला गौतमचे लग्न करुन सूनमुख पाहु असं वाटतं.
मग काय गौतमचे लग्न ठरवले जाते.
आता मात्र गौतमीला घाम फुटतो, तिची सर्व हुशारी घाटावर जाते.
मुलाची आई जेव्हा गौतमीचे पाय धुते तेव्हा पायांची कोमलता आणी चेहऱ्यावर स्त्रीसुलभ भाव पाहून
तिच्या मनात संशयाची पाल चुकचुकते.
त्या रोखून गौतमी कडे पाहतात. गौतमीचा धीर जातो.
होणाऱ्या सासुबाई पटकन ओळखतात की गौतमी पुरुष नाही.
त्या फर्रकन गौतमचे पागोटे ओढतात.गौतमीचे  लांब-सडक केस सुटतात.
आता तर गौतमीला गौतम बनवून फसवणूक करण्याचा आळ सावकारावर येतो.
गौतमीचे होणारे सासरे गावाचे कुलकर्णी होते. ते पटकन गौतामीला वनात नेऊन तिचा वध करा असा निकाल देतात.
मग काय गौतमीला वनात नेण्यात येतं.शिपाई वनात तिचा वध करणार त्या आधी देवाची आठवण कर म्हणुन वेळ देतात.
गौतमी कळ-कळुन स्वामींना हाक मारते:-"स्वामी आता शेवटचे तरी भेटा हो!."
गौतमीच्या लहानपणाच्या वचनांनी बांधलेले स्वामी लगेचच तिथे प्रगट होतात.
तिथे ते शिपायांना रागावतात:- " काय रे  या निर्दोष युवकाचा कशाला प्राण घेतात?"
शिपाई म्हणतात:" अहो स्वामी ती फार लबाड स्त्री आहे फक्त वेश पुरुषाचा आहे ."
स्वामी स्मित-हास्य करुन गौतमी कडे पाहतात. स्वामींच्या दृष्टीनी काया-पाळट होऊन गौतमी पूर्ण पणे एका युवकात बदलते"
स्वामी म्हणतात:" अरे मूर्खो वह् पुरुष है, स्त्री नही. "
शिपाई भीत-भीत गौतमीचं परीक्षण करतो तर सर्व लक्षणे पुरुषाची.
ते आता गौतमला घेऊन सावकारा कडे परत जातात, आपण दत्तक घेतलेली संतती पुरुषच आहे म्हणुन तो समाधान पावतो.
सासुरवाडीचे लोकंही संतुष्ट होऊन गौतमला आपली मुलगी देतात.
गौतमच्या मुखातून ही गोष्ट ऐकुन शास्त्रीबुवांच्या कपाळाला घाम फुटतो.
ते स्वामींना भेटायला पुढे जातात पण या वेळेला मनातल्या संकल्प-विकल्पाचे ओझे घेऊन.

(७८) सापाचे झाले सोने

मणब्याचा उद्धार पाहून स्वामींना भेटायला निघालेले शास्त्री एका जागेवर विसाव्या साठी थांबतात.
तिथे एका वृद्द्ध आणी गरीब माणसाला पाणी पाजायला एक श्रींमत माणूस घोड्यावरून
उतरून येतो. तो व्यक्ती त्या म्हाताऱ्या माणसाला पण स्वामी म्हणुन हाक मारतो.
शास्त्रीबुवानी विचारल्यावर तो माणूस आपला पूर्व वृतांत सांगतो.
तो बसप्पा असतो, जातींनी तेली पण प्रपंचात मन लागत नाही.
कोणतेही आजीविकेचे कार्य करायची त्याला इच्छाच होत नाही त्याल सुचते ते फक्त नामस्मरण आणी ईश्वराचे ध्यान.
त्यामुळे घरचे अगदी कंटाळले होते.
आणी कंटाळणार पण का नाही? घरात अन्न नाही, भूखेनी रडणारे मुलं-बाळं.
काहीही झाले तरी बसप्पाला ईश्वर उपासने शिवाय दुसरे कार्य करायचीच इच्छा होत नाही.
चित्त शांत व्हावे म्हणुन तो अनेक साधुंशी भेटला अनेकांना गुरु करू पहिले पण चित्ताला ओळख पटली नाही
या मुळे तो उद्विग्न राहायचा.
एकदा वनात त्याला काट्यांमध्ये झोपलेले स्वामी दिसतात.
काट्या मध्ये शांत पणे झोपणारा माणूस साधारण नसावा ,म्हणुन बसप्पा स्वामींशी संवाद करतो.
बसप्पाला पहिल्या  बरोबर स्वामी म्हणतात;-"काय रे तेल्या! घर संसार सोडुन मोक्ष पाहिझे?"
"अरे अशी जवाबदारी टाकून का पळत आहे?"
"घरच्यांना कोण पाहणार?"
स्वामी अंतर्यामी आहे हे कळल्यावर बसप्पा घट्ट स्वामींचे पाय धरतो.
स्वामी म्हणतात:-"योग्य वेळ आली की तुला बोलावु"
काही दिवसांनी रात्री स्वप्नात दृष्टांत देउन स्वामी बसप्पाला बोलावतात.
बसप्पा येतो पण स्वामी दुर जातात.बसप्पा पण मागे-मागे येतो, स्वामींच्या मागे जातांना काटे लागून बसप्पा रक्त-बंबाळ
होतो, तेव्हा स्वामी थांबतात.
स्वामी म्हणतात: 'हमारे साथ चलना इतना आसान नही है, जावो वापस जावो "
"आपल्या संसाराची काळजी घे."
बसप्पा म्हणतो:" प्रपंच आणी परमार्थ एका बरोबर जमत नाही, प्रपंचात ईश्वराचा विसर होतो"
स्वामी म्हणतात:" अरे रामदास स्वामी म्हणुन गेले आहे- "प्रपंच करावा नेटका .........."
"देव प्राप्तीसाठी पळण्याची गरज नाही लायकी झाल्यावर देव स्वत: भेटायला येईल"
" पुंडलिका कडे पांडुरंग आला, एकनाथ कडे पाणी भरले "
स्वामी पुढे जातात. बसप्पा तसाच लंगडत येतो. या वेळेला स्वामी जिथे थांबतात तिथे चारी कडे सापच-साप होते.
स्वामी म्हणतात :- "आमची एवढी सेवा केली त्या बद्दल तुला काही देऊ."
"पण आमच्या कडे काय आहे ? जा हे साप घेऊन जा . वाट्टेल तेवढे साप घेऊन जा."
बसप्पा थरथरतो.
स्वामी एक साप उचलून देतात,बसप्पा जवळ असलेल्या कपड्याची झोळी पसरवतो आणी त्यात साप बांधून घरी जातो.
रस्त्यात साप सोडुन द्यावा असा विचार येतो पण स्वामींनी दिलेला साप कसा सोडु , असा विचार करुन मुकाट्यानी चालत जातो.
घरी गेल्यावर बायको आशेनी गाठोडीत काय आहे म्हणुन विचारते.
तिला काही म्हणणार त्याआधी बायको गाठोडी हिसकवुन घेते.
उघडते तर काय, त्यात चक्क सोन्याचा साप.
बसाप्पाच्या बायकोनी कधी गुंजभर सोनं पाहिलेले नव्हते, आणी आता तर भला मोठ्ठा सोन्याचा साप.
बसप्पा एका काळी पोरा-बाळांना पोटभर अन्न सुद्धादेऊ शकत नव्हता तो आता गावाचा श्रीमंत माणूस बनतो.
त्या दिवशी पासुन बसप्पा प्रत्येक अडलेल्या-नाडलेल्या व्यक्ती मध्ये स्वामी पाहून त्यांना स्वामी म्हणुन हाक मारायचा.आणी यथासांग मदत करायचा.
बसाप्पाचा असा वृतांत ऐकुन नारायण शास्त्री आणखीच गोन्धलतात आणी नव्या जोमानी अक्कलकोट कडे चालायला लागतात.

(७७) गोष्ट मणब्याची

राम नवमी होती. रामजन्मासाठी गावातले प्रकांड विद्वान नारायण शास्त्रींना बोलावण्यात येतं.
रामजन्माच्या वेळेला केशव सपत्नीक येतो. केशवला पहून शास्त्री बुवाच्या तळपायाची आग मस्तकात जाते.
शास्त्रीबुवा केशवच्या कमरेत लात घालुन पाडून देतात. ते
गड्याच्या हाती केशवला हकलून देतात.
केशवचे सर्व पुत्र जन्मापासून मतिमंद होते, म्हणुन शास्त्री बुवा त्याला पापी समझुन तिरस्कार करायचे.
पण केशव अनन्य स्वामीभक्त होता, कितीही वाईट झालं तरी त्याची स्वामी वर श्रद्धा अढळ होती.
त्यांच्या मते गावात अशे पापी माणसे राहिले तर गावावर गंडांतर येतं.
दुसऱ्या दिवशी शास्त्रीबुवा पंचायत बोलावून केशवला परिवारा सकट गावा बाहेर काढायला लावतात.
सगळ्या गावात शास्त्रीबुवांचा दरारा होता, म्हणुन पंच त्यांच्या इच्छेप्रमाणे निकाल देतात.
गाव सोडुन, आपल्या मतीमंद मुलांना कुठे जाऊ या चिंतेनी केशव परिवारा सकट विषपान करतो.
संध्याकाळी केशव गाव सोडुन गेला की नाही, हे पाह्यला शास्त्री बुवा गावकऱ्या बरोबर येतात.
पाहतात तर पूर्ण परिवार विषप्राशन करुन पडला होता,फक्त मणब्याची नाडी चालत होती.
शास्त्री बुवा मणब्याला वनात सोडायला सांगतात.
गावकरी मणब्याला वनात सोडायला जातात. वनात त्यांना भारदस्त चाहूळ लागते, कोणी तरी हिंस श्वापद
असावं, असं समझुन गावकरी मणब्याला तिथेच सोडुन परततात.
दुसऱ्या दिवशी शास्त्रीबुवा आणी गावकरी मणब्या बद्दल गोष्ठी करत असतात..
शास्त्रीबुवा म्हणतात: "अर्ध्या रस्त्यात मणब्याला सोडले तरी काही काळजी करू नका,
आधीच पोटात विष आहे आणी तुम्ही लोकांच्या
मागे जे श्वापद लागले होते त्यांनीच त्याला खाऊन टाकले असावे.
" नाही... नाही ...., शास्त्रीबुवा तुमच्या दोन्ही गोष्ठी चूक आहे, मी जिवंत आहे."

शास्त्रीबुवा पाहतात तर काय? हे वाक्य मणब्याच्या तोंडाततुन पडले होते.
मणब्या जो आधी बे..बे असा आवाज काढून इशाऱ्यानी बोलायचा तो असं अस्खळीत बोलत होता.
शास्त्री बुवा म्हणतात: "तु जिवंत कसा आणी तु बोलायला कसा लागला?"
मणब्या फाड-फाड बोलून सांगतो की वनात एक साधू आले आणी त्यांच्या कृपेनी मी बोलायला लागलो आणी
माझा मतीमंद पण पण गेला.
गावकरी म्हणतात की असं भेटलं तरी कोण तुला ?
मणब्या ओल्या मातीवर काडीनी रेखा चित्र काढून दाखवतो.
गावकरी पटकन ओळखतात: " हे तर अक्कलकोटचे स्वामी समर्थ"
शास्त्रीबुवा दातओठ चावुन राहतात. आता कोणच्याही कारणांनी मणब्याला गावा बाहेर काढता येणार नव्हते.
सर्व लोकं स्वामींचा जय-जयकर करतात.
शास्त्रीबुवा पुन्हा मणब्याला विचारतात " स्वामींनी मग तुझ्या आई-वडिलांना आणी भावांना का नाही वाचवले?"
मणब्या एका विद्वानासारखे उत्तर देतो-" संत निसर्ग नियमात सहसा बदल करत नाही, अगदी विशिष्ट परिस्थिती ला वगळून"
"माझे आई-वडील आणी भाऊ आपल्या गतीला प्राप्त झाले, त्यांच्या साठी हेच उत्तम होते."
"जीवन जगणे हे महत्वाचे नाही जन्म-मरणाच्या चक्रातून सुटणे हे महत्वाचे आहे."
मणब्याच्या काय पालट मुळे शास्त्री बुवांचे डोके एकदम फिरते.
ते मुकाट्यानी असा स्वामी समर्थ आहे तरी कोण हे पहायला अक्कलकोट साठी प्रस्थान करतात.