Sunday, September 4, 2011

(७९) गौतमीचा गौतम झाला

बसप्पा आणी मणब्याचा वृतांत ऐकल्यानंतर शास्त्री बुवा पुढे निघतात.
स्वामी कोणी तरी मांत्रिक असावा असं त्यांना वाटतं. रस्त्यात त्यांना एक व्यक्ती भेटतो, शास्त्रीबुवा थोड्याश्या
तिरस्कारानी त्याला म्हणतात इथे स्वामी समर्थ कुठे भेटतील,फार भाकड गोष्टी ऐकल्या आहे त्यांच्या बद्दल.
तो युवक त्यांना स्वामी महिमा सांगतो तरीही शास्त्रीबुवा म्हणतात:- "अस केले तरी काय आहे, स्वामी समर्थांनी?"
युवक म्हणतो :- " मी कोण आहे?"
शास्त्री बुवा म्हणतात:- "हा काय प्रश्न झाला ? पुरुष आहे तु."
युवक म्हणतो: " हो मी पुरुष आहे माझं नाव गौतम, पण काही दिवसा पूर्वी पर्यंत मी एक स्त्री होतो."
शास्त्रीबुवांना घेरी येत नाही तेवढंच, ते म्हणतात: " काय रे ! डोकं-वोकं तर फिरले नाही ना तुझं?"
गौतम आपला वृतांत सांगतो.
एक सावकार होता, तरुणपणात त्याची बायको वारते.
वार्धक्यपणात त्याला एकांत खायला येतो. संतती नसल्याचे त्याला खंत वाटते.
घर सांभाळणारी एक वृद्ध स्त्री-गडी त्याला दत्तक पुत्र घे असं सुचवते.
सावकाराला पटतं, पण त्याला पाहिजे तसा मुलगा मिळत नाही.
हरी नावाचा गुराखी त्याचा गडी होता.
त्याला ३ मुली होत्या. गरीबिनी मुक्ती व्हावी म्हणुन तो आपल्या लहान मुलीला मुलगा बनवून
सावकाराला दत्तक द्यायचे ठरवतो.
गौतमी त्याची कनिष्ठ कन्या, तिला तर आपल्या स्वामी आजोबाचं वेड.
कुठून-कुठून फुलं वेचून आणायची आणी त्यांची माळ करुन स्वामींना घालायची.
एकदा स्वामी खुश होऊन म्हणतात:-" बाळ काय करू तुझ्या साठी ?"
लहानगी गौतमी म्हणते: " काही नाही फक्त मी जेव्हा हाक मारीन तेव्हा या. "
तिचा उद्देश एवढाच होता की करमत नाही तेव्हा आपल्या लाडक्या आजोबांनी यावे आणी आपल्या बरोबर खेळावे.
स्वामी मान्य करतात.
इकडे हरी, गौतमीला मुला सारखे वागणे शिकवतो, तिला मुला सारखं पोशाख करवतो.
सावकारा कडे काम करणाऱ्या आजी बाईला मिळणाऱ्या पैश्यातून वाटा देईन अशी लालूच  देउन, बिंग न फुटावे याची हमी घेतो.
आजीबाई पण तयार होतात.
मग काय गौतमीला गौतम बनवुन सावकारा कडे पाठवले जाते.
गौतमी चुणचुणीत तर होतीच सावकारांनी विचारलेल्या प्रश्नांचे अचूक उत्तर देउन सावकाराचे मन जिंकते.
सावकार तिला मुलगा समझुन दत्तक घेतो.
आजीबाई डोळ्यात तेल घालुन सावधगिरी बाळगतात, म्हणुन गौतमी मुलगी आहे हे बिंग फुटत नाही.
काही वर्षांनी सावकाराला गौतमचे लग्न करुन सूनमुख पाहु असं वाटतं.
मग काय गौतमचे लग्न ठरवले जाते.
आता मात्र गौतमीला घाम फुटतो, तिची सर्व हुशारी घाटावर जाते.
मुलाची आई जेव्हा गौतमीचे पाय धुते तेव्हा पायांची कोमलता आणी चेहऱ्यावर स्त्रीसुलभ भाव पाहून
तिच्या मनात संशयाची पाल चुकचुकते.
त्या रोखून गौतमी कडे पाहतात. गौतमीचा धीर जातो.
होणाऱ्या सासुबाई पटकन ओळखतात की गौतमी पुरुष नाही.
त्या फर्रकन गौतमचे पागोटे ओढतात.गौतमीचे  लांब-सडक केस सुटतात.
आता तर गौतमीला गौतम बनवून फसवणूक करण्याचा आळ सावकारावर येतो.
गौतमीचे होणारे सासरे गावाचे कुलकर्णी होते. ते पटकन गौतामीला वनात नेऊन तिचा वध करा असा निकाल देतात.
मग काय गौतमीला वनात नेण्यात येतं.शिपाई वनात तिचा वध करणार त्या आधी देवाची आठवण कर म्हणुन वेळ देतात.
गौतमी कळ-कळुन स्वामींना हाक मारते:-"स्वामी आता शेवटचे तरी भेटा हो!."
गौतमीच्या लहानपणाच्या वचनांनी बांधलेले स्वामी लगेचच तिथे प्रगट होतात.
तिथे ते शिपायांना रागावतात:- " काय रे  या निर्दोष युवकाचा कशाला प्राण घेतात?"
शिपाई म्हणतात:" अहो स्वामी ती फार लबाड स्त्री आहे फक्त वेश पुरुषाचा आहे ."
स्वामी स्मित-हास्य करुन गौतमी कडे पाहतात. स्वामींच्या दृष्टीनी काया-पाळट होऊन गौतमी पूर्ण पणे एका युवकात बदलते"
स्वामी म्हणतात:" अरे मूर्खो वह् पुरुष है, स्त्री नही. "
शिपाई भीत-भीत गौतमीचं परीक्षण करतो तर सर्व लक्षणे पुरुषाची.
ते आता गौतमला घेऊन सावकारा कडे परत जातात, आपण दत्तक घेतलेली संतती पुरुषच आहे म्हणुन तो समाधान पावतो.
सासुरवाडीचे लोकंही संतुष्ट होऊन गौतमला आपली मुलगी देतात.
गौतमच्या मुखातून ही गोष्ट ऐकुन शास्त्रीबुवांच्या कपाळाला घाम फुटतो.
ते स्वामींना भेटायला पुढे जातात पण या वेळेला मनातल्या संकल्प-विकल्पाचे ओझे घेऊन.

No comments:

Post a Comment