Sunday, September 25, 2011

(८६) स्वामी प्रगट झाले

मार्तंड मंदिराचा पुजारी स्वामीच नृसिंह सरस्वती महाराज आहे अशे नारायण शास्त्रींना सांगतात.
श्री नृसिंहसरस्वती महाराज भक्तांकडून शेवटचा निरोप घेतात. भक्तांना फार दुख होतं.
त्यांचे सांत्वन करायला ते म्हणतात: " अरे दत्त परंपरा ही निर्गुण परंपरा आहे, वडाच्या पारंब्या जमिनीत जाऊन नवीन वृक्ष तैयार
होतो तशेच आम्ही विभिन रुपात अवतरत राहतो.
पुढे कलीयुगाचा अमल फार वाढणार आहे पण तो भक्तिमार्गाची कास धरणाऱ्या लोकांना नडणार नाही.
भक्तांना अभय द्यायला आणी अभक्तांना भक्तिमार्गाला लावायला आम्ही पुन्हा येऊ.
अस म्हणुन नृसिंह सरस्वती महाराज नावेनी नदीच्या दुसऱ्या तीरावर जाऊन कर्दळीवनात दृष्टीआड होतात.
३०० वर्षानंतर उद्धव नावाचा एक लाकुडतोड्या कर्दळी वनात लाकूड तोडायला जातो.
झाड कापता कापता त्याच्या हातातून कुऱ्हाड सुटून एका भल्या मोठ्या वारुळावर आढळते.
कुऱ्हाड घ्यायला तो वारूळा जवळ जातो तर तो पाहतो तरी काय- वारुळातून रक्त येत होते.
उद्धव जाम दचकतो. तितक्यात एक भव्य व्यक्ती वारुळाला भेदून बाहेर येते.तिच्या मांडीतून रक्त वाहत होते.
उद्धव गया-वया करुन चुकून झाले असे म्हणतो.
भव्य व्यक्ती उद्धवला अभय देते आणी म्हणते:-" उद्धव हे तुझ्या हातून घडणारच होते, तु काही खंत मानु नको."
"तुझ्या हातून जग-कल्याणाची मोहिमेचा श्रीगणेश झाला आहे."
ती व्यक्ती आणखी दुसरी कोणी नसून स्वामी समर्थ असते.
स्वामी कर्दळीवनातुन कलकत्याला कालिका मातेचे दर्शन करुन गंगा तटावरून हरिद्वार करत गोदावरी नदी,
हैदराबाद,मंगळवेढा,पंढरपूर होत सोलापूर ला येतात.
सोलापूरला काही दिवस चिंतोपंत टोळ कडे मुक्काम करुन स्वामी अक्कलकोटला येतात

No comments:

Post a Comment