Friday, October 29, 2010

(33) स्वामींनी दिला पुरावा

वैष्णव नावाचं एक गाव होतं. तिथे गोपाळ बुवा नावाचे
एक नावाजलेले प्रभोधनकार होते.
अख्या पंचक्रोशीत त्यांचं नाव होतं.
एकदा इंग्रज सरकार त्या गावावर जपती आणतात
.गावकऱ्यांना तो गाव इनाम  म्हणुन  मिळाला होता पण
त्यांच्या कडे काही पण पुरावा नव्हता.
गोपाळ बुवांना आपल्या नामांकित पणाचा फार गर्व होतं.
पण इंग्रज सरकार त्यांना लेशमात्र ही किम्मत देत नाही.
शेवटी सर्व स्वामींच्या शरणी जातात.
स्वामी सर्व अधिकाऱ्यांना पाण्याच्या ओढ्या जवळ बोलावतात.
स्वामी म्हणतात:-" पाणी के अंदर सबुत है ,धुंडो उसे?"
शिपाई शोध घेतात,तेव्हा त्यांना पाण्यात एक दगड सापडतो,त्याच्यावर
स्पष्ट लिहिलेलं असतं, कि हा गाव
सयाजीराव राजानी इनाम म्हणुन वामनराव जोशी यांना दिला होता.
गावावरची जप्ती टळते.
गोपाळ बुवांचा गर्व ही नाहीसा होतो.
सर्व गावकरी स्वामी चरणी नतमस्तक होतात.

Sunday, October 24, 2010

(32) लबाडीचं फळ

श्रीपादराव आणी अनुराधा एक निपुत्रिक जोडपं होतं.श्रीपादररावांना संतानाची फार लालसा होती.
पण भाग्यात संतती नाही म्हणून ते गप्प बसायचे.
त्यांची मातुश्री सुनेला सारखी मर्मान्तक टोमणे मारायची.
अनुराधेची मैत्रीण पुष्पाला पोटदुखीचा त्रास होता.
काहीही करता पोटदुखी जात नाही.
त्या करता ती स्वामींकडे येऊन आपली व्यथा सांगते.
स्वामी म्हणतात-" गंगा भागीरथी झाल्यावर व्याधी जाणार."
पुष्पेला  स्वामी वचनाचा फारसा काही बोध होत नाही.
अनुराधा तिला सांगते कि गंगा भागीरथी चा बोध वैधव्य आहे.
अनुराधेला मासिक धर्म बंद झाल्या मुळे आता संतान व्हायची शेवटची आशा ही संपली
असं म्हणुन घरचे घरा बाहेर काढतात.
अनुराधा पुष्पाकडे जाते.स्वामी वचनाप्रमाणे पुष्पाला वैधव्य आलेले असतं आणी तिची
पोट-दुखी सुद्धा कायमची बंद झालेली असते.
पुष्पा,अनुराधेला स्वामीकडे जायचं सुचवते.
आता स्वामीच मार्ग दाखवू शकतात,अस ठरवून अनुराधा अक्कलकोटला येते.
अक्कलकोटला अनुराधाचा भाऊ मन्नू गवळी राहायचा. तो वृत्तींनी अगदी अप्रामाणिक होता.
दुधात पाण्याची भेसळ करायचा,गरजवंत पाहून भाव दुप्पट करायचा.
एकदिवस तो दुधात वापरण्याचं पाण्याची भेसळ करुन दुप्पट किमतीत स्वामींच्या शिष्यांना दुध विकतो.
त्या पाण्या मुळे दुध नासतं. स्वामींच्या कानावर सर्व प्रकरण  येतं.
दुसऱ्या दिवशी मन्नू गवळ्याच्या गायीचा थनातून दुधा ऐवजी रक्त येतं.
हा सर्व स्वामींचा प्रकोप म्हणुन तो स्वामींना शरण येतो.
स्वामी त्याला समझ देतात, व प्रामाणिक पणे वागत जा असं सांगतात.
दुसऱ्या दिवशी अनुराधा स्वामींची भेट घेते.
स्वामी म्हणतात:-"तुला खोडकर मुलगा होईल!"
अनुराधा आनंदानी सासरी परतते .
अनुराधेला पहिल्या बरोबर नवरा आणी सासू परतायचं कारण विचारतात.
अनुराधा स्वामींच्या आशीर्वाद बद्दल सांगते.
तरीही घरचे तिला हकलतात.
तितक्यात अनुराधेला घेरी येते, त्यांनतर वमन ही होतं.
सासुबाई पटकन ओळखतात कि अनुराधेला दिवस गेले आहे.
त्यानंतर आई-मुलाच्या व्यवहारात कमालीचा बदल होतो.
ते तीचं कौतुक करतात. अनुराधा पण मागचं सर्व विसरून खुशाल राह्यच ठरवते.
तितक्यात स्वामी तिथे प्रगट होतात.
स्वामी आई-मुलाची चांगलीच हाजरी घेतात.
ते दोन्ही स्वामींची क्षमा मागतात.अनुराधेचा संसार सुखमय होतो.

Saturday, October 23, 2010

(31) गादी आणी पाषण एकसमान

पुराणिकबुवा नावाजलेले प्रबोधनकार होते. त्यांना आपल्या ज्ञानाचा फार अभिमान होता.
एकदा ते अक्कलकोटला येतात. आपलं ज्ञान अफाट आहे, अशी स्वामींना  प्रचीती यावी, असं त्यांची  इच्छा होती .
स्वामी स्वताहून, त्यांना आमच्या समोर कीर्तन करा असं निमंत्रण देतात.
पुराणिक बुवा कीर्तन सुरु करतात:-
"मानव जीवनात चार पुरूषार्थ असतात- 'धर्म अर्थ काम मोक्ष'
यात मोक्षाचं महत्व फार असतं. कारण मोक्षच आपल्याला जन्म-मरणाच्या फेऱ्यातून सोडवतो.
मोक्ष प्राप्त करायला संतान असावी लागते.
"निपुत्रीको गतीर्नास्ती " या शास्त्र वचना प्रमाणे निपुत्रीकाला गती मिळत नाही."

स्वामी एकदम संतापून भडकतात-"बंद कर तुझी वटवट!
"अरे अशे असत्य वचन सांगून तु लोकांची दिशाभूल करत आहे."
"अरे नारद,शुकाचार्य,भीष्माचार्य हे सर्व निपुत्रिक होते,यांना काय उत्तम गती मिळाली नाही?"
"अरे तुझ्या कीर्तनानी लोकं देव मार्गावर जायच्या ऐवजी पुत्र प्राप्तीलाच आपलं ध्येय समाझेल."
"अरे ज्याचं वर्तनच वाईट आहे,पण अनेक पुत्र आहे,त्याला काय गती मिळणार?"
"अरे मोक्ष मिळतो तो अनन्य भावांनी ईश्वर भक्ती करणाऱ्यांना ,सदाचरण आचारणाऱ्यांना,
परोपकार करणाऱ्यांना."
"आमचीच चूक झाली जे आम्ही तुला इथे बोलावलं."
कीर्तन बंद पडतं. पुराणिक बुवा संतापतात.
दुसऱ्या दिवशी पुराणिक बुवा स्वामींना  जाब विचारायला येतात.
स्वामी निद्राग्रस्त असतात. स्वामींना मऊ-मऊ गादी वर झोपलेले पाहून पुराणिक बुवांना
प्रश्न पडतो, स्वामी सन्यासी असून गादी वर कशे काय झोपतात?
पुन्हा कधी तरी स्वामींना गाठू आणी त्याचं पाखंड उजागर करू अश्या बेतांनी पुराणिक बुवा परततात.
दुसऱ्या दिवशी पुराणिक पुन्हा येतात,तेव्हा स्वामी कुठे जायच्या तयारीत असतात.
पुराणिक  म्हणतात-"मला तुम्हाला काही विचारायचं आहे."
स्वामी म्हणतात:- "आम्हाला वेळ नाही. आम्ही शेजारच्या गावातल्या टेकरीवरच्या देऊळात जात आहे."
पुराणिक बुवा पण बरोबर येतात.त्या दिवसात फार थंडी पडली होती.
टेकडीच्या पायथ्याशी पोहचता-पोहचता रात्र होते.
पुराणिक बुवा फार दमतात, त्यावर हाडं गारठेल अशी थंडी त्यांना बेजार करुन टाकते.
ते स्वामींना गावात कुठेतरी मुक्काम करू असं सांगतात.
स्वामी म्हणतात -
"आम्ही कुठेच जाणार नाही वाटल्यास इथे विश्रांती  घेऊ."
पुराणिक एकटेच गावा कडे जायला पाहतात पण वन्य श्वापदांच्या  भयानी ते जाऊ शकत नाही.
ते स्वामी कडे परत येतात.
स्वामी एका खडकावर निर्विकारपणे विश्रांती घेतात.
स्वामी म्हणतात:- "पुराणिक किती वेळ असं उभ राहणार , त्या दुसऱ्या खडकावर जाऊन विश्रांती घे."
पुराणिक त्या खडकाला स्पर्श करुन पाहतात, तो खडक थंडी मुळे बर्फाच्या शिळे
सारखा जाणवतो.
पुराणिक बुवा मनात विचार करतात:-" मला अंगभर कपडे घालुन पण थंडी झोंबून
राह्यली आहे आणी स्वामी एका लंगोटी वर बर्फा सारख्या शिळे वर विश्रांती घेत आहे.
पुराणिक बुवा म्हणतात :- "अहो एवढ्या थंड शिळे वर तुम्ही अशे निर्विघ्न  कशे झोपू शकतात?"
स्वामी म्हणतात:-" अरे आम्ही संन्याशी! आम्हाला खडका वरंच झोपलं पाहिजे, मऊ-मऊ गादी वर कशाला झोपायचं?
पुराणिक बुवांना स्वामी अंतरज्ञानी असल्याची प्रचीती येते.
ते स्वामींच्या शरणी येतात.
"स्वामी तुम्ही असामान्य आहा. तुम्ही देवाचे अवतार आहा .मीच तुम्हाला ओळखण्यात चूक केली.
मला क्षमा करा."
स्वामी प्रेमळ शब्दात म्हणतात:-" आम्हाला ओळखण्यात खूब उशीर  केला  पुराणिक ..!"
"अरे आम्हाला माहित आहे, तु विद्वान आहे, पण नुसती विद्वत्ता उपयोगी येत नाही."
"त्याबरोबर श्रद्धा आणी विश्वास पण पाहिजे."
"ज्याच्या ठायी हे असतात त्याचं हृदय निर्मल होतं."
"आणी अश्या निर्मल हृदयातच ईश्वर विसाव्यासाठी येतो."
पुराणिकबुवा प्रांजळ पणे स्वीकृती देतात.

Thursday, October 21, 2010

(30) स्वामींचा नरसिंह अवतार

कुलकर्णी नावाच्या एका गृहस्थाला सावकाराचे फार कर्ज झाले होते.शेतातलं सर्व धान्य देउन सुद्धा जेम-तेम
कर्जाचं व्याज निघत होतं.कुलकर्ण्यांची आरती नावाची मुलगी स्वामींची निस्सीम
भक्त होती.एकदा देऊळात जातांना कुलकरण्यांना काटा रुततो, तितक्यात सावकार तिथे
येऊन, त्यांना नाही-नाही ते बोलतो, त्यांना देव-मार्गाहून परावृत्त करतो.
जाता-जाता सावकाराला धनाची  पिशवी सापडते.
कुलकर्णी मनात म्हणतात-"देवा ! हा काय तुझा न्याय आहे? तुझी नियमांनी भक्ती करणाऱ्यांच्या पायात तु काटा
रुतवतो, आणी सावकारासारख्या उन्मत्त लोकांना धन देतो !"
व्याज न मिळाल्या मुळे सावकार ,कुलकर्ण्यांच्या घरी येऊन सर्व धान्यांचे पोते उचलवतो.
तेव्हा आरती व त्याचा विवाद होतो.
कुलकर्णी आरतीच्या वतीनी क्षमा मागतो.
कामांध सावकार आरती ला आपल्या घरी एक दिवसा साठी पाठवायच्या अटीवर
पूर्ण कर्जमाफीचं लालूच देतो.
आरती संतापून म्हणते-"स्वामींच्या भक्तांना छळणाऱ्यांना स्वामी कधीच क्षमा करणार नाही."
सावकार, 'उद्याच तुझ्या घरा-दारावर जब्ती आणतो' अशी धमकी देउन जातो.
व्याज फेडायला आरती आपल्या लग्ना साठी जमवलेलं धन जमीनीतुन उरकुन काढते,
तितक्यात सावकारालचा पाठवलेला गुंड 'परश्या ' येऊन धन हिसकवुन घेतो.
आणी आरतीला उचलून सावकाराकडे न्यायला लागतो.तितक्यात स्वामी येतात.
स्वामी म्हणतात:-" परश्या........! ठेव तिला खाली..!"
परश्या नकार देतो.
स्वामी त्याला रोखून बघतात, स्वामींच्या तीक्ष्ण दृष्टी मुळे परश्या आरतीला खाली ठेवतो.
स्वामी म्हणतात:-"परश्या ! एवढे पापं तु फेडशील कुठे?"
"अरे यांचे फळ भोगावेच लागेल!"
अज्ञ परश्या म्हणतो:- "का? काय होणार मला? मला काहीही होणार नाही."
स्वामी म्हणतात-"असं! मग चल आमच्या बरोबर. आम्ही दाखवतो काय होणार ते!"
स्वामी परश्या ला घेऊन अंतर्ध्यान होतात.
स्वामी आणी परश्या एका जागेवर येऊन पोचतात.
तिथे एक हाथ-पायांनी लाचार माणूस जमिनीवर पडलेला असतो, त्याला नीट बोलता सुद्धा
येत नसतं.
लोकं जनावरांना अन्न देतात पण त्याला देत नाही, शेवटी जनावरांनी सांडलेलं अन्न तो वेचून खातो.
स्वामी म्हणतात-'ओळख याला! हा कोण आहे?"
परश्या म्हणतो- "अरे बाप रे ! हा तर मीच आहे."
स्वामी म्हणतात-"अरे अशे गोर-गरिबांवर अत्याचार करणार तर असाच जानवराहुन वाईट जन्म येईल.
परश्या- " माझ चुकलं, पण आता मी काय करू?" "स्वामी मला या अवस्थेपासून वाचवा...!"
स्वामी म्हणतात:-" अरे पापं करणं फार सोपं असतं पण निस्तरणं तेवढंच कठिण."
"अजून ही काही हाता बाहेर गेलेलं नाही आहे."
"उरलेलं आयुष्य ईश्वराच्या  नामस्मरणात घाल,आणी आपले पापं नष्ट कर."
"अरे देवाच्या नामात फार मोठ्ठी ताकद असते."
"वाल्याचा वाल्मीकी झालं आहे,हे विसरू नको, मात्र प्रयत्न तेवढेच सचोटीचे असायला हवे."

" आणखी नवीन पापं करू नको, सत्कर्म कर, अडलेल्या-नडलेल्यांची मदत कर."
परश्या होकार देतो, आणी कुलकर्ण्यांचं धन परत करतो.
पाहिलं सत्कर्म म्हणुन सावकाराला समझ देतो, पण सावकार काही दुमानत नाही.
सावकार  कुलकर्ण्यांच्या घरावर जब्ती आणतो, सर्व कुलकर्णी घरा बाहेर हकलले जातात.
सावकार आरतीला हिणवतो_"कुठे आहे तुझा स्वामी? आता का नाही आला ?"
 "भक्त संकटात असले तरी कुठे आहे?"
डोक्यावर इतक मोठं संकट असतांना सुद्धा आरती ठाम पणे म्हणते -"स्वामी चरा-चरात व्याप्त आहे,
ते नक्कीच आमच्या मदतीस धावून येईल."
सावकार थट्टा करतो-" स्वामी आत् घरात तर दडून नाही बसले ना? आत्ता जाऊन बघतो."
सावकार घरात प्रवेश करतो, तोआत गेल्या बरोबर दार आपोआप बंद होतं.
एक कडक आवाज ऐकू येते-" आम्हाला पाह्यला आला ना रे, सावकार!"
सावकार दचकतो, आवाजाच्या दिशेला जाऊन बघतो तर काय .
साक्षात  नरसिंह समोर उभे असतात, सिंह मुख, हाताचे तीक्ष्ण नखं, हृदयाला ठोके पडेल अश्या व्याघ्रं डरकाळ्या.
सावकाराची तर घाबरगुंडीच उडते.
तो  नरसिंहदेव म्हणुन पाया पडतो.
नरसिंह म्हणतात-" अरे आपल्या मुलीच्या वयाच्या मुलीवर आपली वाईट नजर टाकतो."
"गोर-गरिबांना छळतो त्यांच्यावर अत्याचार करतो, अरे अडलेल्या-नडलेल्यांची मदत करण तर दुर
त्याचं असलेलं-नसलेलं सुद्धा हिरावुन घेतो."
सावकार शरणागती पत्करतो.
नरसिंहांच्या जागी स्वामी दिसतात. सावकार स्वामींची क्षमा मागतो.
स्वामी आरतीला हाक मारतात- " आरती.......! आम्हाला हाक मारत होती ना ? बघ आम्ही तुझ्या घरी आलो आहे!"
सर्व कुलकर्णी घरात प्रवेश करतात.
स्वामी म्हणतात-" आरती , तुझ्या निस्सीम भक्तीमुळे आम्हाला यावं लागलं ,अरे डोक्यावर इतकं मोठ
संकट असतांनाहीतुझ्या अनन्य भक्तीत लेशमात्र ही अंतर  आलं नाही."
"आम्हाला तर येणं भागच होत."
"अरे जेव्हा-जेव्हा हिरण्यकश्यपु जन्म घेणार तेव्हा-तेव्हा आम्ही कोणाच्या न कोणच्या रुपात भक्ताच्या रक्षणा करता
प्रगट होणार."
सावकार कुलकरण्यांचं कर्ज माफ करुन क्षमा मागतो.
स्वामी म्हणतात-" कुलकरण्या तुझ्या मनात शंका होती ना ,कि देव अन्याय करणाऱ्यांना मदत करतो, आणी
सज्जनाला त्रास का देतो?
कुलकर्णी ओशालातात.
स्वामी म्हणतात-"अरे तुम्ही सर्व फक्त याच जन्माचा विचार करतात,
अरे मनुष्याला आपल्या मागच्या सर्व जन्मांचे कर्म भोगावे लागतात."
"भगवंत कधीही अन्यायी नसतो."
"कुलकर्णी गहिवरून होकार देतात."

Monday, October 18, 2010

(29) हाडं झाले सोन्याचे

 गोपाळ नावाचा एक भक्त स्वामींची कीर्ती ऐकून अक्कलकोटला
दर्शनास आला होता.
स्वामींच्या सहवासात तो इतका रंगला कि तो अक्कलकोटलाच राहु लागला.
चार वर्ष झाले तरी मुलगा येत नाही, म्हणुन त्याचे बाबा व
काका अक्कलकोट ला येतात.
ते पहिले चोळप्पांना चीरमीरी देउन, स्वामींनी गोपाळला आपल्या बरोबर पाठवावं,
असं करू पाहतात.
पण काहीही झाल्या ,गोपाळ परत यायला तयार नसतो.
मग त्याचे बाबा आणी काका त्याला स्वामी समोर समझवतात-
" अरे तु कुणाच्या नादी लागला आहे?"
"या बाबांच्या अंगावर, अंगभर कपडे सुद्धा नाही आहे! ते तुला काय देणार?"
"अरे तु व्यापारयाचा मुलगा आहे, इथे जे ४ वर्ष वाया घालवले ,
तेच व्यापाराला दिले असते तर
किती तरी धन कमवले असते."
स्वामी मंदस्मित  करत निमुटपणे सर्व एैकतात.
मग स्वामी म्हणतात-" अरे गोपाळा! मुलांनी आपल्या वडीलधारी मंडळीचं
एैकावं,त्यांची
आज्ञा पाळावी.
तु आपल्या बाबा आणी काका बरोबर आपल्या गावी जा.
गोपाळ पहिले तयार होत नाही पण स्वामी आज्ञा म्हणुन होकार देतो.
जातांना स्वामी त्याला दोन भले-मोठ्ठे हाडं देतात.
स्वामी म्हणतात-" अरे गोपाळा !
तुझे बाबा आणी काका बरोबर बोलतात, आमच्या कडे तुला द्यायला काहीही
नाही, हेचं हाडं आमची आठवण म्हणुन घेऊन जा."
गोपाळ त्या हाडांना हृदयाला लावून काळजीनी नेतो.
रस्ताभर त्याचे बाबा-आणी काका
स्वामींची थट्टा करतात.
गोपाळ निमुटपणे ऐकत राहतो.
घरी पोहचल्यावर बाबा म्हणतात- "अरे हाडं काय घरात ठेवणार ! "
"फेंक त्यांना घरा बाहेर!"
गोपाळ हाड ठेवलेली पिशवी हृदयाला लावतो.
त्याचे बाबा आणी काका बळ-जबरीनी पिशवी हिसकवतात.
त्यामुळे ती पिशवी खाली पडते आणी त्यातले हाडं बाहेर पडतात.
सर्वजण पाहतात तर काय हाडं सोन्याचे झाले होते.
गोपाळच्या, बाबा आणी काकांना स्वामींच्या अधिकाराची प्रचीती येते.
जन्मभर श्रम करुन सुद्धा इतकं सोनं जमवता आले नसते.
गोपाळ म्हणतो -"या सुवर्णात माझा काहीच रस नाही.
"हे सोनं तुम्ही ठेवा ! मी  स्वामी कडे परत जातो."
"स्वामी कडे २-४ दिवस चालणारं धन नाही मिळत,
पण जन्म-मरणाच्या फेऱ्यातून सोडवणारी मुक्ती मिळते."
"आपल्या जीवनाला गती मिळणे हाच मनुष्य जन्माचा परमोच्च हेतू आहे."

Sunday, October 17, 2010

(28) बैरामजीची गोष्ट

गोविंद, सदा आणी राघव, हे स्वामींचे अनन्य भक्त होते.
तिघेही जन सरकारी नौकर होते.
बैरामजी नावाचा एक तालुकेदार त्यांचा वरीष्ठ अधिकारी होता.
स्वामी दर्शनासाठी तो त्यांना कधीच सुट्टी देत नव्हता, उलट तो त्यांना स्वामी पासुन परावृत्त करण्याचा प्रयत्न
करायचा.
एकदा  स्वामी त्यांचा गावाला येतात, तिघेही मित्र बैरामजीला  न विचारता स्वामी दर्शनाला जातात.
बैरामजीची फार रागावतो आणी त्यांच्यावर अर्थदंड ठोकतो.
तिघेही मित्र स्पष्ट विरोध करतात.
बैरामजी नौकरी वरून काढण्याची धमकी देतो.तिन्ही मित्र नौकरी सोडून स्वामीसेवेत दिवस काढु असं सांगतात.
पण त्या तिघांसारखे मेहनती आणी ईमानदार कारकुन मिळणार नाही म्हणुन बैरामजी माघार घेतो.
शेवटी तिघेही मित्र बैरामजीला स्वामी दर्शनाला तैयार करतात.
स्वामी बैरामजीला रोखून पहातात, बैरामजी स्वामी चरणी पडतो.
मग स्वामी त्याचे कृष्ण-कृत्य उघडकीस आणतात- " तु गोर-गरीबांना लुटतो,तु व्यसनी आणी बाहेरख्याली आहे!"
"तु प्रपंच सुद्धा नीट करत नाही."
बैरामजी शरणागती पत्करतो.
मग बैरामजी प्रांजळ स्वरात म्हणतो-"तुमच्या मुळे माझ्या हातून आजपासून पापं
होणार नाही!"
स्वामी मग उपदेश करतात-"स्वतासाठी दुसऱ्यांना त्रास देऊ नको. "
"आपलं मत दुसऱ्यांवर लाडू नको."
"सद्वर्तन कर."
"निस्सीम भक्ती सदैव पावते."
" आपला देह  दुसऱ्यांची सेवेसाठी लाव. "
"निंदा द्वेष नको करू. "

(27) स्वामींचं छायाचित्र

घोलप बुवा समाज सुधारक होते. ते कनिष्ठ जातींच्या लोकांना मंदिरात प्रवेश मिळवून द्यायचे.
त्या मुळे सर्व गावकरी चिडतात व त्यांचा कट काढण्याचं विचार करतात.
 आपल्या  कंपनीत  निर्मित केमेऱ्यानी स्वामींचे छाया चित्र घ्यायच्या विचारांनी,
कोडक कंपनीचे संचालक जॉन आपल्या सहायका बरोबर अक्कलकोटला येतात.
चोळप्पा त्यांचा मनोगत स्वामींना सांगतात, पण स्वामी चक्क नकार देतात.
जॉन, चोळप्पांना चिरमिरी देउन मदत मागतात.
चोळप्पा पुन्हा स्वामींना निवेदन करतात पण स्वामी पुन्हा फेटाळून लावतात.
मग चोळप्पा, जॉन ला स्वामींच्या नकळत फोटो घेऊ असं सुचवतात.
तिकडे गावकरी रात्री घोलप बुवांच्या घराला आग लावून देतात, स्वामींना अंतरज्ञानांनी हे कळतं.
ते वरुणदेवाला निवेदन करतात. वरुणदेव पावसाळा नसतांना पाऊस पाडतात. घराला लागलेली आग विझते.
गावकऱ्यांना आश्चर्य होतं. दुसऱ्या दिवशी घोलप बुवा आपल्या घरात जळक्या वस्तूंचे अवशेष पाहतात,
तितक्यात एक सन्यासी त्यांना अक्कलकोटला जायची सूचना करतात.
इकडे जॉन लपून स्वामींचं चित्र घेतात.पण छायाचित्र डेवलप करतांना प्रिंट बिघडतं.
दुसऱ्यांदा तसाच प्रयत्न करण्यात येतो,पण प्रिंट पुन्हा बिघडतं.
शेवटी स्वामींच्या इच्छेशिवाय आपण छायाचित्र घेऊ शकत नाही, असं जाणुन जॉन परतायचं ठरवतात.
जातांना शेवटचं स्वामी दर्शन घ्यायला येतात.
स्वामी म्हणतात-" काय रे जॉन! मिळालं का आमचं छायाचित्र? "
"अरे आम्ही चैतन्य आहो! आम्हाला एका चोखटीत कशे कैद करणार?,तेही आमच्या इच्छे विरुद्ध!"
जॉन प्रांजळपणे अपराध कबुल करुन परतायला निघतो."
तितक्यात प्रेमळ स्वामी म्हणतात-" जॉन! परत जातो आहे! "आमचं छायाचित्र नाही घेणार? "
स्वामींची परवानगी मिळाल्यावर जॉन पुन्हा छायाचित्र घेतो आणी या वेळेला स्वामींचं सुरेखसं छायाचित्र येतं.
घोलपबुवा अक्कलकोटला येतात, तेव्हा स्वामींकडून त्यांना सर्व खुलासा होतो.
स्वामी म्हणतात-" अरे सर्वांना जन्म देणारा देव भेद करत नाही, तरी हे माणसं भेद का करतात?"
"रामाची उपासना करतात पण त्या रामानी शबरीचे बोरं खाल्ले होते, हे कशे विसरतात ?"
"अरे तु समाज सुधारणा करतो, माणसातला भेद दुर करतो; आम्ही  तुझं रक्षण कसं नाही करणार?"
"आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे."

Thursday, October 14, 2010

(26) गुरुभक्तीचा प्रसाद

सखाराम नावाचा एक व्यक्ती स्वामीभक्त होता.
लग्नाचे नुकते पाच महिने  झाले असता त्याचं निधन होतं.
त्याच्या निधना नंतर त्याची पत्नी राधा पण त्यांनी सांगितलेल्या प्रमाणे स्वामीभक्ती करायची.
ती नऊ महिन्याची गरोदर असतांना सुद्धा तिचे थोरले दीर आणी जाऊ तिला फार छळायचे.
ती दिवस भर काबाड-कष्ट करायची तरी तिला दोन वेळेचं अन्न ही महाग झालं होतं.
एक दिवस तिची जाऊ तिला विहिरीवरून पाणी आणून हौद भरायला सांगते.
राधेच्या तोंडात सकाळपासून अन्नाचा एक दाणा सुद्धा पडला नव्हता, तरी ती कशी-बशी पाणी आणायला जाते.
तिकडे दीर आणी जाऊ वेगळ्याच कारणांनी चिंतीत असतात.
कारण राधेला जर अपत्य झालं तर तो  पंचायतच्या निकालामुळे निम्म्या संपतीचा मालक होणार होता.
दीर-जाऊ निपुत्रिक होते, त्यांना धनंच आपलं आधार वाटत होतं.त्याचा अर्धा वाटा कुणाला देणं त्यांच्या जीवावर
आलं होतं.
विहिरीवर राधेला एक अनोळखी स्त्री भेटते, ती राधेला आपुलकीचे बोल बोलून आपली न्याहारी खायला देते,
व स्वता तीचं पाणी भरत असते.
योगायोगानी त्या स्त्री आणी राधेचं पातळ हुबे-हुब सारखं असतं.
राधा आडोश्यात जाऊन न्याहरी करते.
राधेचा कट काढू या बेतानी आलेली जाऊबाई राधेच्या भ्रमात त्या अनोळखी स्त्रीलाच विहिरीत ढकलते.
घरी जाऊन ती नवऱ्याला आनंदानी सर्व वृतांत सांगते.
आपली चिंता कायमची मिटली, असं मानुन ते निश्चिंत होतात.
तितक्यात विहिरीवरून आलेल्या  राधेला पाहून ते थबकतात.
त्यांना हे कळतच नाही कि राधा विहिरीतुन जिवंत कशी परत आली.
आणी विचारायाचे तर कशे, म्हणुन ते गप्प राहतात.
पहिला बेत फसला म्हणुन जाऊबाई दुधात विष घालुन राधेला प्यायला  देतात.
विषामुळे राधा मृत अर्भकाला  जन्म देते.
राधेचा दीर मृत अर्भकाला मुठ माती द्यायला स्मशानात आणतो.
तितक्यात स्वामी तिथे येतात, स्वामी राधेला आपली ओळख देतात.
राधा त्यांना आपलं दुख सांगते, स्वामी कृपेनी अर्भक जीवंत होतं.
तितक्यात एक श्वेत वस्त्र धारण केलेली, केस सोडलेली, भयंकर प्रतीत होणारी स्त्री तिथुन जातांना दिसते.
स्वामी म्हणतात-"बये! रिकाम्या हाती कशाला जाते आहे!आली आहे तर कुणाला तरी घेऊ जा!"
तितक्यात राधेच्या दिराला हृदय पीडा होऊन तो निधन पावतो.
जाऊ बाई स्वामींची करुणा भाकते.
स्वामी रागवतात:- " अरे! तु जीला  विहिरीत ढकललं होत ते आम्हीच होतो!"
" अरे एका छोट्या निष्पाप अर्भकाला मारण्य पर्यंत तुमची मजल गेली ?"
" तेही फक्त धनाची वाटणी न होऊ म्हणुन!"
"आता एकटी राहुन उपभोग कर धनाचा!".
मग राधेला म्हणतात:-" मुली आम्ही तुझं सौभाग्य वाचवू शकलो नाही पण तुझं मातृत्व तुला परत करत आहो!"
"जा नीट मोठं कर आपल्या पुत्राला."
"आयुष्य भर आम्ही तुझ्या पाठीशी राहुन तुझं रक्षण करू."


(25) वाल्याचे झाले वाल्मीकी

अक्कलकोटच्या जवळच्या गावी दोन भील्लांनी धुमाकुळ घातला होता.
ते वनात टपुन बसायचे आणी येणाऱ्या-जाणाऱ्यांना लुटायचे.
भल्या बोलांनी कोणी आपलं धन दिल तर ठीक नाहीतर त्यांना  ठार मारण्या
पर्यंत त्यांची मजल गेली होती.
त्या मुळे लोकांनी त्या वाटे वरून जायचंच  बंद केलं होतं.
'श्रीमंत  असेल तर स्वामी साठी धन नेणार  आणी
गरीब स्वामी कडून धन घेऊन जाणार',असं गृहीत धरुन त्यांनी अक्कलकोटलाच्या रस्तावर
स्वामी भक्तांना लुटायचं ठरवलं.
त्यांच्यावर नजर ठेवायला एक भील्ल वेश पालटून स्वामी कडे जातो.
तिथे एक श्रीमंत  व्यक्ती स्वामींना धनाची पिशवी  देतो.
स्वामी त्या पिशवीला एका गरीबीनी गांजलेल्या व्यक्तीला देतात.
तो वृद्ध व्यक्ती भील्लांच्या भितीनी स्वामींना रात्रभर मुक्काम करण्याची परवानगी मागतो.
स्वामी स्पष्टपणे नकार देतात.
मग त्याला आपल्या हातातली अंगठी देतात आणी म्हणतात-
"काहीही झालं तरी अंगठी बोटातून काढायची नाही!"
"आम्ही तुझ्या पाठीशी आहो!"
रस्त्यात भील्ल वृद्ध व्यक्तीला रस्त्यात गाठतात आणी त्याची पिशवी हिरवायाचा प्रयत्न करतात.
काहीही झालं तरी तो वृद्ध ती पिशवी द्यायला तयार नसतो.
तितक्यात स्वामींची कडक हाक कानावर पडते- "हे काय चाललं आहे?"
भील्ल पाहतात तर काय ते सर्व वनातुन थेट अक्कलकोटला स्वामींच्या वट-वृक्षा
समोर आहे.
स्वामी म्हणतात-"काय रे! वेश बदलून आला तर काय वाटलं आम्ही तुला ओळखू
शकत नाही?"
"तुम्ही जगापासून दुर जाऊ शकतात पण आमच्या पासुन दुर जाऊ शकत नाही."
"अरे लोकांचा घामा-कष्टांनी कमवलेला पैसा कशाला लुबाडतात?"
"अरे स्व-कष्टांनी  पैशे कमवा!"
"तुम्हाला काय वाटतं ,तो परमात्मा तुम्हाला काय असाच सोडून देईल?"
"अरे अश्या वाईट कर्मांचे फळ आज नाही तर उद्या भोगावेच लागेल."
"तुम्ही  जगातल्या न्यायव्यवस्थेला फसवू शकतात पण देवाच्या न्याया-पासुन कशे वाचणार?"
दोनी भील्ल स्वामींना शरण येतात, आणी आजपासून आम्ही स्वताला बदलण्याचा प्रयत्न
करू असं वचन देतात.
स्वामी म्हणतात-" आम्ही ज्याच्या पाठीशी असतो त्याचं कोणीही वाकडं करू शकत नाही!"

Tuesday, October 12, 2010

(24) श्रीमंतीची मोजमाप

जोशीबुवा  गडगंज श्रीमंत होते .
आपल्या श्रीमंतीचा त्यांना फार अभिमान होता.
तात्या वैद्य नावाचा गृहस्थ त्यांच्या घर-गडी म्हणुन राबत होता.
कारण त्यांनी जोशी बुवांकडून फार पैशे कर्ज म्हणुन घेतले होते.
जोशीबुवांच कर्ज फेडून त्याला दोन वेळेचं जेवण ही महाग झालं होतं.
तरी तो उदार वृत्तीचा होता. एकदा तात्याला आणी त्याच्या बायकोला खायला एकच
भाखरी होती, ती सुद्धा तो भूखेल्या कुत्र्याला देतो.
जोशीबुवा स्वामींना आपल्या घरी नेवैद्य ग्रहण करायला या, असं आमंत्रण करतात .
स्वामी त्याला म्हणतात- "पैशाची श्रीमंती आहे, पण मनाची नाही !"
"जा आधी मनाची श्रीमंती घेऊन ये"
जोशीबुवांना परतताना सुंदराबाई अडवतात आणी स्वामींना तुमच्या घरी आणीन असं आश्वासन देतात.
त्याच्या मोबदल्यात सुंदराबाईंना सोन्याच्या मोहरा मिळतात.
सुंदराबाई स्वामींना जोशीबुवा कडे चलायला विनवणी करते.
स्वामी सुंदराबाईची कृती जाणून असतात, तरीही ते होकार देतात.
तात्याल जेव्हा हे कळतं तेव्हा तो जोशी बुवांना आपल्यालाही स्वामींना घरी बोलवायची इच्छा आहे, असं सांगतो.
त्यासाठी तो काही पैशे मागतो.
जोशीबुवा जाम भडकतात:- "अरे स्वताच्या खायचे ठिकाणे नाही, आणी स्वामींना बोलावणार."
जोशी बुवांनी पैशे नाही दिले म्हणुन तात्या निराश होतो.
दुसऱ्या दिवशी स्वामी जोशीबुवा कडे येतात.
जोशी बुवा स्वामींना नेसायला अत्यंत महागडं पितांबर देतात, आणी यथासांग आदरातीथ्य करतात.
त्यांच्या मनात एक प्रश्न येतो कि स्वामी जातांना आपलं महागडं पितांबर तर नाहीना घेऊन जाणार.
तितक्यात स्वामी क्रोधित होतात, पितांबर काढुन जोश्यांच्या तोंडावर फेकतात.
आणी नेवैद्य ग्रहण न करता परततात.
जोशीबुवा क्षमा मागायला येतात.
स्वामी म्हणतात-" अरे ऐश्वर्यात लोळुन तुझं मन मलीन झालं आहे."
"अरे तुला काय वाटलं नेवैद्य ग्रहण करुन आम्ही तो पितांबर घेऊन जाणार?'"
"चल निघ इथून."
इकडे तात्या घरी येऊन पत्नीला सगळं प्रकरण सांगतो.
तिकडे एक व्यक्ती येऊन जोशी बुवांना तात्यांनी घेतलेली रकम देऊन
तात्याला कर्ज मुक्त करतो.
जोशीबुवांना तो आपण तात्याचा हितचिंतक आहे, असं सांगतो.
तात्या घरातल्या देवघरात असलेली एकमेव मूर्ती विकून मिळणाऱ्या
रकमेनी स्वामींचं आदरातिथ्य करण्याचं ठरवतो.
तो ती मुर्ती उचलतो.
त्याच्या बायकोच्या भावना उचंबळून येतात.
ती म्हणते-" देवघर रिकामं कसंतरीच  दिसतं आहे."
तात्या म्हणतो- "अरे स्वामी जीवंत देव असतांना, मुर्तीचा काय विचार करते."
"मी देवघरचं बाजूला उचलून ठेवतो."
खाली पाहतो तर काय ! तिथे त्याला स्वर्ण मोहरांची पिशवी सापडते.
तात्या म्हणतो- "हा स्वामींचा चमत्कार आहे, स्वामींचं आदरातीथ्य करुन शिल्लक
उरलेली रकम आपण स्वामींनाच अर्पण करू."
तितक्यात त्याला एक हाक ऐकू येते-" तात्या........."
तात्या बाहेर जाऊन पाहतो तर काय ! खुद्द स्वामी बाळप्पा बरोबर त्याच्या घरी न बोलवता आले आहे.
तो पत्नीसह स्वामीचरणी मस्तक ठेवतो.
तितक्यात एक माणूस येऊन तात्याला सांगतो को तुझ्या पूर्वजांची जमिनीचा
विवाद संपून ती जमीन आता तुला प्राप्त झाली आहे, आणी त्याशिवाय
कोणीतरी तुझ्यावर असलेलं जोशीबुवांच कर्ज ही फेडले आहे.
तात्या स्वामींचं यथासांग आदरातीत्थ्य करतो.
तात्या स्वामींना नेवैद्य ग्रहण करायला विनवतो.
स्वामी म्हणतात-" अरे हा सर्व सोहळा तुम्ही भक्तांसाठी  असतो."
"भगवंताला पाहिजे असते ती भक्ताची खरी हृदयापासून केलेली भक्ती."
"तुला जर आम्हाला काही द्यायचं असेल तर आम्हाला तांदळाच्या कण्या दे".
तात्याची पत्नी स्वामींना तांदळाच्या कण्याची खीर देते.
स्वामी आनंदानी खीर ग्रहण करतात.
स्वामी म्हणतात -"अरे युग कोणचेही असो भगवंताला सुदामाचेच पोहे आवडतात !"

Saturday, October 9, 2010

(23) लग्नाचे लाडु

जमुना नावाची एक देखणी तरुणी स्वामींची भक्त होती. ती उपवर झाल्यामुळे तिचे
आई-वडील तिच्या विवाहासाठी काळजीत होते.
जमुनेचे वडील तिच्या लग्नाबद्दलच्या मार्गदर्शनासाठी स्वामींशी भेटतात.
स्वामी म्हणतात:- "काळजी करू नको, आम्ही तिच्या साठी खंडू ला नेमलं आहे."
जमुनेचे वडील चिंता मुक्त होऊन घरी येतात.
जमुना आपल्या मैत्रिणी बरोबर येताना, रस्त्यात एक पालखी  आणी काही शिपाई पाहते.
तितक्यात एक वृद्धव्यक्ती येतो आणी त्या शिपायांना आपल्याला
पालखीत बसवून वैद्यांकडे सोडा , अशी विनंती करतो.
शिपाई सांगतात कि ही पालखी बडोद्याच्या राजा खंडेरावाची आहे, आम्ही तुम्हाला बसवु शकत नाही.
वृद्ध माणूस गया-वया करुन पालखीत शिरायचा प्रयत्न करतो तेव्हा ते शिपाई त्याला ढकलून देतात.
जमुना त्या वृद्ध व्यक्तीला पडण्या-पासुन सांभाळते आणी त्या शिपायांना जाब विचारते.
तितक्यात एक ब्राह्मण माणूस येतो आणी शिपायांना त्या वृद्ध माणसाला पालखीत बसवा
असं सांगतो.
जमुनेला तो आपल नाव मंगेश आणी आपण महाराजांच्या मर्जीचा सेवक आहे, असं सांगतो.
पालखीतून वृद्ध आजोबांना वैद्याकडे सोडण्यात येतं. रस्त्यात मंगेश आणी जमुनेची नेत्र-पल्लवी होते.
ते दोघे मनो -मन एकमेकाला हृदय देतात.
प्रत्यक्षात मंगेश सेवक नसून खुद्द राजा खंडेराव असतो आणी राष्ट विरोधी हेरांना अटक करायला
वेश पालटून फिरत असतो.
जमुना मंगेशचा विचार करत घरी परतते.
घरी तिला कळतं कि स्वामींनी तिच्या विवाहासाठी कोणी खंडू नावाचा व्यक्ती नेमला आहे.
स्वामी सर्वोपरी असं मानुन ती मंगेशला विसरायचं ठरवते.
तिच्या मनात एकच खंत असतो कि स्वामींनी आपल्या मनाविरुद्ध वराची निवड का केली.
इकडे वृद्ध आजोबा मंगेशला गाठतात आणी म्हणतात:- "मुलीच्या घरी जाऊन मागणी घाला खंडेराव !"
आपलं खरं नाव आजोबांना कसं माहित झालं , म्हणून खंडेराव दचकतो.
"आम्हाला सर्व माहित असतं!", अस म्हणून आजोबा तिथून निघतात.
खंडेराव जमुनेच्या घरी तिच्या साठी मागणी पाठवतो.
पण जमुना आपल्या मनात दुसरा कोणी आहे, असं सांगून नकार देते.
स्वामींनी आपल्या मनात असलेल्या वर गाठून का नाही दिला, या बद्दल खुलासा करायला
जमुना स्वामींकडे जाते.
तिथे तिला स्वामी भेटत नाही पण तेच वृद्ध आजोबा भेटतात.

ते जमुनेला सांगतात-" स्वामींवर विश्वास आहे ना? मग स्वामींनी सांगितलं तसं कर."
जमुना घरी परतते तर तिला तिचा मंगेश राजसी वस्त्रात आलेला दिसतो.
जमुनेचे वडील हेच खंडेराव महाराज म्हणून ओळख करुन देतात .
जमुना विचारते- "तुम्ही आपली ओळख का लपवली?"
खंडेराव सांगतात - "ती वेळेची मागणी होती, त्या वेळेला मी  हेरांना शोधायच्या कामगिरीवर होता."
"त्या शिवाय जर मी  खरी ओळख दिली असती तर तु अंतर ठेऊन वागली असती."
जमुना म्हणते-" मी  स्वामींवर अविश्वास केला, मी स्वामींची माफी मागायला जाते."
जमुनेचे वडील म्हणतात- "आपण सर्वच स्वामींकडे जाऊन त्यांचा आशीर्वाद घेऊ."
सर्व स्वामींकडे जातात.
स्वामी म्हणतात- " काय जमुने! झालं ना मनासारखं! आमच्यावर  अविश्वास दाखवला! "
"अरे परमेश्वरावर विश्वास पाहिजे कि परमेश्वर जे करतो ते चांगलच करतो."
"तुझी आणी खंडेरावाची भेट आम्हीच घडवली होती. ही सर्व आमचीच रचना होती."
"नीट पहा आम्हाला."
 स्वामींच्या जागी त्यांना तेच वृद्ध आजोबा दिसतात.
सर्व स्वामींच्या चरणी मस्तक नमवतात.
स्वामी भावी जोडप्याला आशीर्वाद देतात.




Friday, October 8, 2010

(22) स्वामींची साक्ष

गोपाळ त्रिवेदी आणी त्याची पत्नी लीला, हे एक हिंदी-भाषी जोडपं होतं.
दोघांची प्रभू श्रीरामावर अटल श्रद्धा होती.
चार-धाम यात्रेला जायच्या पूर्वी ते आपली सर्व पुंजी , गावाच्या एक प्रतिष्ठित व्यक्ती, राम जोशी कडे ठेवतात.
राम जोशी नामांकित आहे, शिवाय त्याचं नाव राम असल्यानी ते काही कागद पत्र न करता
आपली पुंजी त्याच्याकडे ठेवतात.
स्वामींना अंतरज्ञानांनी हे सर्व कळतं, ते आपल्या शिष्यांना म्हणतात -"प्रपंच असो किंवा परमार्थ
मनुष्यांनी सावध राहिलं पाहिजे, डोळे मिटून कुणावरही असा अंध-विश्वास ठेवता कामा नये."
चारधामाहुन परत आल्यावर ते राम जोशी कडे आपली पुंजी परत मागायला जातात, पण राम जोशी चक्क नाकारतो,
मी तुम्हा लोकांना ओळखतचं नाही असं सांगून हकलून देतो.
गोपाल पोलिसात तक्रार नोंदवतो.
न्यायालयात राम जोशी विरुद्ध खटला मांडला जातो. इकडे स्वामी चोळप्पाला कागद आणी दउत आणायला सांगतात.
मग स्वामी आपण म्हणतो त्याची नोंद करायला सांगतात.
स्वामी गोपाळनी ठेवलेली सर्व पुंजीचं वर्णन लिहवतात, व खाली "कोदंड पाणी" असं साक्षीदारच नाव लिहवतात.
चोळप्पा कोदंडपाणी कोण असं विचारतो, पण स्वामी प्रश्न फेटाळून लावतात.
इकडे गोपाळ कडे पुरावा नसल्यानी ,न्यायाधीश  कोणी साक्षीदार  आहे का,असं विचारतात.
गोपाळ निमुटपणे नाही म्हणतो, पण तितक्यात स्वामी-प्रेरणेनी लीलाच्या तोंडातून 'कोदंडपाणी' साक्षीदार आहे,
असं येतं.
तीच तिलाच आश्चर्य वाटतं.
न्यायालयात कोदंडपाणी नावाची हाक लागते.
लीलाच तर काळीज तोंडात येतं, नाव तर निघालं पण आता कोदंडपाणी येणार कुठून?
तितक्यात स्वामी तिथे वयस्क गृहस्थाच्या रुपात येतात, आणी मीच कोदंडपाणी म्हणून
न्यायाधीशाला आपली ओळख देतात.
चोळप्पानी लिहिलेली नोंद-वही न्यायालयात सदर होते, तशीच्या-तशी नोंद रामजोशी कडच्या
यात्रेकरूंच्या सामानाच्या नोंद-वहीत सापडतं.
गोपाळ खटला जिंकतो व त्याला पूर्ण पुंजी प्राप्त होते.
राम जोशीवर कारावास आणी अर्थ-दंड ठोठवला जातो.
गोपाळ कोदंडपाण्यांना विचारतो, आपण कोण आणी हे प्रकरण कसं काय झालं?
कोदंडपाणी म्हणतात- "अक्कलकोटला ये! तिथे तुला सर्व प्रश्नांचे उत्तर मिळेल."
अक्कलकोटला स्वामी गोपाळ ला आपणच कोदंडपाणी होतो, अशी प्रचीती देतात.
गोपाळ विचारतो- "पर हम तो आपको जानते भी नही और हमने तो आपकी कभी भक्ती भी नही करी,
फिर भी आप हमारी मदत के लिये कैसे आये?"
स्वामी म्हणतात- "अरे तुम्हं लोगो ने मेरा नाम नही लिया पर श्रीराम का नाम तो लिया !"
"हम श्री राम के ही अंश है."
"भगवान एक ही होता है,वह भक्तो कि सुविधा के लिये अलग-अलग रूपो मे अवतरित होता है."
गोपाळ आणि लीला स्वामी चरणी मस्तक ठेवतात.
टीप: कोदंडपाणी म्हणजे 'धनुष्य धारण करणारा'.
 प्रभू श्रीरामांच्या नावापुढे लागणाऱ्या अनेक विशेषणा मधले,
हे एक प्रमुख  विशेषण आहे.

Thursday, October 7, 2010

(21) गोष्ट नवरोजीची

बरजोरजी नावाचा एक पारशी गृहस्थ स्वामी भक्त होता.
तो अक्कलकोटचा मामलेदार पण होता.
स्वामी त्याला बोध देतात:- " लोकांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे! "
मग, तुझ्या कडे कोणी येणार आहे असं म्हणून त्याला घरी परतवतात.
बरजोरजी कडे, नवरोजी नावाचा त्याचा एक स्नेही येतो.
त्याला, 'बरजोरजी इतका स्वामींचा अनन्य भक्त का आहे?', असा प्रश्न पडतो.
बरजोरजी त्याला स्वामीलीलां बद्दल सांगतो तरी नवरोजीला पटत नाही.
वैतागून बरजोरजी त्याला म्हणतो-" अरे तु आपल्या मध्ये का अविश्वासाची भिंत बांधतो आहे?"
तितक्यात स्वामी तिथे प्रगट होतात आणी म्हणतात-"आम्ही ती भिंत पाडू ! "
सर्व दारं-खिडक्या बंद असतांना स्वामी आत कशे आले याचं नवरोजीला आश्चर्य होतं.
स्वामी म्हणतात:- "आम्ही चैतन्य आहो! आम्हाला दारं-खिडक्या अडवू शकत नाही, फक्त भक्तांचं हृदय कपाट उघडं
पाहिजे."
नवरोजीला स्वामींचं सामर्थ्य कळतं, तो पाया पडतो.
नवरोजी म्हणतो- "मला अफाट कर्ज झालं आहे, ते फिटेल का? "
स्वामी म्हणतात-" फिटेल! पण आम्हाला काय देईल ?"
नवरोजी एक-चथुर्थांश द्यायचं कबुल करतो.
स्वामी त्याला 'गुजरातला जा' असं सांगून गुप्त होतात.
एवढ्या मोठ्या गुजरात मध्ये कुठे जावे, हा नवारोजीला प्रश्न पडतो.
तितक्यात बडोदा-नरेश मल्हारराव गायकवाड, यांचा शिपाई येऊन नवारोजीला मल्हाररावां कडे घेऊन जातो.
मल्हारराव त्याला रु १५,००० देऊन एक कामगिरी सोपवतात कि स्वामींना बडोद्याला घेऊन यायचं.
त्यांना आणलं तर जहागिरी पण देऊ.
'प्रयत्न करीन पण यशा बद्दल सांगू शकत नाही', असं  नवरोजी उत्तर देतो.
मल्हारराव कबुल करतात.
त्या पैश्यांनी नवरोजी आपलं कर्ज फेडून शिल्लक रकम स्वामी चरणी ठेवतो व त्यांना मल्हारराव यांचा निरोप सांगतो.
स्वामी म्हणतात -"उचल ते पैशे! आम्हाला पैशाची नाही तुझ्या सारख्या भक्तांची गरज आहे."
"आम्ही अक्कलकोट सोडून कुठेही जाणार नाही."
नवरोजी म्हणतो आपण धन्य आहा , आपल्यामुळे मी  कर्जमुक्त झालो.

Tuesday, October 5, 2010

(20) स्वामी तारी त्यास कोण मारी

स्वामी भक्तांना विचारतात :-" आम्ही कोण आहे?"
चोळप्पा उत्तर देतात:-"आपण त्रिभुवन नायक आहा !"
स्वामी संतुष्ट होत नाही.
स्वामी म्हणतात:-"आज जर बाळप्पा असता तर त्यांनी अचूक उत्तर दिले असते."

स्वामींचा यशवंत नावाचा एक शिष्य मंगळवेढ्याला मामलेदार होता.
त्या वेळेला  मंगळवेढ्याला दुष्काळ पडला होता. लोकं अन्न-पाण्याला पारखे झाले होते.
लोकांचे हाल पाहून यशवंताच्या घशातून अन्न उतरत नव्ह्ते.

इकडे स्वामींकडे गाणगापूर मंदिराचा पुजारी, स्वामींची परीक्षा पहायला आला होता.
'स्वामी स्वताला दत्त अवतार असल्याची हवा पसरून लोकांना भ्रमित करतात', असं त्याचं मत होतं.
आल्या-आल्या, तडका-फडकीनी तो वट-वृक्षा खाली बसलेल्या स्वामींकडे येतो.

त्याला पाहिल्याबरोबर स्वामी म्हणतात:- "काय रे! गाणगापूर मंदिराचा तु पुजारी ना!"
"आम्ही कोण ही परीक्षा घ्यायला आला ना ?"
पुजारी चपापतो पण स्पष्टपणे कबुली देतो.
मग स्वामी विचारतात-" गाणगापूरला कोणाची भक्ती करतो?"
पुजारी उत्तर देतो-" श्रीनरसिंहसरस्वतीची!"
स्वामी म्हणतात-" आंम्ही नरसिंहभान आहो !"
"नीट बघ आम्हाला!"
पुजारी पाहतो  तर काय स्वामींच्या जागेवर साक्षात नरसिंहसरस्वती उभे आहे.
पुजाऱ्याला गहिवरून येतं.
काही क्षणांनी स्वामींच्या जागी श्रीपाद श्रीवल्लभ दिसतात.
पुजाऱ्याला पूर्ण प्रचीती येते कि स्वामी साक्षात दत्त अवतार आहे.
तो स्वामी-चरणी मस्तक ठेऊन क्षमा मागतो.
मग म्हणतो- "अक्कलकोट हेच गाणगापूर आणी गाणगापूर हेच अक्कलकोट आहे!"

इकडे मामलेदार यशवंत, सरकारी धान्य गोदामातलं धान्य गरजवंत लोकांमध्ये वाटून टाकतो.
सरकारी धान्य वाटल्या मुळे त्याला '१०,००० रु, दुसऱ्यादिवशी संध्याकाळ पर्यंत
सरकारी खजिन्यात जमा करा ', असा  खलीदा येतो.

यशवंत घर-दार,शेत व बायकोचे दागिने विकायला काढतो पण त्या सर्वांचे मात्र १००० रु मिळणार,असं सावकार सांगतो.
सावकार शिल्लक ९,००० रुपयाचे कर्ज द्यायला स्पष्ट नकार देतो.
पैशे न भरल्या मुले वरिष्ठ अधिकारी यशवंताला अटक करायला येतात.
त्याला बेड्या पडणारच होत्या तेव्हा स्वामी एका शेटाच्या रुपात येतात,  वरिष्ठ अधिकाऱ्यांना
१०,००० रु देऊन यशवन्ताची सुटका करतात.

अधिकारी लोकं गेल्यावर स्वामी यशवंताला आपलं खर रूप दाखवतात.
यशवंत नौकरीला राजीनामा देऊन , स्वामीसेवेतच आयुष्य काढण्याचं ठरवतो.
 

Saturday, October 2, 2010

(19) वामनाची देव दर्शनसाठी केलेली खटपट

वामन नावाचा एक भक्त देवदर्शनासाठी आतुर होता.कुणीतरी सांगितल्या प्रमाणे तो गुरुचरित्राचे १०८ पारायण करतो.उद्यापन झाल्यावर एक साधू भिक्षा मागायला येतात.
भिक्षा ग्रहण करून ते आशीर्वाद देऊन परततात, तेव्हा वामनाच्या लक्ष्यात येते कि पद-चिन्हा बरोबर भूमी वर अक्कलकोट अशे लिहिले गेले आहे.
त्याला लक्षात येते कि देवानी, श्री स्वामी समर्थ दर्शनासाठी स्पष्ट संकेत दिला आहे.
तो याला देव-संदेश समझुन अक्कलकोटला जायला निघतो.

तिथे स्वामी चोळप्पाला घेऊन नागणसूर गावाला निघतात.
वामन अक्कलकोटला येतो, तिथे त्याला एक माणूस कुष्टरोग्यांना भोजन करवतांना सापडतो, वामन त्याला स्वामीबद्दल विचारतो,तेव्हा तो माणूस स्वामी पुढच्या गावी गेले अशी सूचना देतो.
नाव विचारल्यावर तो अवधूत असं नाव सांगतो.
पुढच्या गावी वामनाला एक व्यक्ती स्वामीभजन करता-करता काही स्त्रियांना दळणात मदत करताना सापडतो.
दिगंबर नावाचा तो व्यक्ती स्वामी पुढच्या गावी गेले, अशी सूचना देतो.
वामन पुढच्या गावी पायपीठ करत जातो तिथे त्याला दत्तात्रय नावाचा एक व्यक्ती, एका वृद्ध माणसाला त्याच्या शेतात नांगर स्वत: चालवून मदत करतांना सापडतो.
दत्तात्रयला स्वामींचा बद्दल विचारल्यावर तो सांगतो कि ते काय स्वामी बाजूच्या शेतात आहे.
वामन धावत जावून स्वामी चरणी मस्तक ठेवतो.
स्वामी म्हणतात: "काय रे वामना! किती आटापिटा केला रे!"
वामन म्हणतो:" स्वामी तुम्ही आत्ता भेटला,किती दमछाट करवली हो!"
"मला दर्शन द्यायला इतका वेळ का लावला?"
स्वामी म्हणतात: "आम्ही तुला अनेकदा दर्शन दिले."
"अवधूत,दिगंबर आणि दत्तात्रय आम्हीच होतो."
स्वामीच्या ठिकाणी वरील तिन्ही व्यक्तींचे दर्शन वामनाला होतात.त्याला पटतं कि स्वामीनींच या तीन व्यक्तींच्या रुपात आपल्याला दर्शन दिले होते.
स्वामी म्हणतात: "आम्हाला भेटायला आटापिटा करायची गरज नाही!"
"प्रत्येक अडल्या-नडल्या,दिन-दुखी,गरजवंत व्यक्तीत आम्ही भेटू."
मग स्वामी वामनाला एक मंत्र देतात-
"शांताकारं भूजंग शयनं पद्मनाभं सुरेशं
विश्वाधारं गगन सदृशं मेघ वर्णं शुभांगं"
"हा विष्णूचा मंत्र आहे ,विष्णू जगनियंता आहे."
"लोकं लक्ष्मीची उपासना करतात,ती त्यांना फळते सुद्धा."
"अरे पण जर त्या नारायणाला आव्हान केले तर त्याच्या बरोबर लक्ष्मीपण येईलच ना!"
मग स्वामी वामनाला गुरुचरित्र देऊन, गाणगापुरास जाऊन सप्ताह करायला सांगतात

(18) स्वामींची युक्ती

स्वामीशिष्य नरसिंहस्वामी, स्वामींशी संबोधन करतात. धर्मप्रचार करतांना सामोरे जातांना येणाऱ्या अडचणी सांगतात.
स्वामी सांगतात-"हे कार्य करणे इतक सोपं नसतं,कधी फुलं तर कधी अंगारे प्राप्त होतात."
स्वामी, नरसिंह स्वामींना प्रेम आणि आपुलकीनी जनसामान्याला समझवत जा,असं सांगतात.
तिकडे,अप्पा आणि अण्णा नावाचे दोन भाऊ नरसिंहस्वामींच्या आगमनाची वाट पाहत असतात.
नरसिंहस्वामी आल्यावर त्यांची पाद्यपूजा,आरती करण्यात येते.
नरसिंहस्वामी दोन्ही भावांच्या वेदज्ञान, संतवांग्मय ज्ञान व इतर गोष्टी बद्दल कौतुक करतात.दोन्ही भावांवर समाज प्रबोधनाची
जवाबदारी दिलेली असते.
थोड्या वेळानी नरसिंहस्वामीला एका खोलीत घुंघरं आणि अत्तराच्या बाटल्या दिसतात,त्यांना लगेचच कळतं कि दोन्ही भावांनी पुन्हा लावणी कार्यक्रमाला
जाणे सुरु केले आहे.
नरसिंहस्वामी त्या बद्दल दोघा भावांची चांगलीच हाजिरी घेतात.
दोन्ही भाऊ सुद्धा पुन्हा लावणीच्या कार्यक्रमाला जाणार नाही असा शब्द देतात. नरसिंहस्वामी ताबडतोब तिथून निघतात.
संध्या काळी अप्पा आणि अण्णा चे मित्र येतात, त्यांच्या सांगण्या मूळे मनोनिग्रहाला तडा जातो.
दोन्ही भाऊ आज शेवटच्या वेळेला लावणी कार्यक्रमाल जाऊ,असं ठरवतात.

पण जशी जित्याची खोड मोडत नाही,तशी त्यांची लावण्या पाहायची सवय जात नाही.
नरसिंहस्वामीच्या उपायांना काहीही केल्या दाद मिळत नाही.
स्वामी,नरसिंहस्वामीना मानसिक संदेशांनी सुचवतात कि हे कार्य सोपे नाही,शिष्य चुकणारच,पण गुरुनी सतर्क राहून त्याचा सांभाळ करावा.

स्वामीकडे मीराबाई नावाची एक रूपस स्त्री भेटायला येते,तिला स्वामीनीच बोलावले असते.
ती आदरांनी स्वामींना नमस्कार करते,स्वामी तिला एक कामगिरी सोपवतात, मीराबाई त्यासाठी हामी भरते.
तिकडे अप्पा आणि अण्णांना सूचना मिळते कि गावात मीराबाई नावाची एक उत्तम पैकी लावणी कलावंत आली आहे.तिला भेटायला ते जातात,
तिथे पाहताच तर काय!
नरसिंहस्वामी तिथे आसनस्थ बसलेले दिसतात.
त्यांना आश्चर्य होत कि नरसिंहस्वामी इथे काय करत आहे.
नरसिंहस्वामी सांगतात कि मीराबाई त्यांची शिष्या आहे.
अप्पा-अण्णा बुचकाळ्यात पडतात आणि म्हणतात-कि मीराबाई सारखी नाचणारी-गाणारी बाई तुमची शिष्या कशी होऊ शकते?
नरसिंहस्वामी म्हणतात-" का जर खोटं बोलणारी, गुरुचा आदर न करणारी माणसे जर माझी शिष्य होऊ शकतात तर मीराबाई सारखी
कलावंत का शिष्या होऊ शकत नाही.
अप्पा-अण्णा ओशाळतात.
नंतर प्रामाणिक कबुली देतात कि ते तिला भेटायला आले होते.
नरसिंहस्वामी सांगतात कि मीराबाईची एक नियम आहे कि मी ज्याला अनुमती देतो तोच तिची कला पाहू शकतो.
तुम्हाला जर नृत्य पहायचं असेल तर लावणीच्या चाली वर रोज ज्ञानेश्वरी चा एक अध्याय वाचायचा. या प्रकारे ७ दिवसात ७ अध्याय वाचायचे.
इकडे बाळप्पा बरोबर चालतांना स्वामीच्या पायात ७ काटे रुततात, बाळप्पा खूप विनवणी करतात तरी स्वामी काटे काढू देत नाही.
स्वामी म्हणतात-: "गुरु चा मार्ग असाच असतो.निघेल ते काटे आपोआप !"
दोन्ही भाऊ पारायणाला बसतात,पण लावणीच्या चाली वर ज्ञानेश्वरी पाठ काही जमत नाही.तरी नरसिंह स्वामींची आज्ञा म्हणून प्रयत्न करतात.
पहिला अध्याय वाचल्या वर नरसिंह स्वामीं लावणी पाहायची आज्ञा देतात,पण जातांना त्यांना उत्साह वाटत नाही.
इकडे स्वामी समर्थ आपल्या पायातून पहिला काटा काढतात.
पाचव्या दिवशी अध्याय झाल्यावर त्यांना घरा बाहेरच जावं अस वाटत नाही. घरीच बसून नामस्मरण करावे असं वाटतं.
स्वामीच्या पायातला पाचवा काटा निघतो.
सातवा अध्याय झाल्यावर त्यांना लावणीच्या कार्यक्रमाला जायचा सुद्धा तिटकारा येतो.
तिकडे स्वामी सातवा काटा काढतात,व म्हणतात या दोघांचे जीवन आता निष्कंटक होवून अध्यात्माला समर्पित झाले आहे.
८ वा अध्याय वाचतांना नरसिंह स्वामी येतात,आणि विचारतात लावणीला का नाही गेले?
दोन्ही भाऊ उत्तर देतात कि त्यांना आता लावणीला जावे असं वाटत नाही.लावणीत आता रस वाटत नाही,आता कधीच जाणार नाही.
नरसिंह स्वामीं म्हणतात,याचं श्रेय स्वामींना जातं ,शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरली.
नरसिंह स्वामीं,अप्पा-अण्णा सोबत स्वामींच्या दर्शनाला येतात.
स्वामी विचारतात-"काय आता लावणीचा विसर पडला का?"
"अरे धर्मप्रचार करणारे शूर शिपाई तुम्ही,तुम्ही अश्या व्यसनात पडाल तर कसं चालेल?"

"कोणतीही सवयीचा जेव्हा अतिरेक होतो तेव्हा त्याचे रुपांतर व्यसनात होतं."
"व्यसन हे अध्यात्म प्रगतीच्या मार्गात मोठी बाधा आहे,तिच्यावर विजय मिळवायलाच हवा."

(17) क्रांतिकारी फडके यांची गोष्ट



||श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||
बाळप्पांना फार दिवसा पासून पोटदुखीचा त्रास होता. अधून-मधून त्यांना तीव्र वेदना व्हायच्या.
बाळप्पा पोटदुखी मुले विव्हळत असतात चोळप्पा त्यांची विचारपूस करतात आणि "स्वामींना सांगा",असा सल्ला देतात.
बाळप्पा म्हणतात,सद्गुरूला भक्ताला वेदना व्हायच्या आधीपासून ज्ञान असतं,म्हणून स्वताहून सांगायची काहीही गरज नाही.
तितक्यात स्वामी हाका मारतात-" अरे चोळ्या,बाळ्या,कुठे आहा?"
बाळप्पा कसं-बसं पोट धरून उठून येतात..
चोळ्या ! आजकाल आमच्या सेवेत तुझ लक्ष्य नसतं, आमची आंघोळीची तयारी झाली का? चंदन कुठे आहे ?
चोळप्पा ,"तयारी झाली आहे" असं म्हणून स्वामींना आंघोळीला नेतात.
बाळप्पांना उभं सुद्धा राहवत नाही पण कसं -बसं ते पोट धरून स्वामींना आंघोळ घालतात.
पोटाच्या वेदना तीव्र झाल्यानी ,तांब्या हातातून गळुन पडतो आणि बाळप्पा जमिनीवर कोसळतात.
स्वामी विचारतात-"काय रे बाळ्या काय झालं?"
बाळप्पा कसं-बसं उत्तर देतात कि नाभी जवळ पोटदुखीचा त्रास आहे.
"बघू !" असं म्हणून स्वामी स्वामी पोटाला स्पर्श करतात.त्यानंतर स्वामी पोटाला न्याहाळतात . त्याचबरोबर बालाप्पांच्या पोटातून एक पुरचुंडी बाहेर पडते.
स्वामी-"चोळ्या ! बघ रे काय आहे?"
चोलाप्पा पाहून सांगतात कि हे निळ्या रंगाचं विष आहे.
बाळप्पा कधी विषप्राशन नाही केल्याच सांगतात.
स्वामी म्हणतात-"तुझ्या वर ३ वर्षा पूर्वी विषप्रयोग झाला होता.तुझा मृत्यू अटल होता. आम्ही तो थांबवला कारण तुझ्या भाग्यात सद्गुरुसेवेचं पुण्य होतं.
या जन्मानंतर तुला मोक्ष मिळणार."
बाळप्पा प्रेमाश्रू गाळत म्हणतात-" मी संसार करणार नाही आणि स्वामी सेवेतच आपलं आयुष्य काढणार."
काही वेळा नंतर,चोळप्पा कडे जेवणाची तैय्यारी असताना स्वामी उठून वटवृक्षा कडे जातात,कारण त्यांना अन्तरज्ञानांनी कळतं कि वासुदेव
बळवंत फडके भेटायला येत आहे.
क्रांतिकारी फडके यांनी इंग्रजा विरुद्द्ध बंड उभारला होता,व आपल्या प्रयत्नांना स्वामींचा आशीर्वाद मिळावा म्हणून अक्कलकोटला येतात.
स्वामींना परिचय देऊन ते आपला मनोगत सांगतात.
स्वामी म्हणतात-"हम जानते है | नेक काम है |"
फडके आपली तलवार समोर ठेऊन स्वामींनी स्पर्श करावं अशी विनवणी करतात.
स्वामी चोळप्पाला तलवारीला समोर झाडावर ठेव अस सांगतात आणि म्हणतात-"अभी वक्त नही है !"
फडके आपण माघार घेऊ शकत नाही अस सांगून,प्रयत्नाची शिकस्त सुरु ठेवतात.
पुढे त्यांना अटक होऊन तुरुंगात आमरण उपोषण करतांना देवाज्ञा होते.तो सन १८८३ होता, आणि स्वातंत्र्य १९४७ मध्ये लाभतं.

बोध: सद्गुरू ईश्वरी कार्य योजनेला पुढे नेण्या करता असतात ते त्यात हस्तक्षेप आणून   ईश्वरी कार्य योजनेच्या विरुद्ध जात नाही.

(16) स्वामींचा एकलव्य



स्वामी विचारतात: चोळ्या! श्रेष्ट धनुर्धर कौन? एकलव्य कि अर्जुन?चोळप्पा म्हणतो-"इतिहास सांगतो,अर्जुन श्रेष्ठ धनुर्धर!"
स्वामी मग विचारतात -"सर्वश्रेष्ट शिष्य कोण ? अर्जुन कि एकलव्य?"
या प्रश्नाला चोळप्पा विचारात पडतात.

स्वामी मग समझवतात:"सर्वश्रेष्ट शिष्य एकलव्य! कारण त्यांनी गुरुची मानस पूजा केली त्यांच्या प्रेरणेनी विद्या ग्रहण केली आणि गुरुनी मागितल्यावर आपला उजव्या हाताचा अंगठा पण दक्षिणा म्हणून दिला."

आमचा पण एक एकलव्य आहे.आमची निष्ठेनी सेवा करतो,डोळ्यात प्राण आणून आमची वाट पाहतो.
स्वामींनी एकलव्य म्हणून ज्या व्यक्तीचं वर्णन केलं, तो आनंद असतो.

आनंद जातींनी कनिष्ट असून तो कुलकर्णी कुटुंबाचा घर-गडी म्हणून वावरत होता.कारण त्याच्या माता-पितानी कुलकर्ण्या कडून कर्ज घेतले होते,पण ते न फेडता ते देवाघरी जातात.
ते कर्ज फेडायला आनंद घर-गडी म्हणून राबत होता.तो अगदी मनापासून स्वामीभक्ती करायचा.
जातींनी कनिष्ट असल्यामुळे त्त्याला देवघरात प्रवेशास मज्जाव होता.देवघरात स्वामींचं एक तेलचित्र होतं, त्याचं दर्शन करावं असं त्याला सारखं वाटायचं.
पण काहीही करून कुलकर्णी त्याला देवघरात प्रवेश करू नाही द्यायचे.
या मुळे आनंद आपल्या खोलीत एका दगडाला स्वामींचे चरण मानून पूजायचा.
त्या दगडाला नमस्कार करून, फुलं चढवून तो समाधान मानत होता.

कुलकर्णी बुवांचा मुलगा विष्णू याला नोकरीत बढती मिळाल्या मुळे घरात स्वामी नामसंकीर्तनाचा जागर करण्यात येतो.
आनंद प्रार्थना करतो कि आज संकीर्तनाचा च्या दिवशी तरी स्वामींच्या चित्राचे दर्शन करू द्या.पण कुलकर्णी बुवा त्याचं म्हणणं फेटाळून लावतात.
स्वामी, विष्णू कुलकर्णीच्या स्वप्नात येवून सांगतात कि उद्या मी तुझ्या घरी येणार आहे.सर्व कुलकर्ण्यांनां आनंद होतो.
स्वामीच्या नाम संकीर्तनाचा जागर सुरु होतो. आनंद मात्र आपल्या खोलीत त्या दगडापुढे हाथ जोडून बसला राहतो.
नाम संकीर्तन झाल्या वर एक चमत्कार होतो, स्वामींच्या तेलचित्रात आनंद दिसायला लागतो.
कधी स्वामी दिसतात तर कधी आनंद.

सर्व लोकं चकित होतात.कुलकर्णी बुवा, विष्णूला "आनंदला बोलाव" असं सांगतात.
विष्णू,आनंदाच्या खोलीत येऊन, त्याला आहो-जाहो करून,त्याची विनवणी करून देवघरात नेतो.
आनंदला विचारण्यात येतं कि ह्या चमत्कारचं काय रहस्य आहे?

आनंद काही म्हणणार तितक्यात स्वामी तिथे प्रगट होतात आणि म्हणतात-"आम्ही सांगतो कसा झाला चमत्कार."
आनंद स्वामीच्या पाया पडतो.
स्वामी मग कुलकर्णी बुवांची हाजिरी घेतात-"काय तुम्हाला काय वाटलं, आम्ही फक्त सोवळे-ओवळे पालणारे भक्तांनाचं दर्शन देतो?"
"परमेश्वराला सर्व भक्त सारखे.अरे ज्यांनी सृष्टी बनवली आहे तो काय त्यातील घटकातील भेद करेल?"
"अंतरंगात शुद्ध भक्तीभाव असला तेव्हांच देव वशात होतो.बाकी वरचेवर साधने आहे."
"काही लोकं त्याचाच अतिरेक करतात आणि पाखंडीपणानी वागतात."
"आम्हाला हे नामंजूर आहे."
"आमच्यावर निर्मल भक्ती करणाराच आम्हाला प्यारा आहे."
"जशे आम्हाला महत्व देतात तसाच आमच्या भक्तांना सुद्धा महत्व दिलं गेलं पाहिझे ."
"भक्तीभाव असेल तर तेलचित्र काय आणि दगड काय,आमचे दर्शन होणार."

स्वामी आनंदाला म्हणतात-"आनंद ! अनेक शिष्य असले तरी एकलव्या सारखा तूच आहे.आम्हालाही तुला पाहयचं होतं."
कुलकर्णी बुवा म्हणतात:"स्वामी मी चुकलो!"
स्वामी: "हो तुम्ही चुकला."
"अरे पण त्यामुळे या आनंदाला किती त्रास झाला .माफी मग त्याची आता!"
कुलकर्णी बुवा माफी मागतात.
आनंद त्यांना माफी मागू नका,"मी तुमचं मीठ खाल्लं आहे",असं सांगतो.

स्वामी प्रसन्न मुद्रेनी आशीर्वाद देतात:"भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे !"

(15) आवाळू पासून सुटका


भीमराव नावाचा एक गृहस्थाच्या डोक्यावर एक आवाळू ( मोठ्ठा फोड ) झाला होता. त्यामुळे गावातले सर्व लोक त्याचा तिरस्कार करायचे,त्याचा अपमान करायचे.लहान मुले तर त्याला दगडं मारून ह्कलायचे.
ह्या सर्व प्रकाराला कंटाळून भीमरावाची बायको सुद्धा त्याला सोडून जाते,पण त्याचा छोटा मुलगा मात्र त्याचा बरोबर राहतो.
पिता-पुत्र दोन्ही स्वामींच्या शरणी जायचं ठरवतात, तिथे स्वामींचे काही भक्त सुद्धा चेष्टा करतात पण चोळप्पा त्यांना दम भरून भीमरावाची भेट स्वामींशी घडवून देतो.
भीमराव स्वामींना आपलं सर्व घाराणं सांगतो.स्वामी त्याला आपल्या सेवेत राहा असं सांगतात.
एकदा स्वामींसाठी फुल तोडतांना, सुंदराबाई खोटी आपुलकी दाखवून पैशे उकळायचा प्रयत्न करते, पण भीमरावाकडे पैशे नसल्यानी,उलटे बोल बोलून जाते.
इकडे स्वामी कडे फुलं नेल्यावर स्वामी "दोन डोक्याचा माणूस !" असं म्हणून चेष्टा करतात.चोळप्पाला वगळून सर्व शिष्य हसतात.
रात्री खोलीमध्ये भीमराव रडतो. जगानी आपली चेष्टा केली ,पण आज स्वामींनी पण आपली चेष्टा केली,त्याचा मुलगा त्याची समझ घालतो कि स्वामी आजोबा नक्की कृपा करतील.
स्वामी रात्री भीमरावाच्या खोलीत प्रगट होतात.भीमराव पाया पडतो.
स्वामी म्हणतात:"रागावलास आमच्यावर?इतना भी नाही कर सकते?"
"गुरु मानतो ना? थोडीशी मसखरीच इतकं वाईट वाटलं ?"
"लोकं उपहास करतात कारण त्यांची ही प्रवृत्ती असते."
"दुखी व्हायचं नाही.सगळं ठीक होईल.आम्हाला गुरु मानतो आणी आवाळूला घाबरतो?"
"संकटांचा धेर्यानी सामना करायचा असतो."
असं म्हणून स्वामी भीमरावावर ध्यान केंद्रित करतात. आवाळू गळून पडतो.
भीमराव खड्कन जागा होतो. उठल्यावर त्याला कळतं कि हे सर्व स्वप्न होतं.
त्याचा मुलगा पण जागा होतो.
तो ओरडून म्हणतो -"बाबा तुम्ही बरे झाला! स्वामींनी जादू केली!."
भीमराव चाचपून पाहतो तेव्हा त्याला प्रचीती येते कि तो खरा-खुरा बरा झाला आहे.
भीमराव स्वामींच्या जवळ येऊन त्यांच्या चरणी मस्तक ठेवतो.स्वामी तुम्ही मला रोगमुक्त केलं.
स्वामी म्हणतात: "आता हसतो !थोडंस काय बोललो, तेव्हा............?
भीमराव प्रांजळपणे म्हणतो- "मी अज्ञ आहे."
स्वामी म्हणतात:"तू अज्ञ असला तरी तुझा मुलगा सुज्ञ आहे."
भीमरावा चा मुलगा म्हणतो-"स्वामी तुम्ही मोट्ठे जादुगार आहास."
भीमराव: "आपले चरण सदा हृदयात राहावे"; अशी विनंती करतो, स्वामी स्मित हास्य करून ते मान्य करतात.

(14) चोरांपासून सावध राहा


गोपाळशेट स्वामींचा शिष्य होता. तो वृत्तींनी अगदी कनवाळू होता.त्याच्याकडे एक दिवस एक व्यक्ती येवून खूब गया-वया करून नौकरी मागतो. तो आपलं नाव सदा आणि गावाचं नाव सातुर्डा सांगतो.
सह्रदय गोपाळशेटकाही तपास न करता, त्याला घर-गडी म्हणून ठेवतो.
बायको विरोध करते-"हा माणूस ठीक वाटत नाही!"
गोपाळशेट तिच्या म्हणण्यावर दुर्लक्ष्य करतो.
तिकडे स्वामींना भेटायला ब्रह्मचारी बुवा येतात.
ते स्वामीसुतांच्या मुंबई मठातून आलेले असतात.
आपल्या हातानी अन्न शिजवून स्वामींना अर्पण करायची इच्छा प्रकट करतात.
स्वामी अनुमती देतात पण बजावतात "चोरांपासून सावध राहा."
तिकडे गोपाळशेटची बायको सदा बद्दल तक्रार करते,
" त्याचं कामात लक्ष्य नाही!".
"तो एकही काम नीट करत नाही!"
"सदा ची नजर इकडे तिकडे फिरते"-असं सांगते.
गोपाळशेट १०० रु देवून सदा कडून वाण सामान मागवतात.त्याच्या मागे बाबू नावाचा आपला दुसरा गाडी पाठवतात.
सदा व्यवस्थितपणे सर्व सामान आणून देतो,बाबुही बरी खबर देतो.
"आपली सर्व चिंता स्वामी पाहतात' असं म्हणून गोपाळशेट सदाबद्दल निश्चित होतात.
तिकडे ब्रह्मचारी बुवा स्वयंपाकाची तैयारी करतात, आमटीत टाकायला गुळ नाही म्हणून लखूला बाजारात धाडण्यात येतं.
स्वामी अगदी केविळवाण्या शब्दात म्हणतात-" लखू गुळ खातोssss ! आम्हाला देत नाहीss!"
कुणालाही काही उलघडा होत नाही. शेवटी गुळ आणायला पाठवलेल्या लखूला पाहायला दुसरा भक्त जातो.
पाहिलं तर लखू खरच गुळ खात होता.
लखू स्वामींची माफी मागतो. ताजा गुळ पाहून खावासा वाटला म्हणून ही चूक झाली असं सांगतो.
स्वामी :"लखू भगवंताला सर्व माहित असतं. "
"काही पाहिझे तर मागावं पण चोरून खायचं नाही."
लखू मान्य करतो.
तिकडे गोपालशेटचा मित्र-सावकार उधार घेतलेले २००० रु परत करतो.सदा हे सर्व पाहत असतो.
थोड्यावेळानी गोपाळशेट पाहतात तर कपाटात ठेवलेले २००० रु तिथे नसतात.
सदाला आवाज दिल्यावरपण सदा येत नाही त्यावरून कळतं की हे सदाचेच काम आहे.
गोपाळशेट म्हणतात:-"पैशांची काळजी नाही, स्वामी कृपेनी गडगंज पैसा आहे,प्रश्न विश्वासघाताचा,मला सदाला जाब विचारायचा आहे."
गोपाळशेट स्वामींची प्रार्थना करून सदाला शोधण्यात यश मागतात.
तिकडे स्वामी म्हणता- "बैल गेला आणि झोपा गेला" आता स्वामी-स्वामी कशाला करतात.
बायको करवी कितीवेळा सावध केलं पण ऐकलं नाही.
मग म्हणतात; सदाला शोधायला हवं.
सदा पैशे घेऊन फार दूर निघून जातो. त्या पैशांनी आपण एक जमीन घेऊन भव्य घर बांधु,असा विचार करतो.

तळाटी त्याला इंद्रजीत नावाच्या व्यक्तीची जमीनी बद्दल सांगतो, वरून सांगतो कि त्या जमिनीत खजिना दडला आहे.

सदा ती जमीन घेण्याच मन बनवतो.

तिकडे गोपाळशेट एका शिपायाला घेऊन सदाच्या गावात येतो. तिथे त्याला कळतं कि त्या गावात सदा नावाचा कोणी माणूस नाही.

गोपाळशेट मनोमन स्वामींची प्रार्थना करतो-"स्वामी मदत करा!"

अक्कलकोटला स्वामी म्हणतात: "मदत हवी आहे! ठीक आहे ,प्रयत्न सुरु ठेव,तुझे प्रयत्न तुला आमच्या पर्यंत आणणार."

इकडे सदा त्या जमीनी पर्यत पोचतो.त्या जमीनीची राखणदार म्हातारी बाई त्याला तालुक्यातल्या गावात इंद्रजीत चा पत्ता सांगते.

गावात इंद्रजीत सासुरवाडी ला आहे, असं कळतं.

सदा इंद्रजीतचं सासुरवाड गाठतो. तिथे त्याला कळतं कि इंद्रजीत आपली बायको आणि नूतन पुत्राला घेऊन अक्कलकोटला स्वामी दर्शनाला गेला आहे. सदाला प्रश्न पडतो,पण जमीन म्हणझे आपल भवितव्य, असं म्हणून तो अक्कलकोटला जायचं ठरवतो.

स्वामींनी आपल्याला चोरी करतांना पाहीले नाही असा विचार करून तो अक्कलकोटला जातो.

इकडे गोपाळशेटला कळतं कि सदानी आपलं खर नाँव सांगितलं नसावं, आता सर्व प्रश्नांचे उत्तर स्वामी चरणीच मिळेल, असा विचार करून गोपाळशेट अक्कलकोटला जायचं ठरवतो.

गोपाळशेट अक्कलकोटला जावून स्वामींना सर्व वृतांत सांगतो.

स्वामी म्हणतात-" ठावूक आहे मला! हजार वेळा सावध केलं तरी तू गाफील राहिला."

“जा कोपऱ्यात जावून उभा राहा.”

गोपाळशेट आज्ञेचं पालन करतो.

थोड्यावेळानी सदा येऊन स्वामींना इंद्रजीत बद्दल विचारतो.

स्वामी म्हणतात: "काय रे आला? इंद्रजीत ला भेटून जमीन विकत घेणार?"

"त्याआधी एकाला भेट. बघ ओळखतो का?"

"गोपाळा ये!"

गोपाळशेट येतात.

स्वामी सदा ला म्हणतात- "काय रे बघ इंद्रजीत, ओळखतो का?"

"चांगुलपणा दाखवणाऱ्या माणसाच्या विश्वासाला तडा देतो?"

"दे त्याला त्याचे पैशे" सदा आज्ञेचं पालन करतो.
सदा: "स्वामी आपल्याला सगळं माहीत आहे माफ करा."

स्वामी म्हणतात-"चूक मार्गांनी कमवलेले पैशे तात्पुरते कामास येतात ,आयुष्याचा निर्वाह कष्टानी कमवलेल्या पैशानीच होतो."

"पैशे स्वकर्तुत्वानी कमवावे. बुद्धीचा चांगला उपयोग करा,दुसऱ्याला फसवू नका."

"सदा, शेवटची संधी आहे."

सदा म्हणतो-"स्वामी चुकलो मी. मी सुधारीन स्वताला, आपण माझ्यासारख्या चोरावर दया दाखवली."

स्वामी म्हणतात-"गोपाळा तू भला आहे पण वाहत जातो."

"चांगुलपणा करावा पण माणसाची पारख करता यावी."

"चांगुलपणा चाणाक्ष्यपणे करावा,आपल्या मदतीचा कोणी गैर फायदा घेऊ नये याची काळजी घ्यावी."

 

(13) गोष्ट दुसऱ्या विवाहाची

माधव आणि लक्ष्मी नावाचं एक जोडपं असतं.
त्यांचा एकदिवस पण स्वामींच्या नामस्मरणा वाचून जात नसतो.
एक दिवस लक्ष्मीचं निधन होतं.
माधवला फार दुखं होतं.स्वामिनी असं का होऊ दिलं, असं म्हणून तो विलाप करतो.
दोन महिन्या नंतर:-
लक्ष्मी गेल्यानंतर माधवचं कामात लक्ष्य राहत नाही ,धंदा बुडायला येतो,५००० रुपयाचं कर्ज होतं.
मित्र माधवला कामात लक्ष्य दे असं सांगतो,पण माधव ला काही सुचत नसल्याने तो त्याला स्वामी कडे जायचा सल्ला देतो.

अक्कलकोट ला जावून ,माधव स्वामी समोर विलाप करतो.
स्वामी:"काय रे !आज आमची आठवण कशी आली?"
माधव आपलं सर्व घाराणं सांगतो.
स्वामी त्याला आल्या पायांनी परत जा असं सांगतात.
स्वामी:"रिक्त हस्तानी पाठवत नाही, आमच्या आशीर्वादा बरोबर पाठवत आहे."
स्वामी: "सुमंगल सावधान!!!"
माधव त्यांच्या पायाशी आयुष्य काढायचं म्हणतो.
स्वामी माधव ला झिडकून ह्कलतात -"जा नाहीतर कम्भर॓त लात घालीन."

माधव आणि मित्र परततात. वाटेत एका घराकडे तहान लागली म्हणून पाण्यासाठी थांबतात.
ते लग्न घर असतं. तिथे एका गृहस्थाच्या दोन मुलींचं लग्न असतं.
पण मोठ्या मुलीचा होणारा नवरा परांगद होतो.
त्यामुळे दुसऱ्या मुलीचं लग्न पण खोळम्बतं.
माधवला, त्यांच्या मोठ्या मुलीचं पाणिग्रहण करा, असं विचारण्यात येतं.

माधव मनात स्वामींना आठवून , "मार्गदर्शन करा" अशी प्रार्थना करतो.
स्वामी मार्गदर्शन करतात -" हेचं तुझं प्राक्तन आहे! कर लग्न.त्या करताच तुला तिथे पाठवलं आहे."
माधवचं लग्न होतं आणि वर-दक्षिणा म्हणून ५००० रु. देण्यात येतात.

विवाहित जोडपं स्वामींच्या दर्शनाला येतात.
स्वामी म्हणतात-" ही माझीच रचना होती.तुला इतकं झिडकारलं तरी तू श्रद्धा अढळ ठेवली.जे सांगितलं ते डोळे झाकून केलं."
"तुला दुखातून बाहेर काढणं भागचं होतं. तू पत्नीशी एकनिष्ठ होता."
"पण माणसं दगा देतात.म्हणून परमेश्वरासी एकनिष्ठ होणं कधीही श्रेष्ठ!"
"दुखं असलं तरी दुखावर पर्याय असतो!"
"तुझा द्विभार्या योग होता. लग्न अटल होतं. दुखातून बाहेर पडं॰
"५००० रुपयांनी आपलं कर्ज फेडं."
"तुला काहीही कमी पडणार नाही."

बोध:सद्गुरू कितीही रागावले तरी तरी कृपा करतातचं.

(12) धनाचे झाले कोळसे


वडिलांच्या मृत्युनंतर विनायक चे सावत्र भाऊ, गोपाल आणि मारुती, संपत्ती वाटणीची मागणी करतात.
सर्व वडिलोपार्जित संपत्तीचे तीन बरोबर वाटे करण्याचं ठरते.
विनायकची बायको,त्याला निम्मा वाटा घ्या, असं सांगते.
दोन्ही भाऊ या गोष्टीला तयार नसतात.

विनायक स्वामींना नवस करतो कि जर दोन्ही भाऊ त्याला निम्मा वाट देणार तर तो आपल्या वाट्यातला एक-चतुर्थांश स्वामींना देणार.

सरपंच येऊन, तिघा भावांना त्यांच्या वडिलांचं मृत्युपत्र देतात.
त्या प्रमाणे विनायकनी केलेली सेवे मुळे त्याला सर्व संपती चा निम्मा वाटा मिळावा, असा उल्लेख होता.
विनायकची बायको दरोडेखोरांच्या भीतीनी सर्व धन खोलीत पुरून ठेवायला सांगते.

विनायक एक-चतुर्थांश स्वामींना द्यायची गोष्ठ काढतो तेव्हा त्याची बायको साफ नकार देते.तिच्या मते सर्व आपल्याला नशिबामुळे प्राप्त झाले आहे स्वामींमुळे नाही,म्हणून स्वामींना काहीही द्यायची गरज नाही.विनायक मान्य करतो.

इकडे स्वामी म्हणतात- "गरज सरो आणि वैद्य मरो"!
" तुम्ही वचन देवून विसरला तरी भगवंताला त्याची आठवण असते."

स्वामी साधूचं रूप घेऊन विनायक कडे येतात.
विनायकच्या बायकोला सांगतात कि विनायकला स्वामींचे देणे लागते.
विनायकची बायको काही पण ऐकायला तैयार नसते.
स्वामी म्हणतात-" मी विनायक ला आठवण करून दिली आहे, आता पुन्हा सांगणार नाही."
विनायकची बायको,विनायकला स्वामींचा निरोप देत नाही.

विनायकच्या बायकोला गोदा नावाची स्त्री ,'दरोडेखोरांना अटक झाली',असा निरोप देते.
दरोडेखोरांची भीती नाही म्हणून ते जोडपं पुरलेले धन उरकून काढतात.
धनाच्या पोटलीत कोळश्याचे तुकडे निघतात.
विनायक बायकोला दम देऊन विचारतो कि साधू बाबा कशाला आले होते.
बायको खरं-खरं सांगते.
विनायक वैतागतो आणि म्हणतो कि स्वामिनी मला पण आठवण केली होती,हे सर्व स्वामींच्या अवकृपेनी झालं आहे.
ते स्वामींची माफी मागायला जातात.
स्वामी: "काय रे विनायक! आता कशाला आला, तेही जोडीनी?"
विनायक सांगतो-"सर्व धन हिरवलं गेले, धनाचे कोळसे झाले."
स्वामी:"उपरवाले ने दिया,और वापस ले लिया!"

विनायक: "स्वामी माफ करा."
स्वामी:"हे शहाणपण आत्ता सुचले!"
विनायक: "मी तुम्हाला म्हाझ्या वाट्याचा निम्मं देईन."
स्वामी:"आम्हाला लाळूच देतात, आमच्या कडे काही उपाय नाही"
"नशीबाचं खाता ना! आता नशिबाचे फळं भोगा,मी कशाला पाहिझे, उचापती करायला!"
निराश जोडपं परततं

स्वामी भक्तांना संबोधन करतात-"तुम्ही देवाची भक्ती करतात ,मनोकामनेसाठी नवस करतात, पण फळ मिळाले की, नवस विसरतात!"
"देवाला केलेला नवस विसरायचा नसतो तो पाळण्यासाठी असतो ".

(11) सूरदासाची इच्छापूर्ती


स्वामी सर्व भक्तांना एक खेळ खेळायला बोलावतात. खेळ असा कि सर्वांनी एक-एक करून डोळ्यावर पट्टी बांधायची,व दुसर्यांनी त्याला गोल-गोल फिरवायचं , व त्या अवस्थेतच त्यांनी स्वामींना हुडकून काढायचं.
सर्व प्रयत्न करतात पण कुणालाळी यश येत नाही. शेवटी चोळप्पा प्रयत्न करतात आणि स्वामींना बरोबर हुडकून काढतात. सर्वाना आश्चर्य होतं. स्वामी सांगतात कि चोळ्यानी आम्हाला मनाच्या डोळ्यांनी शोधलं.
जो जो आम्हाला मनांच्या डोळ्यांनी शोधेल,आम्ही त्याला प्राप्त होऊ.
एका जन्मांध इसमाला श्रीकृष्णाच्या दर्शनाचा लळा होता. आपण अंध असल्यानी कृष्ण दर्शन करू शकत नाही,याचा त्याला खंत होता.
मथुरेला गेलो तर कृष्ण दर्शन होईल,पण मथुरेला जायला पैशे नाही म्हणून तो बाहेर पडतो.
मंदिरात प्रबोधनकार त्याची समझूत घालतात,कि अंध व्यक्तीला कुठेही कृष्ण दर्शन होऊ शकत नाही.
इकडे स्वामी मधुर बासरी वाजवतात.सर्व तल्लीन होतात.
चोळप्पाच्या प्रश्नावर स्वामी सांगतात कि आम्ही आमच्या भक्ताला बोलवायला बासरी वाजवत आहे.
इकडे ,सूरदासाची पत्नी निराश परतलेल्या आपल्या पतीला अक्कलकोटला जायचं सुचवते.
सूरदासाच्या मनाची तैयारी नसते म्हणून स्वामी स्वत: साधूचा रूप घेऊन भिक्षा मागायला येतात.
स्वामी भिक्षा ग्रहण करून, मथुरेच्या कृष्णाला, तुझी भिक्षा पोचली असं सांगतात.
मथुरेचा उल्लेख ऐकून सूरदास आपला मनोगत सांगतो.
स्वामी त्या दोघांना मथुरेला यायला तयार करतात.अक्कलकोटला पोचल्यावर स्वामी अदृश्य होतात.
सूरदास व त्याची पत्नी चकित होतात,त्यानां काही पण उमजत नाही, म्हणून ते सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी स्वामी कडे जायचं ठरवतात.
स्वामी सुरादासाला प्रेमानी जवळ बोलवतात.
स्वामी त्याच्यावर ध्यान केंद्रित करतात,सुरदासाला दृष्टी येते ,स्वामीच्या जागी त्याला मुरलीधर ,पिताम्बरधारी श्रीकृष्णाचे दर्शन होतात.
तो म्हणतो-"स्वामी, तुम्ही दत्ताचे पूर्णावतार आहे.माझ्यावर एक कृपा आणखी करा ,मला जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त करा.
स्वामी आशीर्वाद देतात -"तू जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होऊन ब्रह्मज्ञानी होईल."
बोध:मनांच्या डोळ्यांनी पहाणाऱ्यांना गुरु दर्शन होतचं.

(10) राघव कीर्तनकार होतो


गोविद बुवा एक नावाजलेले कीर्तनकार होते.गोविन्द बुवाचा मुलगा मुका होता पण तो फार छान चित्र काढायचा.
त्यांना लोक विचारायचे कि त्यांचा कीर्तन-वारसा पुढे कोण चालवणार, मुलाबद्दल चे प्रश्न ऐकून ते निरुत्तर व्हायचे.
इकडे स्वामी म्हणतात-" चोळ्या ! पानाचे ४ विडे आण अणि नदीवरून कावड भरून आण."
चोळ्या म्हणतो-"स्वामी कावड तर पहिलेच भरून आणली आहे!"
स्वामी कावड उलटवून पाणी सांडतात आणि म्हणतात आता तर रिकामी आहे ना कावड?
"जशी आज्ञा" असं म्हणून चोळ्या नदीवर कावड भरायला जातात.
तिकडे मुलाला चित्र काढताना पाहून गोविंद बुवा जाम भडकतात आणि त्याला चोपतात. राघव ला आता आपण काठीनी चोपू असं म्हणून ते काठी आणायला जातात.
माराला भिवून राघव नदीवर जीव द्यायला जातो.पाण्यात उडी मारतो,बुडताना चोळप्पा त्याला वाचवतात आणि समजवून स्वामी कडे आणतात.
स्वामी राघव ला विडे खायला देतात त्यामुळे राघवला वाचा येते.राघव आपल्या वाणीनी स्वामींना धन्यवाद देतो आणि स्वताला स्वामीला वाहून देणार असं म्हणतो.
तो आपल्या वडिलांना हि सुखद बातमी सांगायला जातो. स्वामी त्याला आत्ता जायचं नाही असं सांगतात.
नदीवर आंघोळ करताना गोविंद बुवांना पुष्कळ लोकांच्या तोंडातून ऐकायला मिळतं कि कोणी तरुण उत्तम पैकी कीर्तन करणारा कीर्तनकार येतो आहे. ते कुतूहलानी मंदिरात जावून पाहतात तर त्यांना आश्चर्याचा धक्काच लागतो.
तिथे राघव उत्तम पैकी कीर्तन करत होता.
ते जावून त्याला मिठी मारतात.स्वामी अडवतात आणि म्हणतात त्याला गळे लावायचं नाही.
गोविंद बुवा म्हणतात -'माझा पुत्र आहे हो!"
स्वामी रागावतात -"याला वाईट बोलला,खूब चोपलं,आता का पुत्र म्हणतात ?"
गोविंद बुवा स्वामींची क्षमा मागतात.
स्वामी त्यानां राघवची माफी मागायला सांगतात.
राघव त्यांचेच पाया पडतो.स्वामी त्याचं कौतुक करून म्हणतात-"मुलावर आकांक्षा लादु नये.प्रत्येक मनुष्य वेगळा,त्याच्या ठायी वेगळे गुण असतात.
तुम्ही वाचेने कीर्तन करतात, राघव चित्रांनी कीर्तन करतो.
शहाणे व्हा. मुलाच्या कलेवर प्रेम करा."
गोविंदबुवा स्वामीची क्षमा मागतात.

(9) भूताबाधेपासून सुटका

सुनंदाबाई कडे सरपंच येवून ,तिच्या नवऱ्या सदानंदाची तक्रार करतात आणि तिला गाव सोडायला सांगतात.सुनंदाबाईच्या नवऱ्याला पिशाच-बाधा होती, तो त्या मुळे गावातल्या लोकांना त्रास द्यायचा.
सुनंदाबाई त्यांच्याशी मुदत मागतात आणि नवऱ्याला स्वामी कडे नेणार असं सांगतात.
सरपंच हे मान्य करतात.
तिकडे स्वामी म्हणतात: "चोळ्या, आरतीची व्यवस्था चोख आहे ना? आज गम्मतच गम्मत येणार आहे."
सदानंदाला, आरतीत आणण्यात येतं,तो धडपडून सुटायचा प्रयत्न करतो.
सुनंदाबाई, नवऱ्यासाठी स्वामी कडे कृपा मागतात.
सदानंद सोडा-सोडा करत राहतो.
स्वामी सुनंदेला, आम्ही मदत करू असं आश्वासन देतात.सदानंद आपल्याला सोडवून पळतो.
दुसर्या दिवशी सदानंद छपरावर चढून बसतो.वरून ओरडत राहतो; "मी नाही जाणार."
कसबसं त्याला उतरवण्यात येवून स्वामी पुढे आणलं जातं.
स्वामी त्याच्या कपाळी विभूती लावतात.
स्वामी-" अब क्यो रोते हो?"
सदानंदाच्या आतलं पिशाच आपली कहाणी सांगतं- "सदानंदानी माझे २००० रु बुडवले,म्हणून मला आत्महत्या करावी लागली
आणि पिशाच बनावं लागलं.
स्वामी न्याय द्या."
स्वामी: "अब क्या चाहते हो? "
पिशाच: " माझे पैशे परत आणि माझा क्रिया-कर्म, सदानंदानी करावं !"
स्वामी सांगतात कि सदानंद स्वत: दरिद्री आहे.
"मी त्याला दरिद्री केलं"- असं पिशाच सांगतं.
"आत्तापर्यंतच्या सदानंदाच्या सेवेनी पैशे फिटले नाही का?"- असं स्वामी विचारतात.
पिशाच, "नाही सोडणार" असं सांगतो.
स्वामी एका कपड्याला उभं २ भागात फाडतात.
सदानंद खाली पडतो आणि बेशुद्ध पडतो.
स्वामी त्याच्या कपाळी स्पर्श करून म्हणतात-"जा त्या झाडावर निघून जा!"
पिशाच जातो.
सदानंद शुद्धीवर येवून स्वामी शरणी येतो. स्वामी सुनंदेला आपल्या पादुका देतात.
सुनंदा, आनंदानी त्या ग्रहण करते.

(8) स्वामींचा हनुमान

कुलकर्णी वकीलांची बायको निपुत्रीक असल्यानी दुखी होती. कुलकर्णी आपल्या बायकोसह अक्कलकोटला स्वामीस भेटायला जातात.

स्वामी त्यांना म्हणतात-" द्वारकानाथ को पुत्र चाहिये?" "पर हनुमान के सामने का अंधेरा हटावो?

जोडप्याला काही उमजत नाही पण स्वामी रागवेल म्हणून ते जास्त विचारत नाही.
सुंदराबाई त्यांचा कडून काही पैशे उकळून त्यांना गावातल्या सर्व हनुमान मंदिरात रोशनाई करायला सांगतात.
सर्व हनुमान मंदिरात उजेड करून ते स्वामी कडे परततात.
कुलकर्णी म्हणतात -" स्वामी ! आम्ही सर्व हनुमान मंदिरात रोशनाई केली .
स्वामी म्हणतात -" पर हमारा हनुमान तो अभी भी अंधेरे में हैं ?
कुलकर्णी जोडपं परत सर्व हनुमान मंदिर तपासायला जातात.
एका मंदिरात त्यांना कीर्तनकार बुवा मारुतीवर कीर्तन करताना भेटतात.त्यावरून त्यांना विचार येतो कि स्वामींचा हनुमान, म्हणझे स्वामींचा सर्वश्रेष्ट भक्त असावा.त्यांना वाटतं कि तो भक्त चोळप्पा असावा. चोळप्पा म्हणतात हा मान माझा नाही.
नंतर ते बाळप्पा कडे जातात.बाळप्पा पण प्रांजळपणे आपण स्वामींचा हनुमान नाही अस सांगतात.
नंतर बाळप्पा जोडप्याला मुरालीधरांच्या मंदिरात घेवून जातात. तिथे एक पाठमोऱ्या बसलेल्या व्यक्तीला स्वामीसुत म्हणून परिचय देतात.
स्वामी पुन्हा म्हणतात -" हमारा हनुमान अभी भी अंधेरे में है!"
चोळप्पा स्वामींना सूचना देतो कि बाळप्पा द्वारकानाथ यांना मुरलीधरांच्या मंदिरात घेवून गेले आहे.
इकडे बाळप्पा द्वारकानाथ यांना स्वामी सुतांची गोष्ट सांगतात.
स्वामीसुत यांचे पूर्वाश्रमी चे नाव हरीभाऊ ,ते जातींनी मराठा होते. मुंबई मध्ये ते नगर निगम मध्ये नौकरी करायचे.
नोकरी बरोबर हरीभाऊ व मित्र गजानन यांनी दोघांनी मिळून व्यापार सुरु केला, पण व्यापार बुडाला.
दोघे आपल्या परस्पर मित्र लक्ष्मण पंडित यांच्या कडे मदत मागायला जातात. लक्ष्मण राव स्वताच कर्जात बुडाले होते.
त्यांनी स्वामी कडे नवस केलेला असतो कि ८ दिवसात कर्ज फिटलं तर स्वामींच्या भेटीला जाऊ.
लक्ष्मण राव, हरिभाऊ व गजानन यांच्या पण कर्जाची जवाबदारी घेतात.कर्ज देणारी पेढी चा मुनीम लक्ष्मण राव च्या घरी येतो .
लक्ष्मण राव, मुनीम पैसे मागायला आला असं समझून, आपण बाहेरगावी गेलो अशी खोटी बातमी आपली गड्या मार्फत मुनीमाला देतात.
मग तो मुनीम हरिभाऊ यांना भेटतो आणि चांगली बातमी सांगतो कि पंडितांना दुसर्या एका व्यापारात फार फायदा झाला आहे .व तो २००० रु हरिभाऊ ला देतो. इकडे लक्ष्मण लपून ऐकतात.
स्वामींनी कृपा केली म्हणून सर्वांना गहिवरून येतं.
सर्व अक्कलकोट ला जायला निघतात. अक्कलकोट ला गेल्याशिवाय अन्न ग्रहण करायचं नाही असं ठरवण्यात येतं.
अक्कलकोटला येवून,सर्व चोळप्पाला भेटतात.चोळप्पा तेव्हा स्वामीचं उष्टं ताठ ठेवायला बाहेर आलेले असतात.
हरिभाऊ श्रद्धेनी त्या ताटातलं अन्न खातात.त्यांचे दोन्ही मित्र खायला नकार देतात.
स्वामींशी भेट झाल्यावर स्वामी स्वत: होवून म्हणतात -व्यापार केला, तोटा झाला. आम्हाला नवस केला.
सर्व लोकं थक्क होतात.
हरिभाऊ पैश्याची थैली स्वामी समोर ठेवतात.
स्वामी थैली ला घेवून जा असं म्हणतात ,आणि हरी भाऊ ला म्हणतात -" आम्हाला सफेद सफेद घेवून ये"!
बाळप्पा सफेद चा अर्थ ,चांदीच्या पादुका आहे, असं सांगतात.
स्वामी म्हणतात -"कुळावर पाणी, सोड आमचा सुत हो."
हरीभाऊ मुंबईहुन चांदीच्या पादुका घेऊन अक्कलकोट ला परत येतात.
स्वामी सर्वाना एक एक श्लोक सांगतात, आणि लक्षात ठेवायला सांगतात.
हरी भाऊच्या एका मित्राला सांगतात: "इदमेव शिवं इदमेव शिवं इदमेव शिवं "
हरी भाऊ ला सांगतात; "गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा "
हरी भाऊ स्वामीला पादुका भेट करतात. स्वामी पादुका घालतात,आणि छान आहे असं म्हणतात.
स्वामी या पादुका घालून फेर फटका मारायला जातात.हरीभाऊ ना गहीवरून येतं . सेवेकरी पादुका घ्यायला करतात पण स्वामी त्यांना हात लावू देत नाही.स्वामी त्या पादुकांना आत्मलिंग म्हणायचे.
स्वामिनी तब्बल १४ दिवस पादुका घातल्या. १४ दिवशी स्वामी म्हणतात ,तू आमचा सुत आहे ,संसार त्याग कर.
मग स्वामी हरी भाऊ ला आज्ञा देतात. दरिया किनारी एक किल्ला बांध.
या पादुका मस्तकावर ठेव. आणि तीन उठा -बश्या काढ.
हरिभाऊ आनंदानी श्री स्वामी आज्ञा पालन करतात. मग स्वामी हरिभाऊ ला पादुका त्या किल्यात स्थापन करायला सांगतात.
रात्री अचानक स्वामी उठून म्हणतात.-"चल रे निकल जाव यहा से!
यहा मेरे बाल गोपाल सोये है.
साले निकल जा यहा से. चल........".
त्यानंतर एक वाईट शक्ती तिथून निघून जाते.

स्वामी मग हरीभाऊ ला भगवे वस्त्र देतात आणि म्हणतात, ये लो, आपला सगळा संसार बुडवून टाक.
हरी भाऊ कबुली देतात -"मी उद्या मुंबई ला जातो व संसार सोडतो ; आयुष्य आपल्याला समर्पित करतो,
माउली पदरात घ्या".
स्वामी म्हणतात -"तू आम्हाला माउली म्हटलं, तू आजपासून हरीभाऊ नाही तू आमचा सुत."
हरिभाऊ मुम्बई ला जावून संकल्प करून आपलं सर्वस्व सोडतात.
ही गोष्ट पत्नी ताराबाई ला आवडली नाही,ती विरोध करते, पण स्वामीसुत तीला जुमानत नाही.
ताराबाई चे भरपूर सोन्याचे दागिने विकले जावून ब्राह्मणांना दान करण्यात येतात. .पत्नी भारी विरोध करते पण स्वामीसुत ऎकत नाही.
मंगळसूत्र सुद्धा ठेवले जात नाही.

हा सर्व वृतांत ऐकून ,द्वारकानाथ म्हणतात- "भक्ती करावी तर स्वामीसुता सारखी! "
द्वारकानाथ त्या मंदिराला रोषणाई करतात.स्वामीसुतांना परिचय देतात.प्रणाम करून, सर्व वृतांत सांगतात.
रोषणाई पाहून स्वामीसूतांना दिवाळी सारखं वाटतं.
"स्वामी तुमचा मनोरथ पूर्ण करेल ", असं स्वामीसुत सांगतात .
स्वामी म्हणतात -"क्यो द्वारकानाथ भेटला का हनुमान ?"
"अब हमारा हनुमान उजाले में है !"
"जाओ,चणे लेकर आओ!"
"खडे मुह क्या देखता है ?"

द्वारकानाथ चणे घेऊन येतात .

स्वामी म्हणतात -"ये लो चणे खेलने नही खाने के लिये. ये हमारा प्रसाद है. तुझी मनोकामना पूर्ण होईल."

एक वर्षानंतर द्वारकानाथ आपल्या पुत्राला स्वामींच्या पायाशी घालायला येतात.

त्यांची पत्नी म्हणते-" स्वामी !आपले उपकार कधी विसरू शकत नही !"

स्वामी म्हणतात -"भगवंताला भक्ताची इच्छा पूर्ण करायला आनंद वाटतो पण भक्ताला पण त्यासाठी प्रयत्नाची जोड लावायला पाहिझे."

 

(7) रोगापासुन मुक्ती


शंकरराव नावाचा एक गृहस्थ क्षय रोगा मुळे बेजार झाला होता. वैद्यांच औषध सुद्धा लागू होत नव्हतं. स्वामींना अंतरज्ञानांनी हे कळतं.इकडे वैद्य बुवा शंकररावांना गाणगापुरास जायला सांगतात.
स्वामी शंकररावांना स्वप्नात दृष्टांत देऊन ,अक्कलकोटास यायला सांगतात.
पण शंकरराव विभिन्न विकल्प काढून, तर्क-कुतर्क करून अक्कलकोटास यायला तयार नसतो. पण शेवटी आपल्या पत्नींच्या आग्रहाखातर अक्कलकोटास यायला तयार होतो.
स्वामी त्याला पाहिल्या बरोबर रागावतात."विश्वास नाही तरी का आला?" ,असं म्हणून परतायला सांगतात.
निराश शंकराव पत्नी सह परततो. वाटेत सुंदराबाई त्यांना अडवते, आपण स्वामींना म्हणून रोग बरा करवीन, अशी हामी देते.त्याबद्दल ती २०००रु. ची मागणी करते.
शंकरराव १०,००० रु द्यायला तयार होतो.
स्वामी शंकररावांना मुसलमान लोकांच्या कब्रीस्तानात बरोबर घेऊन जातात. कब्रीस्तानात का आणलं म्हणून ,शंकरराव दचकतात ,सुंदराबाई शंका काढतात.
तितक्यात स्वामी तिथे बिछावलेल्या फुलांच्या शय्येवर झोपतात. बाळप्पा शंकरारावना तुमचा रोग संपला असं सांगतात.इकडे शंकररावांना पण प्रचीती येते.
स्वामी तत्काळ उठून शंकरावना, शंका गेली का असं विचारतात.
मग स्वामी शंकररावांना तीन गोष्टी करायला सांगतात. पहिली फकीराना अन्नदान. दुसरी एका अधिकारी मुस्लीम व्यक्ती च्या समाधीवर फुलमाळा चढवायला .तिसरी कडू लिंबाच्या पाल्यात मिरे घालून खायला सांगतात.
इकडे शंकर राव, सुंदर बाईला दिलेलं वचन म्हणून स्वामींना १०,००० रु द्यायला जातो. चोळप्पा व सुंदराबाई तो पैसा आपल्याला मिळावं असं म्हणून पाहतात.
पण स्वामी शंकररावाला त्या पैशानी एक मठ गावाबाहेर बांधायला सांगतात.
शंकराव गावात मठ बांधायला म्हणतो पण स्वामी कटाक्षांनी त्याला गावाबाहेर राम मंदिराजवळ मठ बांधायला सांगतात.
बोध: या जन्मी माणसाचा सद्गुरू वर विश्वास नसला तरी पूर्व जन्मांच्या पुण्याईनी सद्गुरू स्वता होवून भक्तांचे संकट दूर करतो.

(6) गोसाव्याची मनोकामना

स्वामी निद्रेत असतात आणी  बाळप्पा त्यांचे पाय चेपत असतात, तितक्यात स्वामी एकदम जागे होऊन लोण्याची मागणी करतात.
लोणी खाऊन संतुष्ट भावानी स्वामी बाळप्पाला भक्तीचा अर्थ विचारतात.
बाळप्पा प्रांजळपणानी स्वामीवरच  तो प्रश्न  फिरवतात.
स्वामी म्हणतात: "भक्ती म्हणझे ईश्वराला वाहून जाणे.आयुष्य आपले नसून ईश्वराचे असं मानुन,तन मन आणि धनानि केलेलं समर्पण
म्हणझे भक्ती."
तिकडे एक गोसावी जलोधर रोगांनी ग्रस्त होता.त्या रोगामुळे त्याच्या पोटात सदेव कळा निघायच्या.
पण त्याची द्वारकेला जाऊन द्वारकानाथाचे दर्शन करावे अशी तीव्र इच्छा होती,
गोसावी मृत्यू आधी द्वारकेला जाऊन कृष्ण दर्शन करू,असा निश्चय करतो.गोसावी पोटदुखीच्या मर्मान्तक वेदना सहन करत द्वाराकेसाठी  निघतो.

द्वारकेला जातांना रात्री  स्वामी, संन्यासाच्या रुपात  गोसाव्याला स्वप्नात दृष्टांत देऊन अक्कलकोटला बोलवतात.
गोसावी थोडा विचार करून अक्कलकोटला येतो.
स्वामी त्याला पाहिल्याबरोबर विचारतात-"क्यो द्वारका जा रहे थे ना?यहा अक्कलकोट कैसे पहुचे?
गोसावी विस्मित होतो.
स्वामी म्हणतात: हमने ही बुलाया था! खऱ्या भक्ताची तळमळ जाणल्या शिवाय  आम्ही कशे राहणार?
गोसाव्याला स्वामींच्या जागी द्वारकानाथ कृष्णाचे दर्शन होतात. गोसावी धन्य होतो, तो स्वामींना रणछोडदास इत्यादी नावानी संबोधित करतो.
गोसावी म्हणतो: माझी इच्छा पूर्ण झाली आहे,आता देवाज्ञा झाली तरी काही हरकत नाही.
स्वामी म्हणतात: ती वेळ अजून आली नाही आहे. मग गोसाव्याला एका झाडाचा पाला देऊन म्हणतात-
"हा पाला रोज वाटून खात जा"
काही दिवसांनी गोसावी येउण पूर्ण रोग मुक्त झालो अशी स्वामींना सूचना देतो.
स्वामी  म्हणतात-'अनन्य भाव भक्ती असलेल्या शिष्याची मनोकामना आम्हाला पूर्ण करावीच लागते.
ज्याची भक्ती पक्व दिशेला गेलेली असते त्याची कामना गुरु पूर्ण करतोच.

(5) परमार्थात स्त्री-पुरुष भेद नसतो

नारायणबुवा, भीमाशंकराहुन स्वामीदर्शनाला येतात. स्वामी नारायणबुवांना काही दिवस मुक्काम करा असं सांगून, त्यांच्या राहण्याच्या  व्यवस्थेची  
 जवाबदारी चोळप्पा वर सोपवतात.
आर्थिक परिस्थिती बेताची असल्या मुळे चोळप्पाला प्रश्न पडतो, अंतर्ज्ञानी स्वामी हे जाणून मालोजीराव राजाकडून ५ रु प्रतीमाह चा मेहनताना
प्रदत्त करवतात.
नारायणबुवांचा नियम होता, दर रात्री पार्थिव शिवलिंग घडवायचं आणि दुसऱ्या दिवशी त्याचं पूजन करायचं.
हा नियम त्यांचा ४० वर्ष पासून चालू होता.
नारायणबुवा चोळप्पाला म्हणतात कि शिवपूजनामुळेच स्वामीभेटी चा योग घडून आला आहे. या शिव उपकारा मुळे ते आजन्म हे व्रत आचरणार आहे.
काही भक्त बाळप्पांना  जबरी नी राधाबाई नावाच्या एका नर्तकीच्या नृत्य-कार्यक्रमाला नेतात.
नृत्य होतांना बाळप्पा मान खाली घालून बसून राहतात.
राधाबाई नृत्य कार्यक्रमानंतर  बाळप्पांना बोलावते आणी नृत्य कसं वाटलं विचारते.
बाळप्पा म्हणतात- "मी  तुमचं नृत्य पाहिलच नाही कारण माझ्या मनात आणी शरीरात स्वामींच अधिष्ठान आहे,
तिथे कोणी दुसरा शिरू शकत नाही."
राधाबाईसाठी  बाळप्पाच अशी पहिली व्यक्ती असते जी तिच्या  रुपावर भूललेली नसते.
बाळप्पा स्वामींच वर्णन करतात "-स्वामी सुर्यासारखे तेजपुंज आहे, अजानबाहू आहे, गुलाबासारख्या सुंदर शरीराचे आहे."
"तुमची आणी स्वामींची तुलनाच होऊ शकत नाही,तुम्ही स्वामींच्या पासंगालाही पुरणार नाही."
राधाबाई भडकते आणी मनात विचार करते कि बाळप्पांच्या डोळ्यावरची स्वामी-पट्टी उतरवलीच पाजीझे.
दुसऱ्या दिवशी राधाबाई नटून-सजुन स्वामींना  नामोहर्रम करण्याच्या उद्देशांनी निघते.
इकडे नारायणबुवा तल्लीन भावांनी पार्थिव शिवलिंगाची पूजा करतात, स्वामी  जवळ येऊन त्यांना स्मितमुद्रेनी निरखून पाहतात,पण नारायणबुवाना
ह्याची जाणीव होत नाही.
जेव्हा नारायणबुवा  स्वामी जवळ दर्शनाला येतात,तेव्हा स्वामी पद-प्रहारांनी नारायणबुवांना पाडून देतात.
नारायण बुवा विचारता-"माझं काही  चुकलं आहे का?"
स्वामी म्हणतात -"शिव पूजन करताना आम्ही जातींनी आले होतो पण आमच्यावर लक्ष्य गेले नाही."
"शिवलिंग कुठून  आणतो ?"
नारायण बुवा उत्तर देतात- "मी  स्वत: घडवतो."
स्वामी आमच्या समोर शिवलिंग घडव, अशी  आज्ञा देतात.
काहीही केल्या नारायणबुवांना  शिवलिंग घडवण्यात यश येत नाही.
स्वामी मग समझ देतात- "अरे मूर्तीपूजा देवावर ध्यान केंद्रित करायची पहिली पायरी असते,सर्व-सामान्यांनी भक्ती मार्गा कडे वळावे
ह्या साठी मूर्ती पूजा असते."
"तू ती पातळी केव्हाची पार केली आहे, तुझी पातळी पुढची आहे, पुढे जा, देवाची मानस पूजा करत जा."
नारायणबुवा प्रांजळ स्वरात कबुली देतात- "मी  आजपासून मूर्तीपूजा बंद करणार व आजन्म तुमची सेवा व नामस्मरण करणार."

तेव्हाच राधाबाई तिथे येते व सरळ स्वामींना प्रश्न करते- "तुम्हीच का स्वामी समर्थ?"
स्वामी विचारात-"राधे स्त्री-पुरुषात काय अंतर असतं
राधाबाई लाजते.
स्वामी म्हणतात-"राधे लाजू नको ,षड्रिपू दोघात  असतात,स्त्री -पुरुष दोन्ही हसतात व रडतात
मग अंतर काय.
राधाबाई ओशाळून  उत्तर देते- स्त्री कडे वक्ष स्थळ असतं ते पुरुषाकडे  नसतं
स्वामी समझवतात-  "तुम्ही लोकं देहाचाच विचार करतात आणी इथेच मात खातात"
तुला अजून स्त्रीत्वाचा अर्थ कळला नाही आहे,तुला आहे तो अहंकार,तो गेल्यावरच तुझी  मोक्षवाट मोकळी
तू आपले स्त्री  अवयव या नारायण ब्राह्मणाला दान कर आणी आपली वाट मोकळी कर.
राधाबाई ओशाळून,लाजून  स्वामी वाक्याचं गांभीर्य न समझता परतते
घरी आल्यावर तिला जाणीव होते कि तिचे स्त्री अवयव नाहीसे  झाले आहे.
ती स्वामींची करुणा भाकते-"स्वामी क्षमा करा "
स्वामी तिथे प्रगत होतात  आणी म्हणतात-
राधे सुंदर शरीराचं समाधान असावं, अहंकार नाही.
सोंदर्य आज आहे उद्या नाही,पण भक्ती चीर काळ टिकते.
शारीर सोंदर्य  देवाचे वरदान पण मनाचे सोंदर्य ही स्वताची कमाई असते.
चार दिवसाच्या लावण्यावर किती काळ लोकांना भूलवेल,सुरकुत्या पडल्यावर सर्वलोकं पाठ फिरवेल.
मनाच्या  सोन्दार्यांनी देवभक्ती केली तर देव सावळी  सारखा आजन्म रक्षण करेल
राधाबाई वचन देते-आता नृत्य-गायन कलेचा उपयोग फक्त देव-भक्ती साठी करीन.
वचन दिल्यावर तिला तिचे नाहीसे  झालेले अवयव पुन: प्राप्त होतात.

बोध: सद्गुरूची सत्व परीक्षा पाहू नये.

(4) स्वामी नखाचे ताईत करुन विकणारा न्हावी

एक न्हावी दुसऱ्या लोकांची श्रीमंती बघून दु:खी व्हायचा.
 असमाधानी राहून , सुख प्राप्तीसाठी जास्त प्रयत्न  करत राहावे ,असं त्याचं मत होतं.
स्वामींच दर्शन करून तो त्यांचे नखं कापतो.
स्वामी त्याला परिवाराबद्दल प्रश्न  विचारतात .
न्हावी उत्तर देतो, जमेल तितकं मुला-बाळांचे हट्ट पुरवतो.
स्वामी म्हणतात: "भाग्यवान आहे तुझे मूलं-बाळ." .
मग अगदी केविळवाण्या स्वरात म्हणतात: "आमच्या कडे कोणी पाहत नाही, दोन वेळेचं जेवण मिळतं फक्त!"
"मोठे मोठे भक्त, गोष्ठी मात्र मोठ्या करतात, पण करत काही नाही !"
"आम्हाला पण सुख ऐश्वर्य, मिळायला नको का ?"
"आता विचार करतो कि महाराजांकडेच जाऊन राहवं."
"तुझ काय मत आहे ?"
"मी काय सांगू" असं म्हणून न्हावी थोडा ओशाळतो आणी परततो.
घरी जाऊन न्हावी बायकोला स्वामींच्या नखाची पुरचुंडी फेकायला देतो, पण त्याची
स्वामीभक्त पत्नी, संसारी लोकांच दुख दुर करण्यासाठी नखांचा वापर करू असं सुचवते.
ती म्हणते: "स्वामींच्या नखांच  ताईत करुन अडलेल्या-नडलेल्यान्ची मदत करू."
इकडे स्वामींकडे एक भट नावाचा एक व्यक्ती पोटदुखीनी बेजार होऊन येतो.
स्वामी त्याला मुरलीधराच्या मंदिराजवळ असलेल्या कडु लिंबाचा पाला खायला सांगतात.
पण त्या झाडाचे पानं कडू जहर असल्यानी भट बुवा खाऊ शकत नाही.
ते प्रांजळपणे स्वामींना कडू पाला खायची कुवत नाही, अशी कबुली देतात.
स्वामी भक्ता सह झाडाजवळ येतात, तिथे एका भक्ताला म्हणतात-
'पाह रे! पाला कडू आहे का?"
भक्त पाला चाखून, पाला फार कडू आहे, असं उत्तर देतो.
स्वामी मग स्वता होऊन एक फांदी तोडून भटबुवांना देतात.
भट बुवा त्या फांदीची पाने खातात आणी ती गुळासारखी गोड आहे, असं सांगतात.
मग म्हणतात : "स्वामी तुमच्या स्पर्शांनी कडू-जहर पाला गोड झाला, त्या बरोबर माझा पोटदुखीचा त्रास पण गेला.
आपल्या कृपे मुळे माझं कडू लिंबा सारखं आयुष्य धन्य झालं.

स्वामी नखाचे ताईत करुन विकणारा न्हावी भाग # २
न्हाव्याच्या शेजाऱ्याचा मुलगा तापांनी फणफणत होता.न्हाव्याची बायको त्याला स्वामीनखाचं ताईत देते.
विहीरी वर सावकाराची निपुत्रिक सुन जीव द्यायला येते. न्हाव्याची पत्नी तिला अडवते,समझुत घालुन एक ताईत देऊन
परतवते.
न्हाव्याचा एक लाकुडतोड्या मित्र सावकाराच्या कर्जात आकंठ डुबला होता. न्हावी त्याला पण एक ताईत देतो.
काही दिवसांनी लाकुडतोड्या न्हाव्याला बातमी देतो कि तुझ्या दिलेल्या ताईतानी तर माझे दिवसच फिरले.
सावकाराच्या सुनेला दिवस गेले व त्या आनंदात सावकारांनी सगळ्यांचे कर्जे माफ केले.
इकडे, बाळप्पा स्वामींना ताईता मुळे भक्तांना झालेले फायदे सांगतात.
स्वामी म्हणतात: "एक राज कि बात बताये !"
"भक्तांना फायदा नखामुळे नाही त्यांच्या विश्वासाच्या भावनेनी होतो "
तिकडे, लाकुडतोड्या मित्र न्हाव्याला सल्ला देतो कि तु ताईत फुकट न देता विक्रय करत जा ,
अशांनी तु श्रीमंत होणार.
न्हाव्याला पण ते पटतं.
मग काय,परमार्थात आपला स्वार्थ पाहिल्या मुळे ताईताची किमया जाते.
ताईत खरेदी करणारे लोकं फळ न मीळाल्या मुळे भडकतात आणी न्हाव्याला चोप देतात.
न्हावी त्या लोका पासून जीव वाचवत पळून स्वामी चरणी येऊन पडतो.
स्वामी मग त्याला चांगलीच समझ देतात- "अरे पहिले तुझी भक्ती आणी विश्वास पाहून , आम्ही तुझा शब्द
ठेवत होतो."
"पण तु स्वताच्या स्वार्थासाठी परमार्थाचा विक्रय करायला लागला."
"परिणाम काय? चोप मिळाला ना?"
"अरे काय कमी होती तुला ,सुज्ञ बायको आहे सोन्या सारखी मुलं आहे."
अरे दुसऱ्यांचा पैसा कशाला पाहतो?
"अरे प्रत्येकाला आप-आपल्या पूर्वकर्मानुसार देव प्रारब्ध देतो."
"भगवंताची सेवा करुन मनाची श्रीमंती प्राप्त कर."
"मनाची श्रीमंतीच खरी श्रीमंती आहे."
"तुझ्या बायको-मुलांना पाहून तुला क्षमा करतो , पुन्हा अशी चूक करू नको."

बोध: परमार्थात निज स्वार्थ साधू नये.  

(3) मला ब्रह्म दाखवा

विष्णू बुवा ब्रह्मचारी हे वेद-पुराण संपन्न प्रकांड विद्वान होते. चार वेद सहा पुराण जाणुनही आपल्याला ब्रह्म
भेटला नाही,याचा त्यांना खंत होता.
एकदिवस ते वैतागून मंदिरात जातात, तिथे ब्रह्म दर्शन करीन किंवा प्राण त्यागीन, असा हट्ट धरून सतत घंटानाद
करतात.
योग-योगानी  बाळप्पा तिथे येतात आणी विष्णू बुवांची समझ घालुन त्यांना स्वामी कडे नेतात.
विष्णू बुवा सरळ स्वामींना,'ब्रह्म दाखवा ' असा आग्रह करतात.
स्वामी त्यांच्या कडे जाम दुर्लक्ष करतात आणी निद्रालीन होतात.
विष्णुबुवा याला आपला अपमान समझतात आणी स्वामींना दुषण देऊन परततात.
इकडे चोळप्पाच्या विरुद्ध सुंदराबाई, तक्रार नोंदवते कि चोळप्पा स्वामी सेवेसाठी मिळणाऱ्या मेहतान्याचा
उपयोग स्वता साठी करतो.
राणी सरकारच्या आदेशानुसार शिपाई चोलाप्पाच्या घराची झडती घ्यायला येतात.
चोळप्पाच्या  पत्नीनी स्वामी सेवेसाठी मिळणाऱ्या रकमेतली शिल्लक उरलेली रकम जमवून एका डब्यात 
ठेवलेली असते.
पण तिचा उद्देश ठाम असतो कि ही रकम  अडल्या-नडल्या वेळेला स्वामी सेवेसाठीच खर्च करायची.
झडती घेणाऱ्यांचा हाती तो डब्बा लागतो, चोळप्पाची  पत्नी डोळे मिटुन स्वामींची करुणा भाकते.
स्वामी कृपेनी डब्यातले पैशे नाहीशे होतात आणी झडती घेणारे रिकामे परततात.
इकडे स्वामी  म्हणतात-" अरे तुमचा उद्देश निर्दोष असतांना मी  तुम्ही निष्पाप लोकांना कशी शिक्षा होऊ देणार?"
विष्णू बुवा झोपले  असतांना त्यांना स्वप्नात, शरीरावर शेकडो विंचू फिरतांना दिसतात, त्यातला एकही विंचू
चावेल या भितीनी ते कासावीस होतात.
जाग आल्यावर सुद्धा त्यांच्या मनावर स्वप्नाच दडपण असतं.
इकडे बाळप्पाला स्वामी सांगतात-"अरे प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते, त्या आधी बोलण्यात काही अर्थ नसतो."
"म्हणून आम्ही विष्णूबुवांच्या प्रश्नाचं उत्तर नाही दिले."
स्वामी सुन्दराबाईला समझ देतात-" जो पर्यंत आम्ही ज्याचं राखण करतो तो पर्यंत कोणीही त्याचं वाकडं करू शकत
नाही."
"काही कारणांनी आम्ही तुझ्या कारस्थानांवर दुर्लक्ष्य करतो याचा अर्थ हा नाही कि आम्ही आपल्या लेकराचं रक्षण
करणार नाही."
इकडे विष्णुबुवा तडका-फडकीनी स्वामी कडे येऊ विचारतात-:" ब्रह्म तदाकार वृत्ती याचा अर्थ काय आहे?
"मला ब्रह्म दाखवा."
स्वामी ओरडतात- " मोठा आला ब्रह्म पाहणारा, काल स्वप्नात विंचू चावेल या भितीनी घाबरणारा तु,
ब्रह्म पहायला निघाला आहे!"
आपल्याला पडलेल्या स्वप्नाची जाणीव स्वामींना आहे, हे कळल्यावर  विष्णूबुवांना स्वामींच्या  अधिकाराची
 प्रचीती येते.
ते स्वामी चरणी लीन होऊन क्षमा मागतात.
स्वामी आपली उशी देऊन तिला कानाला स्पर्श कर असं सांगतात.
स्वामींच्या उशीचा स्पर्श झाल्या बरोबर विष्णूबुवांना ब्रह्म साक्षात्कार घडतो, ते आनंदानी डोलु लागतात.
बोध :स्वताची जो पर्यंत पात्रता नसते तो पर्यंत ईश्वर दर्शनाचा हट्ट धरून कोणताही अतिरेक करू नये.

(2) श्रीगुरुलीलामृत रचयीता वामनबुवांची गोष्ट

चोळप्पा वामन बुवांची स्वामींशी भेट घडवतात.
स्वामी म्हणतात:- " वामना! इतक्या नोकऱ्या धरल्या सोडल्या , आता आमची नोकरी धर."
" ब्रह्मनिष्ठ हो."
वामन बुवा सहमती देतात.
सुंदराबाई चोळप्पांना स्वामी सेवेसाठी आलेले पैशे आपल्या कुटुंबासाठी पण वापरत जा अशी दिशा भूल करते,
चोळप्पांना ते पटत नाही पण सुंदर बाईच्या शब्दांना भुलून ते काही पैशे कुटुंबासाठी वापरतात.
पण त्यांचच मन त्यांना खातं. त्याचं दडपणाखाली ते वावरतात,.
वामनबुवा स्वामी कडे आपल्या कुलदेवी नाशिकची सप्तशृंगी च्या दर्शनाला जायची अनुमती मागतात.
स्वामी अनुमती देतात.
मग बाळप्पांना म्हणतात- "ह्याला म्हणतात, 'काखेला कळसा आणि गावाला वळसा' ! "
देवीच्या मंदिरात ते पुजाऱ्याला देवीतल्या मुखातला विडा प्रसाद म्हणून मागतात,
पुजारी स्पष्ट नाकारतात.
वामन बुवा मनो-मन प्रार्थना करतात:- " जर देवीची माझ्या कुळा वर कृपा आहे तर
देवीच्या मुखात ला विडा माझ्या हातात पडावा."
इकडे स्वामी म्हणतात:- " अरे किती हट्ट करणार,आणि आम्ही किती हट्ट पुरवायचे."
बाळप्पांनी दिलेला  विडा  स्वामी तोंडात घालतात आणी तिकडे देवीच्या मुखातला  विडा
वामन बुवांच्या हातात पडतो. हे पाहून,पुजारी सुद्धा चकित होतो.
चोळप्पाला स्वामी म्हणतात:-"मनात चोर असला  कि भीती वाटते.तुला सर्व कळतं पण वळत नाही."
"मनुष्य आपली चूक लोकांपासून लपवू शकतो पण देव आणि गुरु पासून नाही."
"चोळप्पा स्वताला  फसवू नको."
देवी दर्शना नंतर वामनबुवा पंढरपूरला पांडुरंग दर्शनाला जातात.
तिथे पांडुरंगाच्या मूर्तीत त्यांना स्वामी पांडुरंग रुपात दिसतात.
तीर्थयात्रा आटपून वामन बुवा स्वामी दर्शनाला येतात.
स्वामी म्हणतात-" काय वामना!  झाली मनसोक्त तीर्थ यात्रा."
" अरे पण हातात विडा आम्हाला द्यावा लागला.पांडुरंगाला जी गंगा अर्पण केली ती
आम्ही ग्रहण केली."
"अरे कशाला वण-वण फिरतो. परमानंदात राहा "
"ईश्वराचं रूप नाही स्वरूप ओळखा ,भक्तीची ताकद एवढी वाढवा कि भगवंताला तुमच्या कडे यायल पाहिझे."
"देवाला हृदयात ठेवा तेव्हा तो तुम्हाला त्याच्या हृदयात स्थान देईल."
वामन बुवा गहिवरून म्हणतात:- "स्वामी आपल्या लीला अगाध आहे!"
"त्यांना शब्दबद्ध करुन ग्रंथ लिहू इच्छितो."
स्वामी स्मितमुद्रेनी म्हणतात:- "तुझी इच्छा पूर्ण होईल. माझा आशीर्वाद आहे."
पुढे वामन बुवा स्वामीलीलेंवर ग्रंथ लिहितात ,हाच ग्रंथ श्रीगुरुलीलामृत म्हणून साकार होतो.