श्रीपादराव आणी अनुराधा एक निपुत्रिक जोडपं होतं.श्रीपादररावांना संतानाची फार लालसा होती.
पण भाग्यात संतती नाही म्हणून ते गप्प बसायचे.
त्यांची मातुश्री सुनेला सारखी मर्मान्तक टोमणे मारायची.
अनुराधेची मैत्रीण पुष्पाला पोटदुखीचा त्रास होता.
काहीही करता पोटदुखी जात नाही.
त्या करता ती स्वामींकडे येऊन आपली व्यथा सांगते.
स्वामी म्हणतात-" गंगा भागीरथी झाल्यावर व्याधी जाणार."
पुष्पेला स्वामी वचनाचा फारसा काही बोध होत नाही.
अनुराधा तिला सांगते कि गंगा भागीरथी चा बोध वैधव्य आहे.
अनुराधेला मासिक धर्म बंद झाल्या मुळे आता संतान व्हायची शेवटची आशा ही संपली
असं म्हणुन घरचे घरा बाहेर काढतात.
अनुराधा पुष्पाकडे जाते.स्वामी वचनाप्रमाणे पुष्पाला वैधव्य आलेले असतं आणी तिची
पोट-दुखी सुद्धा कायमची बंद झालेली असते.
पुष्पा,अनुराधेला स्वामीकडे जायचं सुचवते.
आता स्वामीच मार्ग दाखवू शकतात,अस ठरवून अनुराधा अक्कलकोटला येते.
अक्कलकोटला अनुराधाचा भाऊ मन्नू गवळी राहायचा. तो वृत्तींनी अगदी अप्रामाणिक होता.
दुधात पाण्याची भेसळ करायचा,गरजवंत पाहून भाव दुप्पट करायचा.
एकदिवस तो दुधात वापरण्याचं पाण्याची भेसळ करुन दुप्पट किमतीत स्वामींच्या शिष्यांना दुध विकतो.
त्या पाण्या मुळे दुध नासतं. स्वामींच्या कानावर सर्व प्रकरण येतं.
दुसऱ्या दिवशी मन्नू गवळ्याच्या गायीचा थनातून दुधा ऐवजी रक्त येतं.
हा सर्व स्वामींचा प्रकोप म्हणुन तो स्वामींना शरण येतो.
स्वामी त्याला समझ देतात, व प्रामाणिक पणे वागत जा असं सांगतात.
दुसऱ्या दिवशी अनुराधा स्वामींची भेट घेते.
स्वामी म्हणतात:-"तुला खोडकर मुलगा होईल!"
अनुराधा आनंदानी सासरी परतते .
अनुराधेला पहिल्या बरोबर नवरा आणी सासू परतायचं कारण विचारतात.
अनुराधा स्वामींच्या आशीर्वाद बद्दल सांगते.
तरीही घरचे तिला हकलतात.
तितक्यात अनुराधेला घेरी येते, त्यांनतर वमन ही होतं.
सासुबाई पटकन ओळखतात कि अनुराधेला दिवस गेले आहे.
त्यानंतर आई-मुलाच्या व्यवहारात कमालीचा बदल होतो.
ते तीचं कौतुक करतात. अनुराधा पण मागचं सर्व विसरून खुशाल राह्यच ठरवते.
तितक्यात स्वामी तिथे प्रगट होतात.
स्वामी आई-मुलाची चांगलीच हाजरी घेतात.
ते दोन्ही स्वामींची क्षमा मागतात.अनुराधेचा संसार सुखमय होतो.
No comments:
Post a Comment