Saturday, October 2, 2010

(16) स्वामींचा एकलव्य



स्वामी विचारतात: चोळ्या! श्रेष्ट धनुर्धर कौन? एकलव्य कि अर्जुन?चोळप्पा म्हणतो-"इतिहास सांगतो,अर्जुन श्रेष्ठ धनुर्धर!"
स्वामी मग विचारतात -"सर्वश्रेष्ट शिष्य कोण ? अर्जुन कि एकलव्य?"
या प्रश्नाला चोळप्पा विचारात पडतात.

स्वामी मग समझवतात:"सर्वश्रेष्ट शिष्य एकलव्य! कारण त्यांनी गुरुची मानस पूजा केली त्यांच्या प्रेरणेनी विद्या ग्रहण केली आणि गुरुनी मागितल्यावर आपला उजव्या हाताचा अंगठा पण दक्षिणा म्हणून दिला."

आमचा पण एक एकलव्य आहे.आमची निष्ठेनी सेवा करतो,डोळ्यात प्राण आणून आमची वाट पाहतो.
स्वामींनी एकलव्य म्हणून ज्या व्यक्तीचं वर्णन केलं, तो आनंद असतो.

आनंद जातींनी कनिष्ट असून तो कुलकर्णी कुटुंबाचा घर-गडी म्हणून वावरत होता.कारण त्याच्या माता-पितानी कुलकर्ण्या कडून कर्ज घेतले होते,पण ते न फेडता ते देवाघरी जातात.
ते कर्ज फेडायला आनंद घर-गडी म्हणून राबत होता.तो अगदी मनापासून स्वामीभक्ती करायचा.
जातींनी कनिष्ट असल्यामुळे त्त्याला देवघरात प्रवेशास मज्जाव होता.देवघरात स्वामींचं एक तेलचित्र होतं, त्याचं दर्शन करावं असं त्याला सारखं वाटायचं.
पण काहीही करून कुलकर्णी त्याला देवघरात प्रवेश करू नाही द्यायचे.
या मुळे आनंद आपल्या खोलीत एका दगडाला स्वामींचे चरण मानून पूजायचा.
त्या दगडाला नमस्कार करून, फुलं चढवून तो समाधान मानत होता.

कुलकर्णी बुवांचा मुलगा विष्णू याला नोकरीत बढती मिळाल्या मुळे घरात स्वामी नामसंकीर्तनाचा जागर करण्यात येतो.
आनंद प्रार्थना करतो कि आज संकीर्तनाचा च्या दिवशी तरी स्वामींच्या चित्राचे दर्शन करू द्या.पण कुलकर्णी बुवा त्याचं म्हणणं फेटाळून लावतात.
स्वामी, विष्णू कुलकर्णीच्या स्वप्नात येवून सांगतात कि उद्या मी तुझ्या घरी येणार आहे.सर्व कुलकर्ण्यांनां आनंद होतो.
स्वामीच्या नाम संकीर्तनाचा जागर सुरु होतो. आनंद मात्र आपल्या खोलीत त्या दगडापुढे हाथ जोडून बसला राहतो.
नाम संकीर्तन झाल्या वर एक चमत्कार होतो, स्वामींच्या तेलचित्रात आनंद दिसायला लागतो.
कधी स्वामी दिसतात तर कधी आनंद.

सर्व लोकं चकित होतात.कुलकर्णी बुवा, विष्णूला "आनंदला बोलाव" असं सांगतात.
विष्णू,आनंदाच्या खोलीत येऊन, त्याला आहो-जाहो करून,त्याची विनवणी करून देवघरात नेतो.
आनंदला विचारण्यात येतं कि ह्या चमत्कारचं काय रहस्य आहे?

आनंद काही म्हणणार तितक्यात स्वामी तिथे प्रगट होतात आणि म्हणतात-"आम्ही सांगतो कसा झाला चमत्कार."
आनंद स्वामीच्या पाया पडतो.
स्वामी मग कुलकर्णी बुवांची हाजिरी घेतात-"काय तुम्हाला काय वाटलं, आम्ही फक्त सोवळे-ओवळे पालणारे भक्तांनाचं दर्शन देतो?"
"परमेश्वराला सर्व भक्त सारखे.अरे ज्यांनी सृष्टी बनवली आहे तो काय त्यातील घटकातील भेद करेल?"
"अंतरंगात शुद्ध भक्तीभाव असला तेव्हांच देव वशात होतो.बाकी वरचेवर साधने आहे."
"काही लोकं त्याचाच अतिरेक करतात आणि पाखंडीपणानी वागतात."
"आम्हाला हे नामंजूर आहे."
"आमच्यावर निर्मल भक्ती करणाराच आम्हाला प्यारा आहे."
"जशे आम्हाला महत्व देतात तसाच आमच्या भक्तांना सुद्धा महत्व दिलं गेलं पाहिझे ."
"भक्तीभाव असेल तर तेलचित्र काय आणि दगड काय,आमचे दर्शन होणार."

स्वामी आनंदाला म्हणतात-"आनंद ! अनेक शिष्य असले तरी एकलव्या सारखा तूच आहे.आम्हालाही तुला पाहयचं होतं."
कुलकर्णी बुवा म्हणतात:"स्वामी मी चुकलो!"
स्वामी: "हो तुम्ही चुकला."
"अरे पण त्यामुळे या आनंदाला किती त्रास झाला .माफी मग त्याची आता!"
कुलकर्णी बुवा माफी मागतात.
आनंद त्यांना माफी मागू नका,"मी तुमचं मीठ खाल्लं आहे",असं सांगतो.

स्वामी प्रसन्न मुद्रेनी आशीर्वाद देतात:"भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे !"

No comments:

Post a Comment