गोपाळ नावाचा एक भक्त स्वामींची कीर्ती ऐकून अक्कलकोटला
दर्शनास आला होता.
स्वामींच्या सहवासात तो इतका रंगला कि तो अक्कलकोटलाच राहु लागला.
चार वर्ष झाले तरी मुलगा येत नाही, म्हणुन त्याचे बाबा व
काका अक्कलकोट ला येतात.
ते पहिले चोळप्पांना चीरमीरी देउन, स्वामींनी गोपाळला आपल्या बरोबर पाठवावं,
असं करू पाहतात.
पण काहीही झाल्या ,गोपाळ परत यायला तयार नसतो.
मग त्याचे बाबा आणी काका त्याला स्वामी समोर समझवतात-
" अरे तु कुणाच्या नादी लागला आहे?"
"या बाबांच्या अंगावर, अंगभर कपडे सुद्धा नाही आहे! ते तुला काय देणार?"
"अरे तु व्यापारयाचा मुलगा आहे, इथे जे ४ वर्ष वाया घालवले ,
तेच व्यापाराला दिले असते तर
किती तरी धन कमवले असते."
स्वामी मंदस्मित करत निमुटपणे सर्व एैकतात.
मग स्वामी म्हणतात-" अरे गोपाळा! मुलांनी आपल्या वडीलधारी मंडळीचं
एैकावं,त्यांची
आज्ञा पाळावी.
तु आपल्या बाबा आणी काका बरोबर आपल्या गावी जा.
गोपाळ पहिले तयार होत नाही पण स्वामी आज्ञा म्हणुन होकार देतो.
जातांना स्वामी त्याला दोन भले-मोठ्ठे हाडं देतात.
स्वामी म्हणतात-" अरे गोपाळा !
तुझे बाबा आणी काका बरोबर बोलतात, आमच्या कडे तुला द्यायला काहीही
नाही, हेचं हाडं आमची आठवण म्हणुन घेऊन जा."
गोपाळ त्या हाडांना हृदयाला लावून काळजीनी नेतो.
रस्ताभर त्याचे बाबा-आणी काका
स्वामींची थट्टा करतात.
गोपाळ निमुटपणे ऐकत राहतो.
घरी पोहचल्यावर बाबा म्हणतात- "अरे हाडं काय घरात ठेवणार ! "
"फेंक त्यांना घरा बाहेर!"
गोपाळ हाड ठेवलेली पिशवी हृदयाला लावतो.
त्याचे बाबा आणी काका बळ-जबरीनी पिशवी हिसकवतात.
त्यामुळे ती पिशवी खाली पडते आणी त्यातले हाडं बाहेर पडतात.
सर्वजण पाहतात तर काय हाडं सोन्याचे झाले होते.
गोपाळच्या, बाबा आणी काकांना स्वामींच्या अधिकाराची प्रचीती येते.
जन्मभर श्रम करुन सुद्धा इतकं सोनं जमवता आले नसते.
गोपाळ म्हणतो -"या सुवर्णात माझा काहीच रस नाही.
"हे सोनं तुम्ही ठेवा ! मी स्वामी कडे परत जातो."
"स्वामी कडे २-४ दिवस चालणारं धन नाही मिळत,
पण जन्म-मरणाच्या फेऱ्यातून सोडवणारी मुक्ती मिळते."
"आपल्या जीवनाला गती मिळणे हाच मनुष्य जन्माचा परमोच्च हेतू आहे."
No comments:
Post a Comment