नारायणबुवा, भीमाशंकराहुन स्वामीदर्शनाला येतात. स्वामी नारायणबुवांना काही दिवस मुक्काम करा असं सांगून, त्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेची
जवाबदारी चोळप्पा वर सोपवतात.
आर्थिक परिस्थिती बेताची असल्या मुळे चोळप्पाला प्रश्न पडतो, अंतर्ज्ञानी स्वामी हे जाणून मालोजीराव राजाकडून ५ रु प्रतीमाह चा मेहनताना
प्रदत्त करवतात.
नारायणबुवांचा नियम होता, दर रात्री पार्थिव शिवलिंग घडवायचं आणि दुसऱ्या दिवशी त्याचं पूजन करायचं.
हा नियम त्यांचा ४० वर्ष पासून चालू होता.
नारायणबुवा चोळप्पाला म्हणतात कि शिवपूजनामुळेच स्वामीभेटी चा योग घडून आला आहे. या शिव उपकारा मुळे ते आजन्म हे व्रत आचरणार आहे.
काही भक्त बाळप्पांना जबरी नी राधाबाई नावाच्या एका नर्तकीच्या नृत्य-कार्यक्रमाला नेतात.
नृत्य होतांना बाळप्पा मान खाली घालून बसून राहतात.
राधाबाई नृत्य कार्यक्रमानंतर बाळप्पांना बोलावते आणी नृत्य कसं वाटलं विचारते.
बाळप्पा म्हणतात- "मी तुमचं नृत्य पाहिलच नाही कारण माझ्या मनात आणी शरीरात स्वामींच अधिष्ठान आहे,
तिथे कोणी दुसरा शिरू शकत नाही."
राधाबाईसाठी बाळप्पाच अशी पहिली व्यक्ती असते जी तिच्या रुपावर भूललेली नसते.
बाळप्पा स्वामींच वर्णन करतात "-स्वामी सुर्यासारखे तेजपुंज आहे, अजानबाहू आहे, गुलाबासारख्या सुंदर शरीराचे आहे."
"तुमची आणी स्वामींची तुलनाच होऊ शकत नाही,तुम्ही स्वामींच्या पासंगालाही पुरणार नाही."
राधाबाई भडकते आणी मनात विचार करते कि बाळप्पांच्या डोळ्यावरची स्वामी-पट्टी उतरवलीच पाजीझे.
दुसऱ्या दिवशी राधाबाई नटून-सजुन स्वामींना नामोहर्रम करण्याच्या उद्देशांनी निघते.
इकडे नारायणबुवा तल्लीन भावांनी पार्थिव शिवलिंगाची पूजा करतात, स्वामी जवळ येऊन त्यांना स्मितमुद्रेनी निरखून पाहतात,पण नारायणबुवाना
ह्याची जाणीव होत नाही.
जेव्हा नारायणबुवा स्वामी जवळ दर्शनाला येतात,तेव्हा स्वामी पद-प्रहारांनी नारायणबुवांना पाडून देतात.
नारायण बुवा विचारता-"माझं काही चुकलं आहे का?"
स्वामी म्हणतात -"शिव पूजन करताना आम्ही जातींनी आले होतो पण आमच्यावर लक्ष्य गेले नाही."
"शिवलिंग कुठून आणतो ?"
नारायण बुवा उत्तर देतात- "मी स्वत: घडवतो."
स्वामी आमच्या समोर शिवलिंग घडव, अशी आज्ञा देतात.
काहीही केल्या नारायणबुवांना शिवलिंग घडवण्यात यश येत नाही.
स्वामी मग समझ देतात- "अरे मूर्तीपूजा देवावर ध्यान केंद्रित करायची पहिली पायरी असते,सर्व-सामान्यांनी भक्ती मार्गा कडे वळावे
ह्या साठी मूर्ती पूजा असते."
"तू ती पातळी केव्हाची पार केली आहे, तुझी पातळी पुढची आहे, पुढे जा, देवाची मानस पूजा करत जा."
नारायणबुवा प्रांजळ स्वरात कबुली देतात- "मी आजपासून मूर्तीपूजा बंद करणार व आजन्म तुमची सेवा व नामस्मरण करणार."
तेव्हाच राधाबाई तिथे येते व सरळ स्वामींना प्रश्न करते- "तुम्हीच का स्वामी समर्थ?"
स्वामी विचारात-"राधे स्त्री-पुरुषात काय अंतर असतं
राधाबाई लाजते.
स्वामी म्हणतात-"राधे लाजू नको ,षड्रिपू दोघात असतात,स्त्री -पुरुष दोन्ही हसतात व रडतात
मग अंतर काय.
राधाबाई ओशाळून उत्तर देते- स्त्री कडे वक्ष स्थळ असतं ते पुरुषाकडे नसतं
स्वामी समझवतात- "तुम्ही लोकं देहाचाच विचार करतात आणी इथेच मात खातात"
तुला अजून स्त्रीत्वाचा अर्थ कळला नाही आहे,तुला आहे तो अहंकार,तो गेल्यावरच तुझी मोक्षवाट मोकळी
तू आपले स्त्री अवयव या नारायण ब्राह्मणाला दान कर आणी आपली वाट मोकळी कर.
राधाबाई ओशाळून,लाजून स्वामी वाक्याचं गांभीर्य न समझता परतते
घरी आल्यावर तिला जाणीव होते कि तिचे स्त्री अवयव नाहीसे झाले आहे.
ती स्वामींची करुणा भाकते-"स्वामी क्षमा करा "
स्वामी तिथे प्रगत होतात आणी म्हणतात-
राधे सुंदर शरीराचं समाधान असावं, अहंकार नाही.
सोंदर्य आज आहे उद्या नाही,पण भक्ती चीर काळ टिकते.
शारीर सोंदर्य देवाचे वरदान पण मनाचे सोंदर्य ही स्वताची कमाई असते.
चार दिवसाच्या लावण्यावर किती काळ लोकांना भूलवेल,सुरकुत्या पडल्यावर सर्वलोकं पाठ फिरवेल.
मनाच्या सोन्दार्यांनी देवभक्ती केली तर देव सावळी सारखा आजन्म रक्षण करेल
राधाबाई वचन देते-आता नृत्य-गायन कलेचा उपयोग फक्त देव-भक्ती साठी करीन.
वचन दिल्यावर तिला तिचे नाहीसे झालेले अवयव पुन: प्राप्त होतात.
बोध: सद्गुरूची सत्व परीक्षा पाहू नये.
No comments:
Post a Comment