Saturday, October 2, 2010

(6) गोसाव्याची मनोकामना

स्वामी निद्रेत असतात आणी  बाळप्पा त्यांचे पाय चेपत असतात, तितक्यात स्वामी एकदम जागे होऊन लोण्याची मागणी करतात.
लोणी खाऊन संतुष्ट भावानी स्वामी बाळप्पाला भक्तीचा अर्थ विचारतात.
बाळप्पा प्रांजळपणानी स्वामीवरच  तो प्रश्न  फिरवतात.
स्वामी म्हणतात: "भक्ती म्हणझे ईश्वराला वाहून जाणे.आयुष्य आपले नसून ईश्वराचे असं मानुन,तन मन आणि धनानि केलेलं समर्पण
म्हणझे भक्ती."
तिकडे एक गोसावी जलोधर रोगांनी ग्रस्त होता.त्या रोगामुळे त्याच्या पोटात सदेव कळा निघायच्या.
पण त्याची द्वारकेला जाऊन द्वारकानाथाचे दर्शन करावे अशी तीव्र इच्छा होती,
गोसावी मृत्यू आधी द्वारकेला जाऊन कृष्ण दर्शन करू,असा निश्चय करतो.गोसावी पोटदुखीच्या मर्मान्तक वेदना सहन करत द्वाराकेसाठी  निघतो.

द्वारकेला जातांना रात्री  स्वामी, संन्यासाच्या रुपात  गोसाव्याला स्वप्नात दृष्टांत देऊन अक्कलकोटला बोलवतात.
गोसावी थोडा विचार करून अक्कलकोटला येतो.
स्वामी त्याला पाहिल्याबरोबर विचारतात-"क्यो द्वारका जा रहे थे ना?यहा अक्कलकोट कैसे पहुचे?
गोसावी विस्मित होतो.
स्वामी म्हणतात: हमने ही बुलाया था! खऱ्या भक्ताची तळमळ जाणल्या शिवाय  आम्ही कशे राहणार?
गोसाव्याला स्वामींच्या जागी द्वारकानाथ कृष्णाचे दर्शन होतात. गोसावी धन्य होतो, तो स्वामींना रणछोडदास इत्यादी नावानी संबोधित करतो.
गोसावी म्हणतो: माझी इच्छा पूर्ण झाली आहे,आता देवाज्ञा झाली तरी काही हरकत नाही.
स्वामी म्हणतात: ती वेळ अजून आली नाही आहे. मग गोसाव्याला एका झाडाचा पाला देऊन म्हणतात-
"हा पाला रोज वाटून खात जा"
काही दिवसांनी गोसावी येउण पूर्ण रोग मुक्त झालो अशी स्वामींना सूचना देतो.
स्वामी  म्हणतात-'अनन्य भाव भक्ती असलेल्या शिष्याची मनोकामना आम्हाला पूर्ण करावीच लागते.
ज्याची भक्ती पक्व दिशेला गेलेली असते त्याची कामना गुरु पूर्ण करतोच.

No comments:

Post a Comment