Saturday, October 2, 2010

(14) चोरांपासून सावध राहा


गोपाळशेट स्वामींचा शिष्य होता. तो वृत्तींनी अगदी कनवाळू होता.त्याच्याकडे एक दिवस एक व्यक्ती येवून खूब गया-वया करून नौकरी मागतो. तो आपलं नाव सदा आणि गावाचं नाव सातुर्डा सांगतो.
सह्रदय गोपाळशेटकाही तपास न करता, त्याला घर-गडी म्हणून ठेवतो.
बायको विरोध करते-"हा माणूस ठीक वाटत नाही!"
गोपाळशेट तिच्या म्हणण्यावर दुर्लक्ष्य करतो.
तिकडे स्वामींना भेटायला ब्रह्मचारी बुवा येतात.
ते स्वामीसुतांच्या मुंबई मठातून आलेले असतात.
आपल्या हातानी अन्न शिजवून स्वामींना अर्पण करायची इच्छा प्रकट करतात.
स्वामी अनुमती देतात पण बजावतात "चोरांपासून सावध राहा."
तिकडे गोपाळशेटची बायको सदा बद्दल तक्रार करते,
" त्याचं कामात लक्ष्य नाही!".
"तो एकही काम नीट करत नाही!"
"सदा ची नजर इकडे तिकडे फिरते"-असं सांगते.
गोपाळशेट १०० रु देवून सदा कडून वाण सामान मागवतात.त्याच्या मागे बाबू नावाचा आपला दुसरा गाडी पाठवतात.
सदा व्यवस्थितपणे सर्व सामान आणून देतो,बाबुही बरी खबर देतो.
"आपली सर्व चिंता स्वामी पाहतात' असं म्हणून गोपाळशेट सदाबद्दल निश्चित होतात.
तिकडे ब्रह्मचारी बुवा स्वयंपाकाची तैयारी करतात, आमटीत टाकायला गुळ नाही म्हणून लखूला बाजारात धाडण्यात येतं.
स्वामी अगदी केविळवाण्या शब्दात म्हणतात-" लखू गुळ खातोssss ! आम्हाला देत नाहीss!"
कुणालाही काही उलघडा होत नाही. शेवटी गुळ आणायला पाठवलेल्या लखूला पाहायला दुसरा भक्त जातो.
पाहिलं तर लखू खरच गुळ खात होता.
लखू स्वामींची माफी मागतो. ताजा गुळ पाहून खावासा वाटला म्हणून ही चूक झाली असं सांगतो.
स्वामी :"लखू भगवंताला सर्व माहित असतं. "
"काही पाहिझे तर मागावं पण चोरून खायचं नाही."
लखू मान्य करतो.
तिकडे गोपालशेटचा मित्र-सावकार उधार घेतलेले २००० रु परत करतो.सदा हे सर्व पाहत असतो.
थोड्यावेळानी गोपाळशेट पाहतात तर कपाटात ठेवलेले २००० रु तिथे नसतात.
सदाला आवाज दिल्यावरपण सदा येत नाही त्यावरून कळतं की हे सदाचेच काम आहे.
गोपाळशेट म्हणतात:-"पैशांची काळजी नाही, स्वामी कृपेनी गडगंज पैसा आहे,प्रश्न विश्वासघाताचा,मला सदाला जाब विचारायचा आहे."
गोपाळशेट स्वामींची प्रार्थना करून सदाला शोधण्यात यश मागतात.
तिकडे स्वामी म्हणता- "बैल गेला आणि झोपा गेला" आता स्वामी-स्वामी कशाला करतात.
बायको करवी कितीवेळा सावध केलं पण ऐकलं नाही.
मग म्हणतात; सदाला शोधायला हवं.
सदा पैशे घेऊन फार दूर निघून जातो. त्या पैशांनी आपण एक जमीन घेऊन भव्य घर बांधु,असा विचार करतो.

तळाटी त्याला इंद्रजीत नावाच्या व्यक्तीची जमीनी बद्दल सांगतो, वरून सांगतो कि त्या जमिनीत खजिना दडला आहे.

सदा ती जमीन घेण्याच मन बनवतो.

तिकडे गोपाळशेट एका शिपायाला घेऊन सदाच्या गावात येतो. तिथे त्याला कळतं कि त्या गावात सदा नावाचा कोणी माणूस नाही.

गोपाळशेट मनोमन स्वामींची प्रार्थना करतो-"स्वामी मदत करा!"

अक्कलकोटला स्वामी म्हणतात: "मदत हवी आहे! ठीक आहे ,प्रयत्न सुरु ठेव,तुझे प्रयत्न तुला आमच्या पर्यंत आणणार."

इकडे सदा त्या जमीनी पर्यत पोचतो.त्या जमीनीची राखणदार म्हातारी बाई त्याला तालुक्यातल्या गावात इंद्रजीत चा पत्ता सांगते.

गावात इंद्रजीत सासुरवाडी ला आहे, असं कळतं.

सदा इंद्रजीतचं सासुरवाड गाठतो. तिथे त्याला कळतं कि इंद्रजीत आपली बायको आणि नूतन पुत्राला घेऊन अक्कलकोटला स्वामी दर्शनाला गेला आहे. सदाला प्रश्न पडतो,पण जमीन म्हणझे आपल भवितव्य, असं म्हणून तो अक्कलकोटला जायचं ठरवतो.

स्वामींनी आपल्याला चोरी करतांना पाहीले नाही असा विचार करून तो अक्कलकोटला जातो.

इकडे गोपाळशेटला कळतं कि सदानी आपलं खर नाँव सांगितलं नसावं, आता सर्व प्रश्नांचे उत्तर स्वामी चरणीच मिळेल, असा विचार करून गोपाळशेट अक्कलकोटला जायचं ठरवतो.

गोपाळशेट अक्कलकोटला जावून स्वामींना सर्व वृतांत सांगतो.

स्वामी म्हणतात-" ठावूक आहे मला! हजार वेळा सावध केलं तरी तू गाफील राहिला."

“जा कोपऱ्यात जावून उभा राहा.”

गोपाळशेट आज्ञेचं पालन करतो.

थोड्यावेळानी सदा येऊन स्वामींना इंद्रजीत बद्दल विचारतो.

स्वामी म्हणतात: "काय रे आला? इंद्रजीत ला भेटून जमीन विकत घेणार?"

"त्याआधी एकाला भेट. बघ ओळखतो का?"

"गोपाळा ये!"

गोपाळशेट येतात.

स्वामी सदा ला म्हणतात- "काय रे बघ इंद्रजीत, ओळखतो का?"

"चांगुलपणा दाखवणाऱ्या माणसाच्या विश्वासाला तडा देतो?"

"दे त्याला त्याचे पैशे" सदा आज्ञेचं पालन करतो.
सदा: "स्वामी आपल्याला सगळं माहीत आहे माफ करा."

स्वामी म्हणतात-"चूक मार्गांनी कमवलेले पैशे तात्पुरते कामास येतात ,आयुष्याचा निर्वाह कष्टानी कमवलेल्या पैशानीच होतो."

"पैशे स्वकर्तुत्वानी कमवावे. बुद्धीचा चांगला उपयोग करा,दुसऱ्याला फसवू नका."

"सदा, शेवटची संधी आहे."

सदा म्हणतो-"स्वामी चुकलो मी. मी सुधारीन स्वताला, आपण माझ्यासारख्या चोरावर दया दाखवली."

स्वामी म्हणतात-"गोपाळा तू भला आहे पण वाहत जातो."

"चांगुलपणा करावा पण माणसाची पारख करता यावी."

"चांगुलपणा चाणाक्ष्यपणे करावा,आपल्या मदतीचा कोणी गैर फायदा घेऊ नये याची काळजी घ्यावी."

 

No comments:

Post a Comment