Saturday, October 23, 2010

(31) गादी आणी पाषण एकसमान

पुराणिकबुवा नावाजलेले प्रबोधनकार होते. त्यांना आपल्या ज्ञानाचा फार अभिमान होता.
एकदा ते अक्कलकोटला येतात. आपलं ज्ञान अफाट आहे, अशी स्वामींना  प्रचीती यावी, असं त्यांची  इच्छा होती .
स्वामी स्वताहून, त्यांना आमच्या समोर कीर्तन करा असं निमंत्रण देतात.
पुराणिक बुवा कीर्तन सुरु करतात:-
"मानव जीवनात चार पुरूषार्थ असतात- 'धर्म अर्थ काम मोक्ष'
यात मोक्षाचं महत्व फार असतं. कारण मोक्षच आपल्याला जन्म-मरणाच्या फेऱ्यातून सोडवतो.
मोक्ष प्राप्त करायला संतान असावी लागते.
"निपुत्रीको गतीर्नास्ती " या शास्त्र वचना प्रमाणे निपुत्रीकाला गती मिळत नाही."

स्वामी एकदम संतापून भडकतात-"बंद कर तुझी वटवट!
"अरे अशे असत्य वचन सांगून तु लोकांची दिशाभूल करत आहे."
"अरे नारद,शुकाचार्य,भीष्माचार्य हे सर्व निपुत्रिक होते,यांना काय उत्तम गती मिळाली नाही?"
"अरे तुझ्या कीर्तनानी लोकं देव मार्गावर जायच्या ऐवजी पुत्र प्राप्तीलाच आपलं ध्येय समाझेल."
"अरे ज्याचं वर्तनच वाईट आहे,पण अनेक पुत्र आहे,त्याला काय गती मिळणार?"
"अरे मोक्ष मिळतो तो अनन्य भावांनी ईश्वर भक्ती करणाऱ्यांना ,सदाचरण आचारणाऱ्यांना,
परोपकार करणाऱ्यांना."
"आमचीच चूक झाली जे आम्ही तुला इथे बोलावलं."
कीर्तन बंद पडतं. पुराणिक बुवा संतापतात.
दुसऱ्या दिवशी पुराणिक बुवा स्वामींना  जाब विचारायला येतात.
स्वामी निद्राग्रस्त असतात. स्वामींना मऊ-मऊ गादी वर झोपलेले पाहून पुराणिक बुवांना
प्रश्न पडतो, स्वामी सन्यासी असून गादी वर कशे काय झोपतात?
पुन्हा कधी तरी स्वामींना गाठू आणी त्याचं पाखंड उजागर करू अश्या बेतांनी पुराणिक बुवा परततात.
दुसऱ्या दिवशी पुराणिक पुन्हा येतात,तेव्हा स्वामी कुठे जायच्या तयारीत असतात.
पुराणिक  म्हणतात-"मला तुम्हाला काही विचारायचं आहे."
स्वामी म्हणतात:- "आम्हाला वेळ नाही. आम्ही शेजारच्या गावातल्या टेकरीवरच्या देऊळात जात आहे."
पुराणिक बुवा पण बरोबर येतात.त्या दिवसात फार थंडी पडली होती.
टेकडीच्या पायथ्याशी पोहचता-पोहचता रात्र होते.
पुराणिक बुवा फार दमतात, त्यावर हाडं गारठेल अशी थंडी त्यांना बेजार करुन टाकते.
ते स्वामींना गावात कुठेतरी मुक्काम करू असं सांगतात.
स्वामी म्हणतात -
"आम्ही कुठेच जाणार नाही वाटल्यास इथे विश्रांती  घेऊ."
पुराणिक एकटेच गावा कडे जायला पाहतात पण वन्य श्वापदांच्या  भयानी ते जाऊ शकत नाही.
ते स्वामी कडे परत येतात.
स्वामी एका खडकावर निर्विकारपणे विश्रांती घेतात.
स्वामी म्हणतात:- "पुराणिक किती वेळ असं उभ राहणार , त्या दुसऱ्या खडकावर जाऊन विश्रांती घे."
पुराणिक त्या खडकाला स्पर्श करुन पाहतात, तो खडक थंडी मुळे बर्फाच्या शिळे
सारखा जाणवतो.
पुराणिक बुवा मनात विचार करतात:-" मला अंगभर कपडे घालुन पण थंडी झोंबून
राह्यली आहे आणी स्वामी एका लंगोटी वर बर्फा सारख्या शिळे वर विश्रांती घेत आहे.
पुराणिक बुवा म्हणतात :- "अहो एवढ्या थंड शिळे वर तुम्ही अशे निर्विघ्न  कशे झोपू शकतात?"
स्वामी म्हणतात:-" अरे आम्ही संन्याशी! आम्हाला खडका वरंच झोपलं पाहिजे, मऊ-मऊ गादी वर कशाला झोपायचं?
पुराणिक बुवांना स्वामी अंतरज्ञानी असल्याची प्रचीती येते.
ते स्वामींच्या शरणी येतात.
"स्वामी तुम्ही असामान्य आहा. तुम्ही देवाचे अवतार आहा .मीच तुम्हाला ओळखण्यात चूक केली.
मला क्षमा करा."
स्वामी प्रेमळ शब्दात म्हणतात:-" आम्हाला ओळखण्यात खूब उशीर  केला  पुराणिक ..!"
"अरे आम्हाला माहित आहे, तु विद्वान आहे, पण नुसती विद्वत्ता उपयोगी येत नाही."
"त्याबरोबर श्रद्धा आणी विश्वास पण पाहिजे."
"ज्याच्या ठायी हे असतात त्याचं हृदय निर्मल होतं."
"आणी अश्या निर्मल हृदयातच ईश्वर विसाव्यासाठी येतो."
पुराणिकबुवा प्रांजळ पणे स्वीकृती देतात.

No comments:

Post a Comment