Saturday, October 9, 2010

(23) लग्नाचे लाडु

जमुना नावाची एक देखणी तरुणी स्वामींची भक्त होती. ती उपवर झाल्यामुळे तिचे
आई-वडील तिच्या विवाहासाठी काळजीत होते.
जमुनेचे वडील तिच्या लग्नाबद्दलच्या मार्गदर्शनासाठी स्वामींशी भेटतात.
स्वामी म्हणतात:- "काळजी करू नको, आम्ही तिच्या साठी खंडू ला नेमलं आहे."
जमुनेचे वडील चिंता मुक्त होऊन घरी येतात.
जमुना आपल्या मैत्रिणी बरोबर येताना, रस्त्यात एक पालखी  आणी काही शिपाई पाहते.
तितक्यात एक वृद्धव्यक्ती येतो आणी त्या शिपायांना आपल्याला
पालखीत बसवून वैद्यांकडे सोडा , अशी विनंती करतो.
शिपाई सांगतात कि ही पालखी बडोद्याच्या राजा खंडेरावाची आहे, आम्ही तुम्हाला बसवु शकत नाही.
वृद्ध माणूस गया-वया करुन पालखीत शिरायचा प्रयत्न करतो तेव्हा ते शिपाई त्याला ढकलून देतात.
जमुना त्या वृद्ध व्यक्तीला पडण्या-पासुन सांभाळते आणी त्या शिपायांना जाब विचारते.
तितक्यात एक ब्राह्मण माणूस येतो आणी शिपायांना त्या वृद्ध माणसाला पालखीत बसवा
असं सांगतो.
जमुनेला तो आपल नाव मंगेश आणी आपण महाराजांच्या मर्जीचा सेवक आहे, असं सांगतो.
पालखीतून वृद्ध आजोबांना वैद्याकडे सोडण्यात येतं. रस्त्यात मंगेश आणी जमुनेची नेत्र-पल्लवी होते.
ते दोघे मनो -मन एकमेकाला हृदय देतात.
प्रत्यक्षात मंगेश सेवक नसून खुद्द राजा खंडेराव असतो आणी राष्ट विरोधी हेरांना अटक करायला
वेश पालटून फिरत असतो.
जमुना मंगेशचा विचार करत घरी परतते.
घरी तिला कळतं कि स्वामींनी तिच्या विवाहासाठी कोणी खंडू नावाचा व्यक्ती नेमला आहे.
स्वामी सर्वोपरी असं मानुन ती मंगेशला विसरायचं ठरवते.
तिच्या मनात एकच खंत असतो कि स्वामींनी आपल्या मनाविरुद्ध वराची निवड का केली.
इकडे वृद्ध आजोबा मंगेशला गाठतात आणी म्हणतात:- "मुलीच्या घरी जाऊन मागणी घाला खंडेराव !"
आपलं खरं नाव आजोबांना कसं माहित झालं , म्हणून खंडेराव दचकतो.
"आम्हाला सर्व माहित असतं!", अस म्हणून आजोबा तिथून निघतात.
खंडेराव जमुनेच्या घरी तिच्या साठी मागणी पाठवतो.
पण जमुना आपल्या मनात दुसरा कोणी आहे, असं सांगून नकार देते.
स्वामींनी आपल्या मनात असलेल्या वर गाठून का नाही दिला, या बद्दल खुलासा करायला
जमुना स्वामींकडे जाते.
तिथे तिला स्वामी भेटत नाही पण तेच वृद्ध आजोबा भेटतात.

ते जमुनेला सांगतात-" स्वामींवर विश्वास आहे ना? मग स्वामींनी सांगितलं तसं कर."
जमुना घरी परतते तर तिला तिचा मंगेश राजसी वस्त्रात आलेला दिसतो.
जमुनेचे वडील हेच खंडेराव महाराज म्हणून ओळख करुन देतात .
जमुना विचारते- "तुम्ही आपली ओळख का लपवली?"
खंडेराव सांगतात - "ती वेळेची मागणी होती, त्या वेळेला मी  हेरांना शोधायच्या कामगिरीवर होता."
"त्या शिवाय जर मी  खरी ओळख दिली असती तर तु अंतर ठेऊन वागली असती."
जमुना म्हणते-" मी  स्वामींवर अविश्वास केला, मी स्वामींची माफी मागायला जाते."
जमुनेचे वडील म्हणतात- "आपण सर्वच स्वामींकडे जाऊन त्यांचा आशीर्वाद घेऊ."
सर्व स्वामींकडे जातात.
स्वामी म्हणतात- " काय जमुने! झालं ना मनासारखं! आमच्यावर  अविश्वास दाखवला! "
"अरे परमेश्वरावर विश्वास पाहिजे कि परमेश्वर जे करतो ते चांगलच करतो."
"तुझी आणी खंडेरावाची भेट आम्हीच घडवली होती. ही सर्व आमचीच रचना होती."
"नीट पहा आम्हाला."
 स्वामींच्या जागी त्यांना तेच वृद्ध आजोबा दिसतात.
सर्व स्वामींच्या चरणी मस्तक नमवतात.
स्वामी भावी जोडप्याला आशीर्वाद देतात.




No comments:

Post a Comment