Saturday, October 2, 2010

(15) आवाळू पासून सुटका


भीमराव नावाचा एक गृहस्थाच्या डोक्यावर एक आवाळू ( मोठ्ठा फोड ) झाला होता. त्यामुळे गावातले सर्व लोक त्याचा तिरस्कार करायचे,त्याचा अपमान करायचे.लहान मुले तर त्याला दगडं मारून ह्कलायचे.
ह्या सर्व प्रकाराला कंटाळून भीमरावाची बायको सुद्धा त्याला सोडून जाते,पण त्याचा छोटा मुलगा मात्र त्याचा बरोबर राहतो.
पिता-पुत्र दोन्ही स्वामींच्या शरणी जायचं ठरवतात, तिथे स्वामींचे काही भक्त सुद्धा चेष्टा करतात पण चोळप्पा त्यांना दम भरून भीमरावाची भेट स्वामींशी घडवून देतो.
भीमराव स्वामींना आपलं सर्व घाराणं सांगतो.स्वामी त्याला आपल्या सेवेत राहा असं सांगतात.
एकदा स्वामींसाठी फुल तोडतांना, सुंदराबाई खोटी आपुलकी दाखवून पैशे उकळायचा प्रयत्न करते, पण भीमरावाकडे पैशे नसल्यानी,उलटे बोल बोलून जाते.
इकडे स्वामी कडे फुलं नेल्यावर स्वामी "दोन डोक्याचा माणूस !" असं म्हणून चेष्टा करतात.चोळप्पाला वगळून सर्व शिष्य हसतात.
रात्री खोलीमध्ये भीमराव रडतो. जगानी आपली चेष्टा केली ,पण आज स्वामींनी पण आपली चेष्टा केली,त्याचा मुलगा त्याची समझ घालतो कि स्वामी आजोबा नक्की कृपा करतील.
स्वामी रात्री भीमरावाच्या खोलीत प्रगट होतात.भीमराव पाया पडतो.
स्वामी म्हणतात:"रागावलास आमच्यावर?इतना भी नाही कर सकते?"
"गुरु मानतो ना? थोडीशी मसखरीच इतकं वाईट वाटलं ?"
"लोकं उपहास करतात कारण त्यांची ही प्रवृत्ती असते."
"दुखी व्हायचं नाही.सगळं ठीक होईल.आम्हाला गुरु मानतो आणी आवाळूला घाबरतो?"
"संकटांचा धेर्यानी सामना करायचा असतो."
असं म्हणून स्वामी भीमरावावर ध्यान केंद्रित करतात. आवाळू गळून पडतो.
भीमराव खड्कन जागा होतो. उठल्यावर त्याला कळतं कि हे सर्व स्वप्न होतं.
त्याचा मुलगा पण जागा होतो.
तो ओरडून म्हणतो -"बाबा तुम्ही बरे झाला! स्वामींनी जादू केली!."
भीमराव चाचपून पाहतो तेव्हा त्याला प्रचीती येते कि तो खरा-खुरा बरा झाला आहे.
भीमराव स्वामींच्या जवळ येऊन त्यांच्या चरणी मस्तक ठेवतो.स्वामी तुम्ही मला रोगमुक्त केलं.
स्वामी म्हणतात: "आता हसतो !थोडंस काय बोललो, तेव्हा............?
भीमराव प्रांजळपणे म्हणतो- "मी अज्ञ आहे."
स्वामी म्हणतात:"तू अज्ञ असला तरी तुझा मुलगा सुज्ञ आहे."
भीमरावा चा मुलगा म्हणतो-"स्वामी तुम्ही मोट्ठे जादुगार आहास."
भीमराव: "आपले चरण सदा हृदयात राहावे"; अशी विनंती करतो, स्वामी स्मित हास्य करून ते मान्य करतात.

No comments:

Post a Comment