Thursday, October 7, 2010

(21) गोष्ट नवरोजीची

बरजोरजी नावाचा एक पारशी गृहस्थ स्वामी भक्त होता.
तो अक्कलकोटचा मामलेदार पण होता.
स्वामी त्याला बोध देतात:- " लोकांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे! "
मग, तुझ्या कडे कोणी येणार आहे असं म्हणून त्याला घरी परतवतात.
बरजोरजी कडे, नवरोजी नावाचा त्याचा एक स्नेही येतो.
त्याला, 'बरजोरजी इतका स्वामींचा अनन्य भक्त का आहे?', असा प्रश्न पडतो.
बरजोरजी त्याला स्वामीलीलां बद्दल सांगतो तरी नवरोजीला पटत नाही.
वैतागून बरजोरजी त्याला म्हणतो-" अरे तु आपल्या मध्ये का अविश्वासाची भिंत बांधतो आहे?"
तितक्यात स्वामी तिथे प्रगट होतात आणी म्हणतात-"आम्ही ती भिंत पाडू ! "
सर्व दारं-खिडक्या बंद असतांना स्वामी आत कशे आले याचं नवरोजीला आश्चर्य होतं.
स्वामी म्हणतात:- "आम्ही चैतन्य आहो! आम्हाला दारं-खिडक्या अडवू शकत नाही, फक्त भक्तांचं हृदय कपाट उघडं
पाहिजे."
नवरोजीला स्वामींचं सामर्थ्य कळतं, तो पाया पडतो.
नवरोजी म्हणतो- "मला अफाट कर्ज झालं आहे, ते फिटेल का? "
स्वामी म्हणतात-" फिटेल! पण आम्हाला काय देईल ?"
नवरोजी एक-चथुर्थांश द्यायचं कबुल करतो.
स्वामी त्याला 'गुजरातला जा' असं सांगून गुप्त होतात.
एवढ्या मोठ्या गुजरात मध्ये कुठे जावे, हा नवारोजीला प्रश्न पडतो.
तितक्यात बडोदा-नरेश मल्हारराव गायकवाड, यांचा शिपाई येऊन नवारोजीला मल्हाररावां कडे घेऊन जातो.
मल्हारराव त्याला रु १५,००० देऊन एक कामगिरी सोपवतात कि स्वामींना बडोद्याला घेऊन यायचं.
त्यांना आणलं तर जहागिरी पण देऊ.
'प्रयत्न करीन पण यशा बद्दल सांगू शकत नाही', असं  नवरोजी उत्तर देतो.
मल्हारराव कबुल करतात.
त्या पैश्यांनी नवरोजी आपलं कर्ज फेडून शिल्लक रकम स्वामी चरणी ठेवतो व त्यांना मल्हारराव यांचा निरोप सांगतो.
स्वामी म्हणतात -"उचल ते पैशे! आम्हाला पैशाची नाही तुझ्या सारख्या भक्तांची गरज आहे."
"आम्ही अक्कलकोट सोडून कुठेही जाणार नाही."
नवरोजी म्हणतो आपण धन्य आहा , आपल्यामुळे मी  कर्जमुक्त झालो.

No comments:

Post a Comment