गोविंद, सदा आणी राघव, हे स्वामींचे अनन्य भक्त होते.
तिघेही जन सरकारी नौकर होते.
बैरामजी नावाचा एक तालुकेदार त्यांचा वरीष्ठ अधिकारी होता.
स्वामी दर्शनासाठी तो त्यांना कधीच सुट्टी देत नव्हता, उलट तो त्यांना स्वामी पासुन परावृत्त करण्याचा प्रयत्न
करायचा.
एकदा स्वामी त्यांचा गावाला येतात, तिघेही मित्र बैरामजीला न विचारता स्वामी दर्शनाला जातात.
बैरामजीची फार रागावतो आणी त्यांच्यावर अर्थदंड ठोकतो.
तिघेही मित्र स्पष्ट विरोध करतात.
बैरामजी नौकरी वरून काढण्याची धमकी देतो.तिन्ही मित्र नौकरी सोडून स्वामीसेवेत दिवस काढु असं सांगतात.
पण त्या तिघांसारखे मेहनती आणी ईमानदार कारकुन मिळणार नाही म्हणुन बैरामजी माघार घेतो.
शेवटी तिघेही मित्र बैरामजीला स्वामी दर्शनाला तैयार करतात.
स्वामी बैरामजीला रोखून पहातात, बैरामजी स्वामी चरणी पडतो.
मग स्वामी त्याचे कृष्ण-कृत्य उघडकीस आणतात- " तु गोर-गरीबांना लुटतो,तु व्यसनी आणी बाहेरख्याली आहे!"
"तु प्रपंच सुद्धा नीट करत नाही."
बैरामजी शरणागती पत्करतो.
मग बैरामजी प्रांजळ स्वरात म्हणतो-"तुमच्या मुळे माझ्या हातून आजपासून पापं
होणार नाही!"
स्वामी मग उपदेश करतात-"स्वतासाठी दुसऱ्यांना त्रास देऊ नको. "
"आपलं मत दुसऱ्यांवर लाडू नको."
"सद्वर्तन कर."
"निस्सीम भक्ती सदैव पावते."
" आपला देह दुसऱ्यांची सेवेसाठी लाव. "
"निंदा द्वेष नको करू. "
No comments:
Post a Comment