Saturday, October 2, 2010

(3) मला ब्रह्म दाखवा

विष्णू बुवा ब्रह्मचारी हे वेद-पुराण संपन्न प्रकांड विद्वान होते. चार वेद सहा पुराण जाणुनही आपल्याला ब्रह्म
भेटला नाही,याचा त्यांना खंत होता.
एकदिवस ते वैतागून मंदिरात जातात, तिथे ब्रह्म दर्शन करीन किंवा प्राण त्यागीन, असा हट्ट धरून सतत घंटानाद
करतात.
योग-योगानी  बाळप्पा तिथे येतात आणी विष्णू बुवांची समझ घालुन त्यांना स्वामी कडे नेतात.
विष्णू बुवा सरळ स्वामींना,'ब्रह्म दाखवा ' असा आग्रह करतात.
स्वामी त्यांच्या कडे जाम दुर्लक्ष करतात आणी निद्रालीन होतात.
विष्णुबुवा याला आपला अपमान समझतात आणी स्वामींना दुषण देऊन परततात.
इकडे चोळप्पाच्या विरुद्ध सुंदराबाई, तक्रार नोंदवते कि चोळप्पा स्वामी सेवेसाठी मिळणाऱ्या मेहतान्याचा
उपयोग स्वता साठी करतो.
राणी सरकारच्या आदेशानुसार शिपाई चोलाप्पाच्या घराची झडती घ्यायला येतात.
चोळप्पाच्या  पत्नीनी स्वामी सेवेसाठी मिळणाऱ्या रकमेतली शिल्लक उरलेली रकम जमवून एका डब्यात 
ठेवलेली असते.
पण तिचा उद्देश ठाम असतो कि ही रकम  अडल्या-नडल्या वेळेला स्वामी सेवेसाठीच खर्च करायची.
झडती घेणाऱ्यांचा हाती तो डब्बा लागतो, चोळप्पाची  पत्नी डोळे मिटुन स्वामींची करुणा भाकते.
स्वामी कृपेनी डब्यातले पैशे नाहीशे होतात आणी झडती घेणारे रिकामे परततात.
इकडे स्वामी  म्हणतात-" अरे तुमचा उद्देश निर्दोष असतांना मी  तुम्ही निष्पाप लोकांना कशी शिक्षा होऊ देणार?"
विष्णू बुवा झोपले  असतांना त्यांना स्वप्नात, शरीरावर शेकडो विंचू फिरतांना दिसतात, त्यातला एकही विंचू
चावेल या भितीनी ते कासावीस होतात.
जाग आल्यावर सुद्धा त्यांच्या मनावर स्वप्नाच दडपण असतं.
इकडे बाळप्पाला स्वामी सांगतात-"अरे प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते, त्या आधी बोलण्यात काही अर्थ नसतो."
"म्हणून आम्ही विष्णूबुवांच्या प्रश्नाचं उत्तर नाही दिले."
स्वामी सुन्दराबाईला समझ देतात-" जो पर्यंत आम्ही ज्याचं राखण करतो तो पर्यंत कोणीही त्याचं वाकडं करू शकत
नाही."
"काही कारणांनी आम्ही तुझ्या कारस्थानांवर दुर्लक्ष्य करतो याचा अर्थ हा नाही कि आम्ही आपल्या लेकराचं रक्षण
करणार नाही."
इकडे विष्णुबुवा तडका-फडकीनी स्वामी कडे येऊ विचारतात-:" ब्रह्म तदाकार वृत्ती याचा अर्थ काय आहे?
"मला ब्रह्म दाखवा."
स्वामी ओरडतात- " मोठा आला ब्रह्म पाहणारा, काल स्वप्नात विंचू चावेल या भितीनी घाबरणारा तु,
ब्रह्म पहायला निघाला आहे!"
आपल्याला पडलेल्या स्वप्नाची जाणीव स्वामींना आहे, हे कळल्यावर  विष्णूबुवांना स्वामींच्या  अधिकाराची
 प्रचीती येते.
ते स्वामी चरणी लीन होऊन क्षमा मागतात.
स्वामी आपली उशी देऊन तिला कानाला स्पर्श कर असं सांगतात.
स्वामींच्या उशीचा स्पर्श झाल्या बरोबर विष्णूबुवांना ब्रह्म साक्षात्कार घडतो, ते आनंदानी डोलु लागतात.
बोध :स्वताची जो पर्यंत पात्रता नसते तो पर्यंत ईश्वर दर्शनाचा हट्ट धरून कोणताही अतिरेक करू नये.

No comments:

Post a Comment