Saturday, October 2, 2010

(7) रोगापासुन मुक्ती


शंकरराव नावाचा एक गृहस्थ क्षय रोगा मुळे बेजार झाला होता. वैद्यांच औषध सुद्धा लागू होत नव्हतं. स्वामींना अंतरज्ञानांनी हे कळतं.इकडे वैद्य बुवा शंकररावांना गाणगापुरास जायला सांगतात.
स्वामी शंकररावांना स्वप्नात दृष्टांत देऊन ,अक्कलकोटास यायला सांगतात.
पण शंकरराव विभिन्न विकल्प काढून, तर्क-कुतर्क करून अक्कलकोटास यायला तयार नसतो. पण शेवटी आपल्या पत्नींच्या आग्रहाखातर अक्कलकोटास यायला तयार होतो.
स्वामी त्याला पाहिल्या बरोबर रागावतात."विश्वास नाही तरी का आला?" ,असं म्हणून परतायला सांगतात.
निराश शंकराव पत्नी सह परततो. वाटेत सुंदराबाई त्यांना अडवते, आपण स्वामींना म्हणून रोग बरा करवीन, अशी हामी देते.त्याबद्दल ती २०००रु. ची मागणी करते.
शंकरराव १०,००० रु द्यायला तयार होतो.
स्वामी शंकररावांना मुसलमान लोकांच्या कब्रीस्तानात बरोबर घेऊन जातात. कब्रीस्तानात का आणलं म्हणून ,शंकरराव दचकतात ,सुंदराबाई शंका काढतात.
तितक्यात स्वामी तिथे बिछावलेल्या फुलांच्या शय्येवर झोपतात. बाळप्पा शंकरारावना तुमचा रोग संपला असं सांगतात.इकडे शंकररावांना पण प्रचीती येते.
स्वामी तत्काळ उठून शंकरावना, शंका गेली का असं विचारतात.
मग स्वामी शंकररावांना तीन गोष्टी करायला सांगतात. पहिली फकीराना अन्नदान. दुसरी एका अधिकारी मुस्लीम व्यक्ती च्या समाधीवर फुलमाळा चढवायला .तिसरी कडू लिंबाच्या पाल्यात मिरे घालून खायला सांगतात.
इकडे शंकर राव, सुंदर बाईला दिलेलं वचन म्हणून स्वामींना १०,००० रु द्यायला जातो. चोळप्पा व सुंदराबाई तो पैसा आपल्याला मिळावं असं म्हणून पाहतात.
पण स्वामी शंकररावाला त्या पैशानी एक मठ गावाबाहेर बांधायला सांगतात.
शंकराव गावात मठ बांधायला म्हणतो पण स्वामी कटाक्षांनी त्याला गावाबाहेर राम मंदिराजवळ मठ बांधायला सांगतात.
बोध: या जन्मी माणसाचा सद्गुरू वर विश्वास नसला तरी पूर्व जन्मांच्या पुण्याईनी सद्गुरू स्वता होवून भक्तांचे संकट दूर करतो.

No comments:

Post a Comment