Friday, October 8, 2010

(22) स्वामींची साक्ष

गोपाळ त्रिवेदी आणी त्याची पत्नी लीला, हे एक हिंदी-भाषी जोडपं होतं.
दोघांची प्रभू श्रीरामावर अटल श्रद्धा होती.
चार-धाम यात्रेला जायच्या पूर्वी ते आपली सर्व पुंजी , गावाच्या एक प्रतिष्ठित व्यक्ती, राम जोशी कडे ठेवतात.
राम जोशी नामांकित आहे, शिवाय त्याचं नाव राम असल्यानी ते काही कागद पत्र न करता
आपली पुंजी त्याच्याकडे ठेवतात.
स्वामींना अंतरज्ञानांनी हे सर्व कळतं, ते आपल्या शिष्यांना म्हणतात -"प्रपंच असो किंवा परमार्थ
मनुष्यांनी सावध राहिलं पाहिजे, डोळे मिटून कुणावरही असा अंध-विश्वास ठेवता कामा नये."
चारधामाहुन परत आल्यावर ते राम जोशी कडे आपली पुंजी परत मागायला जातात, पण राम जोशी चक्क नाकारतो,
मी तुम्हा लोकांना ओळखतचं नाही असं सांगून हकलून देतो.
गोपाल पोलिसात तक्रार नोंदवतो.
न्यायालयात राम जोशी विरुद्ध खटला मांडला जातो. इकडे स्वामी चोळप्पाला कागद आणी दउत आणायला सांगतात.
मग स्वामी आपण म्हणतो त्याची नोंद करायला सांगतात.
स्वामी गोपाळनी ठेवलेली सर्व पुंजीचं वर्णन लिहवतात, व खाली "कोदंड पाणी" असं साक्षीदारच नाव लिहवतात.
चोळप्पा कोदंडपाणी कोण असं विचारतो, पण स्वामी प्रश्न फेटाळून लावतात.
इकडे गोपाळ कडे पुरावा नसल्यानी ,न्यायाधीश  कोणी साक्षीदार  आहे का,असं विचारतात.
गोपाळ निमुटपणे नाही म्हणतो, पण तितक्यात स्वामी-प्रेरणेनी लीलाच्या तोंडातून 'कोदंडपाणी' साक्षीदार आहे,
असं येतं.
तीच तिलाच आश्चर्य वाटतं.
न्यायालयात कोदंडपाणी नावाची हाक लागते.
लीलाच तर काळीज तोंडात येतं, नाव तर निघालं पण आता कोदंडपाणी येणार कुठून?
तितक्यात स्वामी तिथे वयस्क गृहस्थाच्या रुपात येतात, आणी मीच कोदंडपाणी म्हणून
न्यायाधीशाला आपली ओळख देतात.
चोळप्पानी लिहिलेली नोंद-वही न्यायालयात सदर होते, तशीच्या-तशी नोंद रामजोशी कडच्या
यात्रेकरूंच्या सामानाच्या नोंद-वहीत सापडतं.
गोपाळ खटला जिंकतो व त्याला पूर्ण पुंजी प्राप्त होते.
राम जोशीवर कारावास आणी अर्थ-दंड ठोठवला जातो.
गोपाळ कोदंडपाण्यांना विचारतो, आपण कोण आणी हे प्रकरण कसं काय झालं?
कोदंडपाणी म्हणतात- "अक्कलकोटला ये! तिथे तुला सर्व प्रश्नांचे उत्तर मिळेल."
अक्कलकोटला स्वामी गोपाळ ला आपणच कोदंडपाणी होतो, अशी प्रचीती देतात.
गोपाळ विचारतो- "पर हम तो आपको जानते भी नही और हमने तो आपकी कभी भक्ती भी नही करी,
फिर भी आप हमारी मदत के लिये कैसे आये?"
स्वामी म्हणतात- "अरे तुम्हं लोगो ने मेरा नाम नही लिया पर श्रीराम का नाम तो लिया !"
"हम श्री राम के ही अंश है."
"भगवान एक ही होता है,वह भक्तो कि सुविधा के लिये अलग-अलग रूपो मे अवतरित होता है."
गोपाळ आणि लीला स्वामी चरणी मस्तक ठेवतात.
टीप: कोदंडपाणी म्हणजे 'धनुष्य धारण करणारा'.
 प्रभू श्रीरामांच्या नावापुढे लागणाऱ्या अनेक विशेषणा मधले,
हे एक प्रमुख  विशेषण आहे.

No comments:

Post a Comment